23 November 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

23 November 2019 Current Affairs In Marathi

23 November 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (23 नोव्हेंबर 2019)

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री :

  • एकीकडे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण्याच्या घडामोडी सुरू असताना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
  • तर यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले की, राज्यात शेतकऱ्यांची स्थिती वाईट आहे. महाराष्ट्राला स्थिर सरकारची गरज आहे. तीन्ही पक्षांच्या बैठकांचे सत्र काही संपत नव्हते. यामुळे आम्ही भाजपासोबत दोन पक्षांचे सरकार
    स्थापने करायचा निर्णय घेतला.

देशाला मिळाला सर्वात तरुण न्यायाधीश :

  • एकवीस वर्षीय मंयक प्रताप सिंह हा तरुण विधी सेवा परीक्षा 2018 उत्तीर्ण झाला आहे. त्यामुळे तो आता देशातील सर्वात तरुण न्यायाधीश म्हणून कोर्टाचे कामकाज पाहणार आहे.
  • तर 21 व्या वर्षीच तो आता कोर्टात निकाल सुनावणार आहे. या अभुतपूर्व यशासाठी त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
  • तसेच मयंकने सन 2014 मध्ये राजस्थान विद्यापीठातून पाच वर्षांच्या एलएलबी कोर्ससाठी प्रवेश घेतला होता. त्याचा हा कोर्स याच वर्षी पूर्ण झाला आहे.
  • सन 2018 पर्यंत विधी सेवा परीक्षांसाठी अर्ज करण्याची वयाची किमान वयोमर्यादा 23 वर्षे होती. मात्र, 2019 मध्ये राजस्थान हायकोर्टाने ही मर्यादा 21 वर्षे केली.

अश्वारोहणमध्ये फवाद मिर्झा ऑलिम्पिकसाठी पात्र :

  • आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुहेरी पदकविजेत्या फवाद मिर्झाने अश्वारोहणमध्ये ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचा मान मिळवला आहे.
  • 27 वर्षीय फवादने पात्रता स्पर्धेत अग्रस्थान गाठून दोन दशकांची भारताची प्रतीक्षा संपुष्टात आणली आहे.
  • आंतरराष्ट्रीय अश्वारोहण महासंघाकडून 20 फेब्रुवारी, 2020ला यासंदर्भात अधिकृत पुष्टी मिळू शकेल.
  • याआधी इम्तियाझ अनीस (2000, सिडनी) आणि आय. जे. लांबा (1996, अटलांटा) यांनी ऑलिम्पिक अश्वारोहमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
  • ऑगस्ट महिन्यात अर्जुन पुरस्कार पटकावणाऱ्या फवादने सहा पात्रता प्रकारांमध्ये एकूण 64 गुण कमावले.

विराटचा विक्रम, अनोखी कामगिरी करणारा पहिला भारतीय कर्णधार :

  • भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावरचा कसोटी सामना हा संस्मरणीय ठरणार आहे.
  • पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या बांगलादेश संघाला भारतीय गोलंदाजांनी 106 धावांवर माघारी धाडलं. यानंतर भारतीय संघाने आपल्या डावाची सावध सुरुवात केली. कर्णधार विराट कोहलीने पहिल्या दिवसाच्या खेळात 32 वी धाव काढत
    अनोखा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे.
  • कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने 5 हजार धावा काढणारा विराट पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे.
  • तसेच त्याने 86 डावांमध्ये ही कामगिरी करत माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटींगचा विक्रम मोडला आहे. रिकी पाँटींगने 97 डावांमध्ये याआधी अशी कामगिरी करुन दाखवली होती.

दिनविशेष:

  • सन 1924 मध्ये एडविन हबल यांनी देवयानी (Andromeda) ही एक आकाशगंगा आहे असे प्रतिपादन केले होते.
  • 23 नोव्हेंबर 1937 हा दिवस भारतीय वनस्पती शास्त्रज्ञ ‘जगदीश चंद्र बोस’ यांचा स्मृतीदिन आहे.
  • आध्यात्मिक गुरू सत्यनारायण राजू ऊर्फ सत्य साईबाबा यांचा जन्म 23 नोव्हेंबर 1926 मध्ये झाला होता.
  • सन 1992 मध्ये आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला.
  • नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल सन 1999 मध्ये अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार प्रदान झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.