सांकेतिक भाषा – अंक (बुद्धिमत्ता चाचणी) विषयी संपूर्ण माहिती

Sanketik Bhasha

सांकेतिक भाषा – अंक (बुद्धिमत्ता चाचणी) विषयी संपूर्ण माहिती

सांकेतिक भाषेतील उदाहरणे सोडवितांना प्रथम त्या उदाहरणातील अक्षरांना देण्यात आलेले सांकेतिक क्रमांक विचारात घ्यावेत. त्या सांकेतिक क्रमांकाच्या आधारे आपणास प्रश्न सोडविता येते. उदा.

1. एका सांकेतिक भाषेत A = 1, B = 2, C = 3 —- Z = 26, तर BEAR = ?

  • 24118
  • 25118
  • 23118
  • 25119
स्पष्टीकरण:
वरील उदाहरणामध्ये प्रत्येक अक्षराला इंग्रजी अक्षरमालिकेनुसार क्रमांक देण्यात आलेले आहेत.
A = 1, B = 2, C = 3 —- Z = 26, या नुसार BEAR करिता 25118 हा सांकेतिक क्रमांक येईल.

2. एका सांकेतिक भाषेत SOME = 2016146, तर SYSTEM = ?

  • 19251920513
  • 20262021614
  • 202620146
  • 2120172416
स्पष्टीकरण:
वरील उदाहरणामध्ये प्रत्येक अक्षराला A = 2, B = 3, C = 4, —- Z = 27, या नुसार क्रमांक देण्यात आले आहेत. या क्रमांकानुसार उत्तर 202620216143 येईल.

3. एका सांकेतिक लिपीत AND = 19 तर BUT = ?

  • 52
  • 40
  • 43
  • 45
स्पष्टीकरण:
वरील उदाहरणामध्ये प्रत्येक अक्षराला A = 1, B = 2, C = 3, —- Z = 26, या नुसार क्रमांक देण्यात आले आहेत. यानुसार AND या तीन अक्षरांच्या ठिकाणी येणार्‍या क्रमांकाची बेरीज केल्यास ती 19 येते. या नुसार BUT या अक्षरांच्या ठिकाणी येणार्‍या अक्षरांची बेरीज केल्यास ती 43 येईल.

4. एका सांकेतिक लिपीत BOARD = 2, 3, 4, 5, 6 PEN = 128, तर NABARD = ?

  • 854361
  • 316785
  • 853567
  • 842456
स्पष्टीकरण:
वरील उदाहरणामध्ये BOARD = 2, 3, 4, 5, 6 PEN = 128, क्रमांक देण्यात आले आहेत. या दोन्ही अक्षरगटातील क्रमांक एकत्र करून NABARD चा क्रमांक काढल्यास तो 842456 असा येईल.

5. सांकेतिक लिपीत BAD हा शब्द 14 असा लिहिला तर MAD हा शब्द कसा लिहाल:

  • 16
  • 36
  • 45
  • 60
स्पष्टीकरण:
वरील उदाहरणामध्ये प्रत्येक अक्षराला A = 1, B = 2, C = 3, —– Z = 25, या नुसार क्रमांक देण्यात आले आहेत. BAD या अक्षरांच्या ठिकाणी येणार्‍या क्रमांकाची बेरीज करून त्याला 2 ने गुणल्यास 14 येते. या नुसार MAD या अक्षरांच्या ठिकाणी येणार्‍या अक्षरांची बेरीज करून त्याला 2 ने गुणल्यास 36 येईल.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.