22 July 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
22 July 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (22 जुलै 2019)
हिमा दासला पाचवे सुवर्णपदक :
- भारताची अव्वल धावपटू हिमा दास हिचा सुवर्णपदकांचा धडाका सुरूच असून शनिवारी तिने पाचव्या सुवर्णपदकाला गवसणी घातली.
- मेटूजी ग्रां. प्रि. अॅथलेटिक्स स्पर्धेत हिमाने महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत 52.09 सेकंद अशा वेळेसेह सुवर्णपदक पटकावले.
- तसेच गेल्या 15 दिवसांत 200 मीटर शर्यतीत चार सुवर्णपदके पटकावणाऱ्या हिमाने 400 मीटर शर्यतीत पहिल्यांदाच धावत या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.
- तर या शर्यतीत भारताच्या खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले. व्ही. के. विस्मया हिने 52.48 सेकंद अशी कामगिरी करत रौप्यपद पटकावले. सरिताबेन गायकवाड हिने 53.48 सेकंदासह कांस्यपदक तर एम. आर. पूवाम्मा हिने 53.78
सेकंदासह चौथा क्रमांक प्राप्त केला. - तसेच पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या नोह निर्मल टॉम याने 46.05 सेकंदासह रौप्यपदक पटकावले. कझाकस्तानच्या माझेन अल-यासिन याने 45.97 सेकंद अशी कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले.
- पुरुषांच्या 200 मीटर शर्यतीत मोहम्मद अनास याने 20.95 सेकंदासह रौप्यपदक जिंकले.
Must Read (नक्की वाचा):
आयसीसीच्या नियमात महत्वाचे बदल :
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात ICCने क्रिकेटमधील नियमात महत्त्वाचे बदल केले आहेत.
- तर लंडनमध्ये पार पडलेल्या आयसीसीच्या वार्षिक परिषदेत नियमातील बदलाचा निर्णय घेण्यात आला.
- गेल्या काही वर्षातील क्रिकेटमधील घटनांचा अभ्यास करून आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. एक ऑगस्ट 2019 पासून नवीन नियम लागू होणार आहेत.
- तसेच या नियमाची सुरुवात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिकेपासून होणार आहे. बदली खेळाडूला फलंदाजी आणि गोलंदाजी करता येईल आणि षटकांची गती कमी राखल्यामुळे आता संपूर्ण संघातील खेळाडूंना दंड
आकारण्यात येणार आहे. - तर अनेक वेळा खेळाडू जखमी झाल्यानंतर संघांना कमी खेळाडूंसह सामना खेळावा लागला आहे. सामन्यादरम्यान एखादा खेळाडू जखमी झाल्यानंतर संघाच्या कामगिरीवर देखील परिणाम होतो. म्हणूनच यापुढे बदली खेळाडू फळंदाजी आणि गोलंदाजी करू शकणार आहे. यापूर्वी बदली खेळाडू फक्त क्षेत्ररक्षण करत असे.
चांद्रयान-2चे उड्डाण आज दुपारी :
- हेलियमच्या टाकीतील दाब कमी झाल्याने गेल्या 15 जुलै रोजी उड्डाणाच्या 56 मिनिटे आधी रद्द करण्यात आलेले चांद्रयान-2चे उड्डाण आज दुपारी 2.43 वाजता होत आहे.
- ‘जीएसएलव्ही मार्क 3’ प्रक्षेपकाच्या हेलियम टाकीतील दाब कमी झाल्याने चांद्रयानाचे उड्डाण 15 जुलै रोजी रद्द करण्यात आले होते.
- तसेच आता त्यात दुरुस्त्या करण्यात आल्या असून अनेक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यात तांत्रिक बिघाडाची शक्यता नाही.
- तर उड्डाणानंतर मोहिमेचे 15 टप्पे असून त्यात 45 दिवसांच्या काळात हे यान चंद्राच्या कक्षेत जाईल. शेवटच्या 15 मिनिटांत चांद्रयान-2 तेथील दक्षिण ध्रुवावर घिरटय़ा घालत राहील व नंतर रोव्हरसह तेथे अलगद अवतरण करील.
दिनविशेष :
- 22 जुलै 1908 मध्ये देशाचे दुर्दैव हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना 6वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती.
- पोलंडमधे कम्युनिस्ट राजवटीची 22 जुलै 1944 मध्ये सुरुवात झाली.
- 22 जुलै 1898 मध्ये शास्त्रीय गायक पं. विनायकराव पटवर्धन यांचा जन्म झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
B. com