2 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

2 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (2 मार्च 2020)
अर्मेनियात ‘मेड इन इंडिया’ला मागणी :
- भारताच्या संरक्षण क्षेत्रातील ‘मेक इन इंडिया’ अभियानाला मोठे यश मिळाले आहे. कारण रशिया आणि पोलंडला मागे टाकत भारताने अर्मेनियासोबत 280 कोटी (40 मिलियन डॉलर) रुपयांचा संरक्षण करार केला आहे.
- तर या करारानुसार, डीआरडीओद्वारे विकसित आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडद्वारे (बीईएल) निर्मित चार ‘स्वाती वेपन लोकेटिंग रडार’ युरोपीय देश असलेल्या अर्मेनियाला भारत निर्यात करणार आहे.
- तसेच या व्यवहाराची निर्यात प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. विशेष म्हणजे अर्मेनियाने भारताकडून ही शस्त्रे घेण्यापूर्वी रशिया आणि पोलंडच्या रडारचीही चाचणी केली होती पण शेवटी त्यांनी भारतीय रडार्सलाच पसंती दिली.
- ‘स्वाती वेपन लोकेटिंग रडार’ या चार रडारचा हा संरक्षण व्यवहार अयसून हे 50 किमीच्या सीमेमध्ये शत्रूची हत्यारं, मोर्टार आणि रॉकेट सारख्या स्वयंचलित शस्त्रांचा नेमका शोध घेऊ शकते.
- त्याचबरोबर एकाच वेळी विविध ठिकाणांहून भिन्न शस्त्रांद्वारे डागलेल्या अनेक क्षेपणास्त्राचा शोधही हे रडार घेऊ शकते. भारतीय सैन्य जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ याच रडारचा उपयोग करते. यामुळे पाकिस्तानी चौक्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांचा पत्ता त्यांना लागतो. 2018 मध्ये चाचणीसाठी भारतीय सैन्याला ही प्रणाली देण्यात आली होती.
Must Read (नक्की वाचा):
लेफ्टनंट जनरलपदी डॉ. माधुरी कानिटकर :
- लष्करात पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळण्यासाठीची एक मोठी लढाई महिलांनी सर्वोच्च न्यायालयात नुकतीच जिंकली असताना मेजर जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांना लेफ्टनंट जनरल पदावर बढती देण्यात आली.
- तर कानिटकर यांची लेफ्टनंट जनरलपदी निवड गेल्या वर्षीच झाली होती, पण जागा रिक्त झाल्यानंतर त्यांनी शनिवारी पदभार स्वीकारला. या उच्च पदावर पोहोचलेल्या त्या पहिल्याच मराठी महिला अधिकारी आहेत.
- तसेच नवी दिल्ली येथे त्यांनी एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (सीडीएस- वैद्यकीय) म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. हा विभाग संरक्षण प्रमुख यंत्रणेच्या अंतर्गत आहे.
- लष्करात या श्रेणीचे पद मिळवणाऱ्या कानिटकर या तिसऱ्या महिला अधिकारी असून त्या बालरोगतज्ज्ञ आहेत.
- कानिटकर यांचे पती राजीव लष्करात लेफ्टनंट कर्नल होते. ते नुकतेच निवृत्त झाले. पती-पत्नीने लष्करात लेफ्टनंट कर्नलपद भूषवल्याची ही पहिलीच घटना आहे.
- डॉ. कानिटकर यांनी लष्करात 37 वर्षे सेवा केली आहे. सीडीएस-वैद्यकीय पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे. भारतीय लष्कराच्या तिन्ही सेवांबाबत (हवाई दल, नौदल आणि स्थलसेना) केंद्र सरकारला सल्ला देण्याचे काम त्या करतील.
सहकारी बँकांवर रिझव्र्ह बँकेचे नियंत्रण वाढविण्यासाठी विधेयक :
- सहकारी बँकांना रिझव्र्ह बँकेच्या कडक र्निबधांखाली आणण्याबाबतचे विधेयक संसदेच्या या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. बँकिंग नियमन कायद्यानुसार या बँकांना नियम लागू केले जाणार आहेत.
- तसेच या विधेयकामुळे पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेसारखे पेच निर्माण होणार नाहीत. देशात 1540 सहकारी बँका असून त्यांचे ठेवीदार 8.60 कोटी आहेत.
- तर त्यांच्या ठेवी एकूण 5 लाख कोटींच्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती, त्यात बँकिंग नियमन कायद्यात सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली असून सहकारी बँकांना रिझव्र्ह बँकेच्या र्निबधानुसार काम करावे लागणार आहे.
- अर्थसंकल्पी अधिवेशनाचा दुसरा टप्पा सोमवारी सुरू होत असून अधिवेशन 3 एप्रिलला संपणार आहे. ठेवादारांचे पैसे सुरक्षित रहावेत यासाठी सरकारने हे विधेयक आणण्याचे ठरवले होते.
मलेशियाच्या पंतप्रधानपदी मुहियिद्दीन यासीन :
- मलेशियात महाथीर मोहम्मद यांचा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत पराभव झाला असून, अंतर्गत मंत्री मुहियिद्दीन यासीन हे नवे पंतप्रधान झाले आहेत.
- तसेच यासीन यांच्या आश्चर्यकारक विजयामुळे केवळ जगातील सर्वात वृद्ध पंतप्रधान असलेले 94 वर्षांचे महाथीर हेच बाजूला झाले आहेत असे नसून, अन्वर इब्राहिम यांचीही अलीकडच्या काळात देशाचे नेते होण्याचे स्वप्न भंगले आहे.
- तर मलेशियातील सुधारणावादी सत्ताधारी आघाडी सरकार गेल्या आठवडय़ात कोसळल्यानंतर, खासदारांचा सर्वाधिक पाठिंबा कुणाला आहे याचा निर्णय घेऊन राजांनी मुहियिद्दीन यांची निवड केल्याचे राजघराण्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
US-तालिबान मध्ये शांती करार :
- गेल्या 19 वर्षांपासून युद्धात होरपळत असलेल्या अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका आणि तालिबानमध्ये शांतता करार करण्यात आला. या करारावर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
- तर या करारानुसार शांतता कराराचे पालन केल्यास येत्या 14 महिन्यात अमेरिका अफगाणिस्तानातून सगळ्या सैनिकांना माघारी बोलवेल अशी घोषणा अमेरिकेने केली आहे.
- अमेरिका आणि तालिबान यांच्यात कतारची राजधानी दोहा येथे ऐतिहासिक शांतता करार झाला.
- तसेच तालिबानने शांतता करार पाळला तर अमेरिका 8 हजार 600 सैनिक परत बोलवेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
द्युती चंदला सुवर्णपदक :
- भारताची सर्वाधिक वेगवान महिला धावपटू द्युती चंदने खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. त्याशिवाय नरेंद्र प्रतापसिंगने स्पर्धेतील दुसऱ्या सुवर्णपदकावर नाव कोरले.
- तर कलिंगा औद्योगिक तंत्रज्ञान संस्थेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 24 वर्षीय द्युतीने 11.49 सेकंदांत विजयी अंतर गाठले.
- तसेच मँगलोर विद्यापीठाची धनलक्ष्मी एस. आणि महात्मा गांधी विद्यापीठाची स्नेहा यांना अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी द्युती 200 मी. धावण्याच्या शर्यतीतसुद्धा सहभागी होणार आहे.
दिनविशेष:
- सन 1857 मध्ये जे.जे. स्कूल ऑफ आर्टस् मुंबई सुरु झाले.
- जगातील पहिले फक्त महिलांसाठी असलेले मार्था वॉशिंग्टन हॉटेल न्युयॉर्क अमेरिका येथे सन 1903 मध्ये सुरु झाले.
- पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सन 1952 या वर्षी सिंद्री येथील खत कारखान्याचे उद्घाटन झाले होते.
- सन 1969 मध्ये जगातील पहिल्या ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारया काॅन्कॉर्ड या फ्रेंच बनावटीच्या विमानाचे यशस्वी उड्डाण झाले होते.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा