3 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
3 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (3 मार्च 2020)
भारतीय विमानांमध्येही वायफाय सुविधा पुरविण्यास सरकारची परवानगी :
- विमानात वायफाय सेवा पुरवण्यास भारत सरकारने परवानगी दिली असून हा निर्णय सोमवारी जाहीर करण्यात आला.
तर 21 फेब्रुवारीच्या अधिसूचनेनुसार प्रवाशांना विमानात बसल्यानंतर वायफाय सेवेच्या माध्यमातून इंटरनेट साधने वापरता येतील. - तसेच विमानाचा प्रमुख वैमानिक हा प्रवाशांना इंटरनेट सेवा यापुढे उपलब्ध करून देऊ शकतो. ही सेवा वाय फाय ऑन बोर्ड पद्धतीची असून त्यावर लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅबलेट, ई रीडर व पॉइंट ऑफ सेल मशीन चालू शकतात. त्यामुळे प्रवासी विमानातील खाद्यपदार्थ किंवा इतर काही वस्तूंचे पैसे तेथेच डेबिट क्रेडिट कार्डने अदा करू शकतील.
- विस्तारा कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लेस्ली थँग यांनी बोइंग 787-9 या वायफाय सेवा असलेल्या विमानाची खरेदी स्वीकारली, तेव्हा त्यांनी सांगितले,की हे वायफाय सेवा असलेले पहिले विमान भारतात उपलब्ध झाले आहे.
- हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या प्रमाणनानंतर ही वायफाय इंटरनेट सेवा वापरता येईल, त्यासाठी प्रक्रिया निश्चित केली आहे. विमानाची सर्व दारे बंद झाल्यानंतर वैमानिक त्याच्या कळफलकावरून ही सेवा सुरू करून देईल. विमानाची दारे विमानतळावर आल्यानंतर उघडली जातील तेव्हा ही सेवा बंद केली जाईल.
- भारतीय हवाई क्षेत्रात वायफाय सेवा विमानात देण्यात यावी अशी सूचना भारतीय दूरसंचार नियामकांनी 2018 मध्ये केली होती. त्यानुसार हा निर्णयम् घेण्यात आला असून भारतीय विमानांमध्ये वायफाय सुविधा नसल्याने परदेशी विमानात ती सोय असूनही त्यांना भारतीय हवाई क्षेत्रात आल्यानंतर वायफाय सेवा बंद ठेवावी लागत होती.
Must Read (नक्की वाचा):
31 मार्च पर्यंत पॅन आणि आधार लिंक न केल्यास भरावा लागणार भरमसाठ दंड :
- पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी 31 मार्च 2020 ही शेवटची मुदत आहे. या मुदतीपर्यंत पॅन आणि आधार कार्ड लिंक केलं नाही तर थोडा थोडका नाही 10 हजारांचा दंड भरावा लागणार आहे. एवढंच नाही तर तुमचं पॅन कार्ड चुकीचं असेल म्हणजेच त्यावर चुकीची माहिती असेल आणि ते आधारशी लिंक झालं नाही तरीही एवढाच दंड भरावा लागणार आहे.
- तर इन्कम टॅक्स कायदा सेक्शन 272 बी अन्वये हा दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुमचे आधार आणि पॅन लिंक करा नाहीतर 10 हजारांचा दंड भरण्याची तयारी ठेवा.
- 31 मार्च 2020 पर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक झाले नाही तर इतर अनंत अडचणींचा सामना असं करणाऱ्यांना करावा लागणार आहे. जे आधार आणि पॅन 31 तारखेपर्यंत लिंक करणार नाहीत त्यांचे आधार 1 एप्रिल 2020 पासून बाद ठरण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
- आधार कार्डाची गरज एक ओळखपत्र म्हणून तर आहेच याशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स, बँक अकाऊंट, 50 हजारांच्या वरचे व्यवहार यासाठीही ते महत्त्वाचे आहे. मात्र 31 मार्च पर्यंत आधार आणि पॅन कार्ड लिंक केले नाही तर ते या सगळ्या प्रक्रियांसाठी वापरता येणार नाही अशीही शक्यता आहे. जोपर्यंत दंड भरुन आधार आणि पॅन कार्ड लिंक केले जात नाही तोपर्यंत त्या संबंधित व्यक्तीला या सगळ्या प्रक्रिया करता येणार नाहीत अशीही माहिती समोर येते आहे.
जागतिक क्रमवारीत भारतीय हॉकी संघ चौथ्या स्थानी :
- भारतीय पुरुष हॉकी संघाने जागतिक क्रमवारीत सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे. हॉकी प्रो-लिग स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीनंतर हॉकी संघ जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर पोहचला आहे.
- तर 2003 सालानंतर भारतीय हॉकी संघाची ही सर्वोत्तम झेप मानली जात आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे 2016 रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या अर्जेंटिनाला मागे टाकत भारतीय हॉकी संघाने चौथं स्थान पटकावलं आहे.
- बेल्जियमने या क्रमवारीतल आपलं पहिलं स्थान कायम राखलं असून ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. नेदरलँडच्या संघाने तिसरं स्थान पटकावलं असून भारतीय संघ आता सर्वोत्तम संघांमध्ये गणला जाणार आहे.
- महिलांच्या क्रमवारीत भारतीय महिलांनी नववं स्थान मिळवलं आहे. 1 जानेवारी 2020 पासून आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेने जागतिक क्रमवारीत गुण देण्याच्या पद्धतीमध्ये बदल केला आहे. जुलै महिन्यात टोकियो शहरात पार पडणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या आधी भारतीय संघाने क्रमवारीत घेतलेली ही झेप नक्कीच आश्वासक मानली जात आहे.
डॉ. श्रीराम लागू यांच्या नावे पुरस्कार देणार :
- रंगभूमीवरील नटसम्राट दिवंगत डॉ. श्रीराम लागू यांना राज्य सरकारने मानाचे स्थान दिले आहे.
- तर लागू यांच्या नावे पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा आज सांस्कृतिक विभागाने केली आहे.
- मराठी रंगभूमीसाठी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. ‘नटसम्राट श्रीराम लागू’ या नावाने हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
दिनविशेष :
- टेलिफोनचा जनक ‘अॅलेक्झांडर ग्राहम बेल’ यांचा जन्म सन 1847 मध्ये 3 मार्च रोजी झाला.
- नाशिक येथील कला राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 3 मार्च 1930 रोजी सत्याग्रह केला.
- सौदी अरेबिया मध्ये खनिज तेलाचा शोध 3 मार्च 1938 मध्ये लागला.
- 3 मार्च 1973 रोजी भारताच्या ओडिशा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली.
- जयपूर येथील गिटारवादक पंडित विश्वमोहन भट यांना सन 1994 मध्ये 3 मार्च रोजी ग्रॅमी पुरस्कार प्रदान केला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा