25 February 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
25 February 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (25 फेब्रुवारी 2019)
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारतीय चित्रपट निर्मातीची मोहोर:
- OSCAR 2019 चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानाच्या समजल्या जाणाऱ्या 91व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारतीय चित्रपट निर्मातीने आपली मोहोर उमटवली आहे.
- भारतीय चित्रपट निर्माती गुनित मोंगा यांच्या ‘पिरियड. एंड ऑफ सेंटेंस‘ ला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्टचा ऑस्कर प्रदान करण्यात आला आहे.
- गुनीत मोंगा यांनी ट्विट करत आपला आनंद व्यक्त केला आहे. ‘या धरतीवरील प्रत्येक स्त्रीला ती देवीचा अवतार आहे असं वाटलं पाहिजे. आम्हा सर्वांचा विजय झाला आहे’ अशा शब्दात गुनीत मोंगा यांनी आपला आनंद ट्विटरवर व्यक्त केला आहे.
- हा माहितीपट दिल्लीतील हपूर गावावर आधारित आहे. या गावामध्ये देखील मासिकपाळीबद्दल अनेक गैरसमज लोकांच्या मनात आहेत. मासिकपाळीच्या दरम्यान घ्यायच्या काळजीबद्दल अनेक महिला अनभिज्ञ आहेत त्यामुळे या महिलांना आरोग्याच्या अनेक तक्रारींना समोर जावं लागतं.
- तर या गावात सॅनिटरी पॅड्स बनवणारं मशिन बसवलं जातं. पैसे जमाकरून हे मशिन्स बसवलं जातं त्यानंतर महिला पॅड्स तयार करायला शिकतात, आरोग्याविषयी जागृती निर्माण होते साधरण अशा स्वरुपाचा प्रवास या माहितीपटात आहे.
Must Read (नक्की वाचा):
ISSF स्पर्धेत भारताच्या सौरभचा विश्वविक्रम:
- भारतात सुरु असणाऱ्या ISSF shooting World Cup स्पर्धेत भारताचा 16 वर्षीय नेमबाज सौरभ चौधरी याने विश्वविक्रम करत सुवर्णपदक मिळवले.
- 10 मीटर एअर पिस्टल पुरुष गटात त्याने 245 गुण कमवले आणि थेट ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले. या सुवर्णकमाईमुळे भारताच्या खात्यात दुसरे सुवर्णपदक जमा झाले.
- तर याआधी अपूर्वी चंदेला हिने 10 मी. एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर वरिष्ठ गटात नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत सहभागी होत सौरभने ही कामगिरी केली.
- सौरभने आशियाई स्पर्धेतही 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. त्यावेळी त्याने 240.7 गुण मिळवले होते. त्यानंतर अवघ्या 16व्या वर्षाच्या सौरभने भारताला विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून दिले.
- सौरभ प्रथमच वरिष्ठ आंतरराष्ट्रीय नेमबाजी गटात सहभागी झाला होता आणि त्याने इतिहास रचला. त्याने 245 गुण मिळवले आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूतक केले. या स्पर्धेत सर्बियाच्या दामीर मायकेसने 239.3 गुणांसह रौप्य पदक तर चीनच्या पँग वेईने 215.2 गुणांसह कांस्यपदक पटकावले.
टी-20 सामन्यातील सर्वोच्च धावसंख्येची नोंद:
- देहरादूनच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानात खेळवण्यात येत असलेल्या आयर्लंड विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 सामन्यात इतिहासाची नोंद झाली आहे.
- 3 गड्यांच्या मोबदल्यात 278 धावांपर्यंत मजल मारत अफगाणिस्तानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्येची नोंद केली आहे. या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने ऑस्ट्रेलियन संघाचा 236 धावांचा विक्रम मोडीत काढला. 2016 साली श्रीलंकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाने या विक्रमाची नोंद केली होती.
- हजरतउल्ला झजाई (62 चेंडूत 162 धावा) आणि उस्मान घानी (48 चेंडू 73 धावा) यांनी सलामीच्या जोडीसाठी 236 धावांची भागीदारी रचत आणखी एका विक्रमाची नोंद केली. हजरतउल्लाच्या नाबाद 162 धावा या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही आशियाई फलंदाजाने केलेल्या सर्वोत्तम धावा ठरल्या आहेत.
- अफगाणिस्तानने दिलेले 279 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडनेही चांगली लढत दिली. मात्र त्यांचा संघ 20 षटकात 6 गड्यांच्या मोबदल्यात 194 धावांपर्यंत मजल मारु शकला. या विजयासह अफगाणिस्तानने 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा सूत्रसंचालकाविनाच:
- चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानाच्या समजल्या जाणाऱ्या 91व्या ऑस्कर पुरस्काराला सुरूवात झाली आहे. कॅलिफोर्नियामधल्या डॉल्बी थिएटरमध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडत आहे.
- अनेक दिग्गज कलाकारांची उपस्थिती या सोहळ्यासाठी लाभली आहे. यंदाचा ऑस्कर कोणत्या चित्रपटाला मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
- ‘दी बोहेमियन ऱ्हाप्सडी‘, ‘रोमा‘, ‘ब्लॅक पँथर‘मध्ये चुरस पाहायाला मिळत आहे. आतापर्यंत ‘दी बोहेमियन ऱ्हाप्सडी’ आणि ‘रोमा’ च्या खात्यात चार आणि ‘ब्लॅक पँथर’ च्या खात्यात प्रत्येकी दोन ऑस्कर जमा झाले आहेत.
- यंदाच्या ऑस्कर सोहळा काही दिवसांपूर्वी वादात सापडला होता. ‘दी अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅण्ड सायन्सेस’ने चार मोठ्या श्रेणीतील पुरस्कार यंदा ऑफ एअर देण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे मोठा वाद झाला होता. पण त्याचबरोबर 1989 नंतर पहिल्यांदाच हा सोहळा सुत्रसंचलकाशिवाय पार पडत आहे.
निर्माणाधीन घरांवरील जीएसटी घट:
- केंद्र सरकारने दिलासादायक निर्णय घेताना निर्माणाधीन घरांवरील जीएसटी 12 वरून 5 टक्क्यांवर आणला आहे, तर सवलतीच्या घरांवरील जीएसटी देखील 8 वरून एका टक्क्यावर आणला आहे.
- 24 फेब्रुवारी रोजी जीएसटी परिषदेच्या झालेल्या बैठकीमध्ये या दरकपातीबाबत निर्णय घेण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अरुण जेटली यांनी याबाबत माहिती दिली.
- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची बैठक झाली. गृहखरेदीवर आकारण्यात येणाऱ्या जीएसटीमध्ये कपात करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
- मात्र कररचनेतील या नव्या बदलानंतर बिल्डरांना इनपुट टॅक्स क्रेडिटसाठी दावा दाखल करता येणार नाही. ‘रियल इस्टेट क्षेत्राला चालना देण्यासाठी हे बदल केले असून यामुळे अधिकाधिक लोकांना याचा लाभ घेता येईल आणि बांधकाम क्षेत्राला या कपातीचा मोठा फायदा मिळेल’, असं जेटली यावेळी म्हणाले.
- ‘बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, कोलकाता आणि मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये 60 चौ. मीटर कार्पेट एरियापर्यंतची घरे परवडणारी मानली जातील तर नॉन मेट्रो शहरात 90 चौ. प्रति मीटरची घरे परवडणारी मानली जातील. या घरांची कमाल किंमत 45 लाख रुपये असेल. हे नवे दर 1 एप्रिल 2019 पासून लागू होतील’ अशी माहितीही जेटलींनी यावेळी दिली.
दिनविशेष:
- 1510 यावर्षी पोर्तुगीज सरदार अल्बुकर्क याने अकस्मात हल्ला करुन पणजीचा किल्ला जिंकला होता.
- फॉक्स मॉथ विमानाद्वारे सन 1935 यावर्षी मुंबई – नागपूर – जमशेदपूर या मार्गावरील हवाई टपाल सेवेला प्रारंभ झाला.
- मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी सन 1968 मध्ये भारताचे 11वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
- सन 1996 मध्ये स्वर्गदारा तील तार्याला (Star in the gate of heavens) वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा