27 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

27 April 2019 Current Affairs In Marathi

27 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (27 एप्रिल 2019)

महिला ‘आयपीएल’मधून ऑस्ट्रेलियाची माघार:

  • पुरुषांच्या क्रिकेट मालिकेच्या पुनर्आखणीसंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (बीसीसीआय) वाद सुरू असल्यामुळे ऑस्ट्रेलियाने पुढील महिन्यात होणाऱ्या महिलांच्या इंडियन प्रीमियर लीगमधून (आयपीएल) माघार घेतली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया वेठीस धरत असल्याचा आरोप ‘बीसीसीआय’ने केला आहे.
  • मेग लॅनिंग, एलिस पेरी आणि एलिसा हिली या तीन क्रिकेटपटूंना महिला ‘आयपीएल’मध्ये सहभागी होण्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मज्जाव केला आहे. 6 ते 11 मे या कालावधीत जयपूर येथे तिरंगी स्पर्धा होणार आहे.
  • पुरुषांची एकदिवसीय मालिका पुढे ढकलण्यात यावी, यासाठी ‘बीसीसीआय’वर दडपण आणण्याच्या हेतूने क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ अधिकारी बेलिंडा क्लार्क (माजी कर्णधार) यांनी हा ई-मेल पाठवला आहे.
  • नव्या दौरा आखणी कार्यक्रमांतर्गत ऑस्ट्रेलियाला जानेवारी 2020 मध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळावी लागणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 एप्रिल 2019)

भास्कर कांबळी 2019 चा मुंबई महापौर श्री:

  • ग्रेस फिटनेसच्या भास्कर कांबळीने एकापेक्षा एक अशा सरस असलेल्या खेळाडूंवर सहज मात करीत मुंबई महानगर पालिकेचा पुरस्कार लाभलेल्या प्रतिष्ठेच्या मुंबई महापौर श्री 2019 वर आपले नाव कोरले आणि शरीरसौष्ठव हंगामाचा आपला शेवट दणदणीत केला. Bhaskar-Kambli
  • पालिकेकडून केवळ दीड लाखांचा तुटपंजा निधी मिळाला असतानाही बृहन्मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि उपनगर बॉडीबिल्डींग आणि फिटनेस असोसिएशन यांनी पुन्हा एकदा दमदार शरीरसौष्ठव स्पर्धा घेण्याचे धाडस दाखवले.
  • सर्वत्र निवडणूकांची रणधुमाळी सुरू असल्यामुळे या स्पर्धेला फारसे कॉर्पोरेट तसेच राजकीय बळही लाभू शकले नाही. तरीही संघटनेचे अध्यक्ष अमोल कीर्तीकर आणि अजय खानविलकर यांनी पुन्हा एकदा शरीरसौष्ठव खेळाला आर्थिक बळ दिले.
  • क्रीडाप्रेमी संतोष राणे यांनी केलेल्या सहकार्यामुळे अनंत अडचणी येऊनही यंदाही मुंबई महापौर श्री स्पर्धा मोठ्या दिमाखात पार पडल्याचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी सांगितले. आमचा खेळ असंख्य क्रीडाप्रेमी संघटक आणि हितचिंतकांमुळे आर्थिकदृष्ट्या चांगलाच सक्षम झाल्याचेही सावंत म्हणाले.

माळढोक पक्ष्यांचे अस्तित्व नाममात्र:

  • आययूसीएनच्या (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर) ‘लाल यादीत’ लुप्तप्राय प्रजाती म्हणून नोंद झालेल्या माळढोक पक्ष्याला वाचवण्यासाठी सँच्युरी नेचर फाऊंडेशन, कन्झर्वेशन इंडिया आणि द कार्बेट फाऊंडेशन यांनी आपत्कालीन मोहीम सुरू केली आहे.
  • जगभरात पक्ष्यांना वाचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रणनीतीचा वापर या मोहिमेसाठी करण्यात आला आहे. यात माळढोकचा वावर असणाऱ्या महत्त्वपूर्ण ठिकाणांवरील वीज तारा भूमिगत करणे, या पर्यायाचा समावेश आहे.
  • गेल्या 50 वर्षांत 90 टक्के माळढोकचे अस्तित्व नाहीसे झाले आहे. या पक्ष्याच्या अलीकडच्या सर्वेक्षणात 150 पेक्षाही कमी जंगलात त्यांचे अस्तित्व राहिले आहे. या सर्वेक्षणात मध्यप्रदेशातून तर ते कधीचेच नाहीसे झाल्याचा निष्कर्ष आहे, तर महाराष्ट्रात त्यांची संख्या केवळ आठ इतकी आहे. कधीकाळी हाच पक्षी भारतातील बारा राज्यात आणि पाकिस्तानच्या काही भागात आढळून येत होता.
  • भारतीय वन्यजीव संस्था (डेहराडून) व भारतीय विज्ञान संस्था (बंगळुरू) येथील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात या पक्ष्यांमध्ये एक कमी अनुवंशिक विविधता आढळून आली. त्यावरून त्यांची संख्या गेल्या अनेक वर्षांपासून कमी कमी होत जाऊन संपण्याच्या मार्गावर असल्याचे निष्पन्न झाले.

आशियाई क्रीडा स्पर्धेत विनेश, साक्षीला कांस्यपदक:

  • रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती साक्षी मलिक आणि आशियाई क्रीडा स्पध्रेतील विजेत्या विनेश फोगटला आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतीय महिलांना या स्पध्रेत एकही सुवर्णपदक जिंकता आले नाही. vinesh fogat
  • साक्षीला 62 किलो वजनी गटामध्ये उपांत्यपूर्व सामन्यात पराभव पत्करावा लागला, परंतु कांस्यपदकाच्या ‘प्ले-ऑफ’ सामन्यात साक्षीने उत्तर कोरियाच्या ह्य़ोन ग्याँग मूनला नमवून कांस्यपदक पटकावले.
  • स्पर्धेच्या प्रारंभी साक्षीने व्हिएतनामच्या थाय माय हॅन्ह नग्युएनला पराभूत करीत आगेकूच केली. मात्र दुसऱ्या फेरीत जपानच्या युकाको कावाईकडून तिला पराभव पत्करावा लागला. मात्र कावाई अंतिम फेरीपर्यंत पोहोचल्याने साक्षीला रेपिचेजमध्ये पुन्हा संधी मिळाली.
  • ‘रेपिचेज’ फेरीत साक्षीने तांत्रिक गुणांआधारे जिआई चोयवर मात केली. या स्पर्धेपूर्वी विनेशने 50 किलो वजनी गटात जकार्ता एशियाडमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. मात्र, ऑलिम्पिकच्या दृष्टीने कुस्तीसाठी नवीन वजनी गट निश्चित केल्यामुळे तिने 53 किलो गट निवडला.

‘ईपीएफ’वर यंदा 8.65 टक्के व्याज मिळणार:

  • आर्थिक वर्ष 2018-19 साठी कर्मचारी भविष्य निधीवर (ईपीएफ) 8.65 टक्के व्याज देण्याच्या कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) प्रस्तावाला केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
  • यामुळे ईपीएफओच्या 6 कोटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय अर्थ मंत्रालयांतर्गत वित्तीय सेवा विभागाने (डीएफएस) ईपीएफओच्या चालू आर्थिक वर्षासाठी ईपीएफ 8.65 व्याज देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
  • सुत्रांनी सांगितले की, वित्तीय सेवा विभागाने रिटायरमेंट फंडच्या पुरेशा व्यवस्थापनाशी निगडीत काही अटी पूर्ण करण्याच्या आधारावर ईपीएफओच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
  • याआधी फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय कामगार राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार यांच्या अध्यक्षतेखालील ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने चालू आर्थिक वर्षासाठी ईपीएफ व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.
  • गेल्या तीन वर्षांत ईपीएफच्या व्याजदरात केलेली ही पहिली वाढ आहे. 2015-16 या आर्थिक वर्षात 8.8 टक्के इतका व्याजदर होता, तो 2016-17 मध्ये 8.65 टक्क्यांवर आणण्यात आला. 2017-18 मध्ये तो 8.55 टक्के म्हणजे आणखीच घट करण्यात आली. मात्र, आता 2018-19 मध्ये वाढ करण्यात आली आहे.
  • अर्थ मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर आता आयकर विभाग आणि श्रम मंत्रालय 2018-19 साठी व्याजदरची अधिसूचना जारी करेल. त्यानंतर ईपीएफओ आपल्या 120 हून अधिक क्षेत्रिय कार्यालयांना कर्मचाऱ्यांच्या खात्यात व्याजदर जमा करण्यासाठी निर्देश देईल.

विश्वचषकाच्या 22 पंचांमध्ये भारताचे फक्त एक पंच:

  • इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी तीन विश्वविजेते खेळाडू आणि सुंदरम रवी या एकमेव भारतीय पंचाचा 22 जणांच्या सामनाधिकाऱ्यांच्या चमूत समावेश करण्यात आला आहे.
  • 48 दिवसांच्या विश्वचषकासाठी एकूण 16 पंच, सहा सामनाधिकारी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (आयसीसी) निवड केली आहे.
  • तर यात डेव्हिड बून, ब्रुस ऑक्सनफोर्ड, कुमार धर्मसेना, आलीम दर यांचा समावेश आहे. उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी पंच व सामनाधिकाऱ्यांची नेमणूक राऊंड रॉबिन टप्प्यांचे सामने संपल्यानंतर जाहीर केली जाईल.

दिनविशेष:

  • मोर्स कोडतारायंत्राचे जनक आणि चित्रकार सॅम्युअल मोर्स यांचा जन्म 27 एप्रिल 1791 रोजी झाला.
  • सन 1854 मध्ये पुण्याहून मुंबईला तारायंत्राव्दारे पहिला संदेश पाठविला गेला.
  • चौथ्या ऑलिम्पिक खेळांना सन 1908 मध्ये लंडन येथे सुरुवात झाली होती.
  • सन 1961 मध्ये सिएरा लिओनला ग्रेट ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळाले.
  • एकाच अग्निबाणाव्दारे एकापेक्षा अधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याची प्रणाली सन 1999 मध्ये भारतात तयार झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 एप्रिल 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.