6 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
6 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (6 जानेवारी 2020)
बेन स्टोक्सचा क्षेत्ररक्षणात विक्रम
- एका डावात सर्वाधिक वेळा पाच झेल टिपणारा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स हा इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे.
- दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर त्याने ऑनरिख नॉर्कीएचा झेल टिपला. दुसऱ्या स्लिपमध्ये स्टोक्सने हे पाचही झेल टिपले.
- तर इंग्लंडच्या 1019 सामन्यांमध्ये एका डावात चार झेल टिपण्याची किमया 23 वेळा घडली आहे.
- जागतिक कसोटी सामन्यांमध्ये पाच झेल पकडणारा स्टोक्स हा 11वा खेळाडू आहे. अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने एका डावात पाच झेल टिपले होते.
Must Read (नक्की वाचा):
राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर :
- आठवडाभरापासून रखडलेले राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर रविवारी जाहीर करण्यात आले.
- महाविकास आघाडी सत्तेवर आल्यापासून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेले गृहखाते राष्टवादी काँग्रेसकडे गेले असून, आता विदर्भातील राष्टवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख हे नवे गृहमंत्री असतील. तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या मंजुरीनंतर खातेवाटपाची अधिकृत घोषणा झाली.
- खातेवाटपात राष्ट्रवादीकडे गृह, वित्त व नियोजन, ग्रामविकास, जलसंपदा, गृहनिर्माण, सामाजिक न्याय, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन यांसारखी महत्त्वाची खाती आली आहेत.
- तर, काँग्रेसकडे महसूल व ऊर्जा या खात्यांह सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, महिला व बालकल्याण, शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, मदत पुनर्वसन, ओबीसी, क्रीडा व युवक कल्याण, पशुसंवर्धन व दुग्धविकास, वस्रोद्योग आदी खाती आली.
- ग्रामविकास अथवा कृषिखात्यासाठी काँग्रेसने जोर लावला होता. मात्र, ही दोन्ही खाती काँग्रेसला मिंळाली नाहीत.
- ग्रामविकास खाते राष्ट्रवादीकडे तर कृषी खाते शिवसेनेकडे गेले आहे.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधि व न्याय ही खाते स्वत:कडे ठेवली आहेत.
दिनविशेष :
- 6 जानेवारी – पत्रकार दिन.
- 6 जानेवारी 1665 मध्ये शिवाजी महाराजांनी सूर्यग्रहणाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ व सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली.
- 6 जानेवारी 1673 मध्ये कोंडाजी फर्जद यांनी फक्त 60 मावळ्यांच्या मदतीने पन्हाळा किल्ला जिंकला आणि महाराजांचे 13 वर्षाचे स्वप्न पूर्ण झाले.
- सॅम्युअल मॉर्स यांनी 6 जानेवारी 1838 मध्ये तारयंत्राचा शोध लावला.
- 6 जानेवारी 1992 मध्ये न्यू मेक्सिको हे अमेरिकेचे 47वे राज्य बनले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा