6 June 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

6 June 2019 Current Affairs In Marathi

6 June 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (6 जून 2019)

रोजगारवाढीसाठी पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली दोन कॅबिनेट समित्यांची स्थापना :

  • मोदी सरकारच्या द्वितीय कार्यकाळास सुरूवात झाल्यानंतर काही दिवसाताच बेरोजगारीची समोर आलेली आकडेवारी पाहता, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली देशाच्या अर्थव्यवस्थेतील मंदी व वाढत्या बेरोजगारीशी सामना
    करण्यासाठी दोन नव्या कॅबिनेट समित्या तयार करण्यात आल्या आहेत.
  • पंतप्रधान मोदींनी आर्थिक विकास व गुंतवणुक तथा रोजगार वाढवण्याच्यादृष्टीने या नव्या समित्यांची स्थापना केली आहे.
  • तर गुंतवणुक व विकासावर आधारित समितीत गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व रेल्वे मंत्री पियूष गोयल यांचा समावेश आहे.
  • याशिवाय रोजगार आणि कौशल्य विकासावर आधारीत आणखी एक समिती स्थापन्यात आली आहे.
  • ज्यामध्ये गृहमंत्री अमित शहा, अर्थ मंत्री निर्मला सीतारमण, रेल्वे मंत्री पियूष गोयल, कृषि व पंचायत राज मंत्री नरेंद्र सिंह तोमर, मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, कौशल्य व उद्योजिकता विकास मंत्री महेंद्र पांडे, राज्य मंत्री संतोष कुमार गंगवार आणि हरदीप सिंह पुरी यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (5 जून 2019)

NEET परीक्षेचे निकाल जाहीर :

  • NEET -2019 परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये राजस्थानच्या नलिन खंडेलवालने टॉप करत देशात पहिला येण्याचा मान मिळवला. त्याने 720 मधून 701 गुणांची कमाई केली.
  • तर दिल्लीच्या भाविक बंसलने दुसरा, तर उत्तर प्रदेशच्या अक्षत कौशिकने तिसरा क्रमांक पटकावला. महाराष्ट्राच्या सार्थक भट याने 720 पैकी 695 गुणांची कमाई करत देशात सहावा येण्याचा मान मिळवला.
  • तर मुलींमध्ये माधुरी रेड्डी हिने टॉप केले असून तिचा ऑल इंडिया रॅक सातवा आहे.
  • माधुरी रेड्डी हिने 720 मधून 695 गुणांची कमाई केली आहे. दरम्यान, पहिल्या 100 जणांमध्ये 20 मुलींचाही समावेश आहे. दिव्यांग श्रेणीमध्ये उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशच्या सभ्यता सिंग कुशवाला हिने टॉप केले. तिने 610 गुण मिळवत दिव्यांग श्रेणीतून पहिले येण्याचा मान मिळवला.

Google Maps देणार भारतीयांसाठी तीन खास फीचर्स :

  • लोकेशन शोधण्यासाठी गुगल मॅप्सचा वापर केला जातो. भारतीय युजर्सचा विचार करून गुगल मॅप्सने खास तीन नवीन इंडिया सेंट्रिक फीचर्स आणले आहेत. या तीन नेव्हिगेशन फीचर्सच्या मदतीने युजर्स पब्लिक ट्रान्सपोर्ट
    नेविगेट करू शकता.
  • तसेच Train, Bus आणि Metro मधून प्रवास करणाऱ्या युजर्ससाठी हे नवीन फीचर्स फायदेशीर असणार आहेत.
  • गुगल मॅप्समधील पहिलं फीचर हे सार्वजनिक बसमधून प्रवास करणाऱ्या युजर्सना प्रवासासाठी किती वेळ लागेल याची माहिती देणार आहे. तसेत त्या मार्गावर असणाऱ्या ट्रॅफिकबाबत सांगणार आहे. तसेच प्रवासी हे दुसऱ्या मार्गाने प्रवास
    करण्याचा विचार करत असतील तर त्यांना त्याबाबत यामध्ये माहिती देण्यात येणार आहे. प्रवासाठी इतर पर्याय यामुळे शोधता येतात. लांबचा प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना ट्रेनचं लाईव्ह रनिंग स्टेटस दिसण्याची सुविधा देण्यात आली आहे.
  • रियल टाईम बस ट्रॅव्हल इन्फॉर्मेशन : गुगल मॅप्सच्या या फीचरच्या मदतीने बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्या मार्गावरील ट्रॅफिकची स्थिती समजणार आहे. प्रवाशांना अनेकदा ट्रॅफीकबाबत माहिती मिळत नाही मात्र आता या फीचरच्या मदतीने रोज प्रवास करण्याऱ्या
    प्रवाशांचा फायदा होणार आहे.
  • लाईव्ह ट्रेन स्टेटस : अनेक प्रवासी ट्रेनने लांबचा प्रवास करत असतात. या फीचरच्या मदतीने या प्रवाशांचा फायदा होणार आहे. भारतीय रेल्वे नेटवर्कच्या मदतीने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. त्यांच्यासाठी हे फीचर फायदेशीर ठरणार आहे. या
    फीचरमध्ये ट्रेनचं लाईव्ह रनिंग स्टेटस दिसणार आहे.
  • मिक्सड मोड नेव्हिगेशन विद ऑटो रिक्षा रेकोमेंडेशन : बस आणि ट्रेनने प्रवास करण्यासोबतच ऑटो रिक्षाने देखील अनेक प्रवासी प्रवास करत असतात. या फीचरच्या मदतीने युजर्सना कोणत्या ठिकाणी रिक्षा बदलता येतील याची माहिती मिळते. तसेच तुमचं ठिकाण आणि तुम्हाला जायचं
    असलेलं ठिकाण यासाठी अंदाजे किती रुपये खर्च येईल याची देखील फीचरमध्ये माहिती मिळते. आता केवळ दिल्ली आणि बंगळुरू मध्ये हे फीचर सुरू करण्यात आलं आहे. मात्र लवकरच ते सर्वत्र रोलआऊट करण्यात येईल.

दिनविशेष :

  • 6 जून 1674 मध्ये रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
  • गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सची स्थापना 6 जून 1930 मध्ये झाली.
  • 6 जून 1969 मध्ये वि.स. पागे समितीची शिफारस, रोजगार हमी योजनेस सुरुवात झाली.
  • भारताचे राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलम यांनी 6 जून 2004 रोजी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून घोषित केली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (7 जून 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.