12 October 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
12 October 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (12 ऑक्टोबर 2019)
इथिओपियाचे पंतप्रधान अबिय अहमद अली यांना शांततेचा नोबेल जाहीर :
- इथिओपियाचे पंतप्रधान अबिय अहमद अली यांना 2019 चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
- इथिओपियाचा शेजारी देश इरिट्रियासोबतचा दोन दशकांपासूनचा सीमावाद सोडवण्यासाठी निर्णायक पुढाकार घेतल्याप्रकरणी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
- तर शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणारे ते पहिले इथिओपिअन नागरिक ठरले आहेत. यंदाचा हा शंभरावा नोबेल शांती पुरस्कार आहे.
- तसेच 2019 चा नोबेल शांती पुरस्कार हा इथियोपियासह पूर्व आणि ईशान्य आफ्रिकी प्रदेशात शांतता आणि सलोखासाठी काम करणार्या सर्व व्यक्तींची ओळख बनला आहे.
Must Read (नक्की वाचा):
द्युती चंदचा राष्ट्रीय विक्रम :
- भारताची आघाडीची धावपटू द्युती चंद हिने 59व्या राष्ट्रीय खुल्या अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत आपला स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला.
- दोहा येथील जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्यात अपयशी ठरलेल्या 23 वर्षीय द्युतीने 11.22 सेकंद अशी कामगिरी नोंदवत या वर्षी आशियाई स्पर्धेत रचलेला 11.26 सेकंदांचा विक्रम मागे टाकला.
- तर पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत अमिया कुमार मलिक सर्वात वेगवान धावपटू ठरला. त्याने मलेशियाच्या जोनाथन अनाकमायेपा याला मागे टाकत 10.46 सेकंद अशी वेळ नोंदवून सुवर्णपदक पटकावले. पंजाबच्या गुरिंदरवीर सिंग याने कांस्यपदक प्राप्त केले.
- तसेच एमपी. जबीर याने 400 मीटर अडथळा शर्यतीत 49.41 सेकंद अशी वेळ देत स्पर्धाविक्रमाची नोंद केली.
विराटची सर्वोत्तम खेळी द्रविड, लक्ष्मण यांच्या कामगिरीशी बरोबरी :
- दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने दमदार खेळी केली. विराटने भारताच्या डावाला आकार देताना धमाकेदार नाबाद 254 धावा केल्या.
- तर त्याच्या या खेळीच्या बळावर भारताने 600 धावांपार मजल मारली. 601 धावांवर भारताने डाव घोषित केला.
- तसेच कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात 336 चेंडूत 254 धावांची खेळी केली. त्या खेळीत त्याने 33 चौकार आणि 2 षटकार लगावले. विराटने या खेळीसह कसोटी कारकिर्दीतील आपली सर्वोच्च धावसंख्या नोंदवली.
- कोहलीने आपल्या कसोटी कारकिर्दीत प्रथमच 250 धावांचा टप्पा ओलांडला. यासह विराटने ‘250+ क्लब’मध्ये प्रवेश केला.
- कसोटी क्रिकेटमध्ये 250 धावांचा टप्पा गाठणाऱ्या भारतीय फलंदाजाच्या यादीत विराटने स्थान पटकावले.
- तर या यादीत चार वेळा 250 पेक्षा अधिक धावा करून माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग अव्वल आहे. याशिवाय, करूण नायर, व्ही व्ही एस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांनी एकदा हा पराक्रम केला. त्या यादीत विराटने स्थान मिळवले आहे.
महात्मा गांधींवर ब्रिटन काढणार विशेष नाणे :
- भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती 2 ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर गांधीजींच्या स्मृतिप्रीत्यर्थ ब्रिटन एक विशेष नाणे काढणार आहे.
- ब्रिटनचे वित्तमंत्री साजीद जाविद यांनी याबाबत माहिती दिली आहे. ‘महात्मा गांधी यांची शिकवण ही जगासाठी वंदनीय आहे. ती कधीच विसरली जाऊ नये या उद्देशाने ब्रिटनने हे स्मृतिनाणे काढायचे ठरवले आहे’ असं जाविद यांनी सांगितलं.
- ब्रिटनमध्ये दक्षिण आशियाई देशांतील अनेक नागरिक राहतात. त्यातील अनेकांनी आता ब्रिटनचे नागरिकत्व स्वीकारले आहे. या समुदायातील प्रभावी व्यक्तींचा सत्कार साजीद यांच्या हस्ते एका समारंभात करण्यात आला.
- महात्मा गांधी शालेय शिक्षण संपवून 1888 मध्ये लंडनला वकिलीचे शिक्षण घेण्यास गेले. तेथे त्यांनी भारतीय कायदा आणि न्यायशास्त्राचा अभ्यास केला. ब्रिटनमध्ये ते बॅरिस्टर झाले. त्यानंतर भारतात परत येऊन वकिली करू लागले.
- 1931 साली गोलमेज परिषदेसाठी ते लंडनला आले होते. गांधींजींवर गेल्या शंभर वर्षांत एक लाखांवर पुस्तके लिहिली गेली व तेवढ्याच पुस्तकात त्यांचे संदर्भ आले आहेत.
दिनविशेष:
- भारतात ब्रिटिश सरकारने सन 1871 मध्ये क्रिमिनल ट्राइब्स अॅक्ट या कायद्याद्वारे 161 जाती व जमातींना गुन्हेगारी जमाती ठरविले.
- क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक व समाजसेवक विजय मर्चंट यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1911 मध्ये झाला.
- क्रिकेट प्रशासक, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया (BCCI) चे अध्यक्ष मुथ्थय्या अन्नामलाई तथा एम.ए. चिदंबरम यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1918 मध्ये झाला.
- सन 2001 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ आणि राष्ट्रसंघाचे सरचिटणीस कोफी अन्नान यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा