29 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

29 December 2019 Current Affairs In Marath
29 December 2019 Current Affairs In Marath

29 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (29 डिसेंबर 2019)

रशियाकडे जगातील पहिली हायपरसोनिक मिसाईल :

  • रशियाने आज आवाजाच्या वेगापेक्षा 27 पटींनी जास्त वेगवान असलेल्या हायपरसोनिक मिसाईलला त्यांच्या सैन्दलाकडे सुपूर्द केले आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांनी याची घोषणा केली आहे. ही मिसाईल अण्वस्त्र क्षमता ठेवते.
  • तर या हायपरसोनिक मिसाईलचा वेगच एवढा प्रचंड आहे की त्याच्याशी कोणतीच डिफेन्स प्रणाली टक्कर देऊ शकत नाही. 27 डिसेंबरला ही मिसाईल रशियन सैन्याला देण्यात आली. या मिसाईलची तैनाती कुठे असेल याबाबत कोणतीही माहिती नसून यूरलच्या डोंगररांगांमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे समजते.
  • हायपरसोनिक मिसाईल आवाजाच्या वेगापेक्षा (1235 किमी) कमीत कमी 5 पटींनी जास्त वेगाने जाऊ शकते. म्हणजेच 6174 प्रति तास वेग. या मिसाईलमध्ये क्रूझ आणि बॅलिस्टिक मिसाईल या दोन्हींचे गुण आहेत.
  • तसेच हे मिसाईल लाँच झाल्यानंतर पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाणार आहे. त्यानंतर तेथून अंतर कापत लक्ष्याकडे झेपावणार आहे. यामुळे या मिसाईलला रोखणे कठीण असणार आहे. वेगही प्रचंड असल्याने सध्याचे रडार या मिसाईलला शोधण्यात कुचकामी ठरणार आहेत.
  • तर या मिसाईलची धक्कादायक बाब म्हणजे हे मिसाईल तब्बल दोन अब्ज किलो अण्वस्त्र वाहून नेऊ शकते. यामुळे एखादा मोठा देश काही क्षणांत बेचिराख होऊ शकतो. या मिसाईलच्या टप्प्यात अमेरिकाही येते. 2018 मध्ये या मिसाईलची टेस्टिंग करण्यात आली होती. तेव्हा 6000 किमीवरील लक्ष्यभेद करण्यात आला होता.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 डिसेंबर 2019)

बीएसएनएल-एमटीएनएलच्या पुनर्घडणीसाठी उच्चस्तरीय मंत्रिगट :

  • सार्वजनिक मालकीच्या दूरसंचार कंपन्या – भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) यांच्या पुनर्घडणीसाठी 69 हजार कोटी रुपयांची योजना केंद्र सरकारने आखली असून, या योजनेच्या जलद गतीने अंमलबजावणीसाठी सात सदस्यांचा उच्चस्तरीय मंत्रिगटही आता स्थापण्यात आला आहे.
  • केंद्र सरकारने ऑक्टोबरमध्ये बीएसएनएल आणि एमटीएनएल या दोन्ही कंपन्यांचे विलिनीकरण करण्यासह, त्यांच्या फेरघडणीसाठी 69 हजार कोटी रुपये खर्चाची पुनरूज्जीवन योजना घोषित केली आहे. त्यानंतर दोन्ही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर करण्यात आली आणि त्याला एकूण 92 हजार 700 कर्मचाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. परिणामी वेतन खर्चापोटी दरसाल 8 हजार 800 कोटी रुपयांची बचत या मोठा कर्जभार असणाऱ्या कंपन्यांना शक्य होणार आहे.
  • तसेच दोन्ही कंपन्यांच्या पुनरुज्जीवनासाठी निर्धारीत योजनेच्या अंमलबजावणीसह, काही मालमत्तांची विक्रीतून निधी उभारणी तसेच 4जी ध्वनीलहरींचे या कंपन्यांना वाटपाच्या मुद्दय़ांचाही पाठपुरावा हे कृतीदल करणार असल्याचे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.
  • तसेच या आंतर-मंत्रिमंडळ स्तरावरील कृतीदलात, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, दूरसंचारमंत्री रवी शंकर प्रसाद, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, वाणिज्यमंत्री पियूष गोयल आणि पेट्रोलियममंत्री धर्मेद्र प्रधान यांचा समावेश आहे.

तिहेरी तलाक पीडितांना मिळणार वर्षाला 6 हजार रुपये पेन्शन :

  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने तिहेरी तलाक पीडित महिलांना पुढील वर्षापासून पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार तिहेरी तलाक पीडित महिलांना वर्षाला सहा हजार रुपये पेन्शन देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
  • तर यासंबंधीचा प्रस्ताव सरकारने तयार केला असून पुढील कॅबिनेटच्या बैठकीत मांडला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एफआयआर किंवा फॅमिली कोर्टातील खटल्याच्या आधारावर ही पेन्शन दिली जाणार आहे.
  • तसेच यासाठी सरकारने राज्यातील तिहेरी तलाक पीडित 5 हजार महिलांची नोंद घेतली आहे. पहिल्या टप्प्यात या पीडित महिलांसाठी पेन्शनची योजना लागू करण्यात येणार असल्याचे समजते.

आयआयटी टेकफेस्टमध्ये ‘आईन्स्टाईन’ रोबो :

  • मुंबई आयआयटीच्या 3 जानेवारीपासून सुरू होत असलेल्या टेकफेस्टमध्ये यावेळी हाँगकाँगमधून येणाऱ्या आईन्स्टाईन रोबो आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. हॅन्सन रोबोटिक्स यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून या रोबोची निर्मिती केली आहे.
  • तर त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या समोर उभ्या असणाया व्यक्तीच्या चेहयावरील भावनांना ओळखून समोरील व्यक्तीची भावना तो ओळखू शकतो. व्यक्ती आनंदी, दु:खी, संतप्त, घाबरलेली, गोंधळलेली आहे हे रोबो सांगेल. एवढेच नव्हे तर व्यक्ती स्त्री आहे की पुरुष, त्याचे वय किती याची माहितीही तो देईल.
  • तसेच या रोबोला 10 लाखांपेक्षा जास्त चेहऱ्यांवरील भावभावना ओळखण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
  • मुंबई आयआयटीचे टेकफेस्ट यंदा 3 ते 5 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या टेकफेस्टमध्ये 5 जानेवारी रोजी टेकवेडे आईनस्टाईनला भेटू शकतील. टेकफेस्टमध्ये येणायांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी तो सज्ज झाला आहे. आईन्स्टाईनप्रमाणे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर हा रोबो देईल, असा दावा आयोजकांनी केला आहे.
  • याआधी ह्युमनॉइड सोफिया नावाचा रोबो टेकफेस्टमध्ये सहभागी झाला होता. तेव्हा सोफियाने ‘नमस्ते इंडिया’ म्हणून मुलाखतीदरम्यान सर्वांचे स्वागत केले होते. सोफियापेक्षा हा रोबो अधिक विकसित आहे. कारण तो केवळ बोलणारच नाही तर भावभावना ओळखून त्याबाबत उपस्थितांशी संवाद साधेल, त्यांना यासंदर्भातील अधिक माहिती देईल, असे आयोजकांनी सांगितले.
  • आईन्स्टाईन व्यक्तीकडे बघून त्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे, त्याच्या भावना ओळखू शकतो. जसे की त्याच्या समोर उभी असलेली व्यक्ती आनंदात आहे की दु:खात हे रोबो ओळखू शकेल. एखाद्या व्यक्तीच्या मनात भीती असेल तर तीदेखील तो अचूक ओळखेल, असे आयोजकांनी सांगितले. सोबतच त्या व्यक्तीचे लिंग, वय अशा बयाच गोष्टी हा रोबो सांगणार आहे. तसे प्रशिक्षणच आईन्स्टाईनला देण्यात आले आहे. विशेष म्हणजे आईन्स्टाईन हा हाँगकाँगचा रोबो असून तो भारतात पहिल्यांदाच येणार आहे.

विजयी मेरी कोम :

  • देशातील क्रीडाक्षेत्राचे लक्ष वेधलेल्या बॉक्सिंग लढतीत शनिवारी सहा वेळा विजेत्या एमसी मेरी कोमने निखत झरीनला नामोहरम केले आणि पुढील वर्षी चीनला होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी भारतीय संघातील स्थान पक्के केले.
  • तर 36 वर्षीय मेरी कोमने 23 वर्षीय माजी कनिष्ठ विश्वविजेत्या झरीनचा 9-1 असा पराभव केला. मेरी कोमसाठीसुद्धा निवड चाचणीचा निकष असायला हवा, अशी मागणी करीत या लढतीविषयीची उत्कंठा झरीनने वाढवल्याने बॉक्सिंग हॉलमधील वातावरण तणावपूर्ण शांततेचे होते.
  • तसेच अन्य लढतींत, 57 किलो वजनी गटात आशियाई पदकविजेत्या साक्षी चौधरीने दोन वेळा रौप्यपदक विजेत्या सोनिया लाथेरला नमवले.
  • 60 किलो गटात राष्ट्रीय विजेत्या सिम्रनजीत कौरने माजी विश्वविजेत्या एल. सरिता देवीचा पराभव केला. दोन वेळा जागतिक पदकविजेत्या लव्हलिना बोर्गोहेनने 69 किलो गटात ललिताला सहज पराभूत केले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील माजी कांस्यपदक विजेत्या पूजा राणीने 75 किलो गटात नूपुरला नामोहरम केले.

दिनविशेष:

  • काँग्रेसचे पहिले अध्यक्ष ‘व्योमकेशचंद्र बॅनर्जी‘ यांचा जन्म 29 डिसेंबर 1844 मध्ये झाला होता.
  • मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा जन्म 29 डिसेंबर 1900 मध्ये झाला होता.
  • प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक ‘रामानंद सागर‘ यांचा जन्म 29 डिसेंबर 1917 रोजी झाला होता.
  • सन 1930 मध्ये सर मुहम्मद इकबाल यांनी दोन राष्ट्र सिद्धांत तसेच पाकिस्तानच्या निर्मितीचा दृष्टीकोन मांडला होता.
  • सन 1959 मध्ये नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाइनमॅन यांनी CALTECH येथे There is plenty of room at the bottom हे प्रसिद्ध भाषण दिले. ही Nanotechnology ची सुरुवात मानली जाते.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (30 डिसेंबर 2019)

You might also like
1 Comment
  1. swayam says

    sir please give me pdf of curren affairs in 2019 and2020

Leave A Reply

Your email address will not be published.