23 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

23 January 2019 Current Affairs In Marathi

23 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (23 जानेवारी 2019)

91व्या ऑस्कर पुरस्कारांची नामांकने जाहीर:

  • येत्या 24 फेब्रुवारीला प्रदान करण्यात येणाऱ्या 91व्या ऑस्कर पुरस्कारांची नामांकने जाहीर झाली असून त्यात रोमा आणि द फेव्हरिट यांना सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी दहा नामांकने मिळाली आहेत.
  • रोमा या चित्रपटाची कथा मेक्सिको राष्ट्रात घडते. त्याचे दिग्दर्शन अल्फान्सो क्वारोन यांनी केले आहे. सर्वोत्कृष्ट परभाषिक चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट या दोन्ही गटात त्याला नामांकने मिळाली आहेत.
  • उत्कृष्ट सहअभिनेत्रीसाठी रोमाची अभिनेत्री मारिना डी टॅव्हिरा हिला अनपेक्षित नामांकन मिळाले असून ‘अ स्टार इज बॉर्न‘ या चित्रपटास उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट अभिनेत्री (लेडी गागा), उत्कृष्ट अभिनेता (ब्रॅडले कूपर) यासाठी नामांकने आहेत.
  • सहअभिनेत्रीसाठी अ‍ॅमी अ‍ॅडम्स (व्हॉइस) एमा स्टोन (द फेव्हरिट) यांना नामांकने असून उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी ‘दी वाइफ’ मधील ग्लेन क्लोज हिला नामांकन मिळाले आहे. ख्रिस्तियन बेल, महेर्शला अली, सॅम रॉकवेल, रेचल वेझ यांचाही नामांकनात समावेश आहे.
  • यंदाचे उत्कृष्ट चित्रापट- ब्लॅक पँथर, ब्लॅक क्लान्झमन, दी बोहेमियन ऱ्हाप्सडी, द फेव्हरिट, ग्रीन बुक, रोमा, अ स्टार इज बॉर्न, व्हाइस.

ऑनलाइन निवडणूक जाहिरातीत गुगल पारदर्शकता ठेवणार:

  • भारतात लोकसभा निवडणुकीच्या वेळी केल्या जाणाऱ्या जाहिरातीत पारदर्शकता राखली जाईल असे गुगलने स्पष्ट केले आहे. Google
  • या काळात ज्या राजकीय जाहिराती गुगलवरून केल्या जातील, त्यात जाहिरातदार व त्यांनी त्यासाठी खर्च केलेला पैसा हा तपशील जाहीर करण्यात येईल असे गुगलने सांगितले. ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळाने याबाबत अशीच भूमिका आधी जाहीर केली आहे.
  • गुगलने एका निवेदनात म्हटले आहे, की भारतासाठी आम्ही निवडणूक किंवा राजकीय जाहिरातींबाबत धोरण आखले असून त्यात जाहिरातदारांना निवडणूक आयोगाकडून जाहिरात करण्यापूर्वी सक्षम अधिकाऱ्याच्या सहीचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. जाहिरातदारांची ओळखही तपासून पाहिली जाणार आहे.
  • ऑनलाइन निवडणूक जाहिरातीत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी भारत विशिष्ट राजकीय जाहिरात पारदर्शकता अहवाल व राजकीय जाहिराती शोध वाचनालय या सुविधा दिल्या जाणार आहेत. निवडणूक जाहिराती कोण देत आहे व त्यावर किती पैसा खर्च केला जात आहे, याची माहिती त्यामुळे उघड होणार आहे.
  • जाहिरातदार तपासणी प्रक्रिया 14 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून पादशर्कता अहवाल व जाहिरात वाचनालय मार्च 2019 मध्ये थेट प्रदर्शित केले जाईल.
  • देशातील निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्यास समाजमाध्यमांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला होता. बेकायदेशीर मजकूर टाळण्यासाठी काही साधने उपलब्ध करण्यात यावीत, असे नवीन नियमात सरकारने म्हटले आहे.

मुंबईतील महिलांसाठी सुरक्षा योजना:

  • आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. निवृत्तीनंतरही पोलिसांना जन आरोग्य सेवेचा लाभ, मुंबईतील महिलांसाठी सुरक्षा योजना, दिव्यांगांना फिरती दुकाने देण्यासंदर्भात निर्णय या वेळी घेण्यात आले.
  • विशेष म्हणजे या शिवाय पुण्यातील 134 वर्षे जुन्या नामवंत फर्ग्युसन महाविद्यालयाचे रुपांतर विद्यापीठात करण्यालाही मान्यता देण्यात आली.
  • सार्वजनिक ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने सुरक्षित शहर प्रकल्पांतर्गत सुरू केलेली महिला सुरक्षितता पुढाकार योजना देशातील मुंबई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, चेन्नई, बंगलुरू, अहमदाबाद या शहरात राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
  • तर या योजनेत केंद्र आणि राज्य शासनाचा हिस्सा अनुक्रमे 60 आणि 40 टक्के असा आहे. मुंबईसाठी केंद्र सरकारकडून 151 कोटी तर राज्य शासनाकडून 100 कोटी रुपये देणार असून या योजनेसाठी एकूण 252 कोटी रुपए मंजूर करण्यात आले आहेत.

कोहलीला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जाहीर:

  • मैदानावर रोज नवे विक्रम नोंदवित असलेल्या ‘किंग कोहली‘ची ‘विराट‘ छाप आयसीसीच्या वार्षिक पुरस्कारामध्ये अनुभवाला मिळाली. त्यात ‘क्लीन स्वीप‘ करताना भारतीय कर्णधार कसोटी, वन-डे आणि वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराचा मानकरी ठरलेला जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
  • तसेच आयसीसीने त्याची वर्षातील सर्वोत्तम खेळाडूंचा समावेश असलेल्या कसोटी व वन-डे संघाचा कर्णधार म्हणून निवड जाहीर केली. Virat Kohali
  • 2018 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या कोहलीची वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूला दिल्या जाणार्‍या सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफीसह आयसीसीचा सर्वोत्तम कसोटी व वन-डे खेळाडू म्हणून निवड झाली.
  • प्रतिष्ठेच्या या तिन्ही पुरस्कारासाठी निवड झालेला कोहली क्रिकेट इतिहासातील पहिला खेळाडू ठरला. कोहली सलग दुसर्‍या वर्षी गारफिल्ड सोबर्स ट्रॉफीचा मानकरी ठरला.
  • आयसीसीने स्पष्ट केले की, ‘कोहली आयसीसीचे हे तीन प्रमुख पुरस्कार पटकाविणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याचसोबत त्याची आयसीसी कसोटी व वन-डे संघाच्या कर्णधारपदी निवड जाहीर झाली आहे.’

केंद्रीय शिक्षण संस्थांमधील जागा 3 लाखांनी वाढणार:

  • खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांना 10 टक्के आरक्षण दिल्यानंतर आता केंद्र सरकारने यासंदर्भात आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.
  • केंद्र सरकारअंतर्गत येणाऱ्या शिक्षण संस्थांमध्ये (उदा. आयआयटी, आयआयएम आणि एनआयटी) जागा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • तर यामुळे आयआयटी, आयआयएम, एनआयटीसह अन्य केंद्रीय विद्यापीठ आणि शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांसाठी जवळपास 3 लाख जागा वाढणार आहे. याचा फायदा खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देखील होणार आहे.
  • केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे 2021 पर्यंत आयआयटीत तब्बल 5100 नवीन जागांची भर पडणार आहे. आर्थिक दुर्बलांना 10 टक्के आरक्षण दिल्याने आयआयएममध्ये 817, एनआयटीत 4500 नवीन जागांची भर पडेल. दिल्ली विद्यापीठात 16375 जागा, जेएनयूत 346 जागा, विश्वभारतीमध्ये 822 जागा आणि जामिया मिलिया इस्लामियात 2275 जागांची भर पडणार आहे.
  • केंद्र सरकारने 2019-20 या वर्षात जागा वाढवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या शिक्षण संस्था आणि विद्यापीठांमध्ये सुमारे 25 टक्क्यांनी जागा वाढतील.

दिनविशेष:

  • सन 1708 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला. त्याच दिवशी सातारा ही राज्याची नवी राजधानी जाहीर केली गेली होती.
  • डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल ही सन 1849 मध्ये वैद्यकशास्त्रातील पहिल्या महिला पदवीधर बनल्या.
  • ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ यांचा जन्म 23 जानेवारी 1897 मध्ये झाला होता.
  • उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव कमलनयन बजाज यांचा जन्म 23 जानेवारी 1915 मध्ये झाला.
  • हिंदुहृदयसम्राट ‘बाळासाहेब ठाकरे’ यांचा जन्म 23 जानेवारी 1926 मध्ये झाला होता.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.