गांधीजींचे पदार्पण
गांधीजींचे पदार्पण
Must Read (नक्की वाचा):
- स्वातंत्र्यचळवळीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा 1919 मध्ये सुरु झाला. त्यावेळी प्रथमच जनआंदोलनांनी सुरवात झाली.
- पहिल्या महायुध्दकाळात ब्रिटन, फ्रान्स व अमेरिका हया दोस्त राष्ट्रांनी जाहीर केले होते की, जागतिक महायुध्द हे लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि सर्व राष्ट्रांचा स्वयंनिर्णयाचा हक्क प्रस्थापित करण्यासाठीच लढले जात आहे.
- पण युध्दात विजी झाल्यानंतर वसाहतवादी साम्राज्यसत्ता नाहीशी करण्यास ते फारसे उत्सुक दिसेनात. भारतीयांनी युध्दप्रयत्नात सर्व सहकार्य दिले होते एवढेच नव्हे तर युध्दाची झळ मोठया प्रमाणात सोसली होती. त्याचे योग्य चीज होईल, अशी त्यांना आशा होती.
- पण त्याचा लवकरच भाषांतरांवरूनरमनिरास झाला.
- ब्रिटिशांनी घटनात्मक सुधारणांचे थातुरमातुर प्रयत्न केले असले तरी खरी राजकीय सत्ता सोडण्याची त्यांची बिलकूल तयारी नव्हती आणि आता एक नवे नेते श्री. मोहनदास करमचंद गांधी यांनी लढयाची सूत्रे आपल्या हाती घेतली.
- पूर्वीच्या नेतृत्वातील मूलभूत उणिवा हेरुन त्या दूर करण्याचे त्यांचे प्रयत्न होते. त्यांनी लढयाची एक नवीनच पध्दत रुढ केली, ती म्हणजे असहकार.
- तसेच लढयाचे एक नवे तंत्र सत्याग्रह त्यांनी अंमलात आणले. त्यामुळे लढा हा केवळ एक कार्या न राहता तो प्रत्यक्ष अंमलात आणता येऊ लागला.
- या नव्या तंत्रांची गांधीजींनी दक्षिण आफ़्रिकेत यशस्वीरित्या चाचणी केली होती.
- गांधीजींनी चंपारण चे शेतकीर व अहमदाबाद चे कामगार हयांचे प्रश्नही हाती घेतले होते.
- या काळात देशाच्या वेगवेगळया भागांत महागाई एकदम वाढली आणि साथीचे रोग पसरले.
- जागतिक युध्द संपताच गांधीजींनी भारतीय जनतेच्या मनातील वाढत्या प्रक्षोभाला व लढाऊ प्रवृत्तीला प्रतिसाद देताना एका नव्या संघटनेची व तंत्राची निर्मिती केली. त्यामुळे त्या आंदोलनास जनतेच्या पाठिंब्याचा भक्कम आधार निर्माण झाला.
- मार्च 1919 मध्ये रौलट कायदा संमत करण्यात आला त्याद्वारा खटला न भरता कोणालाही तुंरुंगात डांबण्याचे अधिकार सरकारला मिळाले, त्यामुळे भारतीय जनतेचा मोठा अपमान झाला.
- फेब्रुवारी 1919 मध्ये गांधीजींनी सत्याग्रह सभा सुरु केली.
- हा कायदा मोडावयाचा व स्वत:ला अटक करवून घ्यायची अशी या सभेच्या सदस्यांची प्रतिज्ञा होती.
- अशा रीतीने राष्ट्रीय चळवळ म्हणजे केवळ एक आंदोलन न ठेवता जनतेच्या शक्तीचे प्रत्यक्ष राजकीय कृतींत रुपांतर करण्याच्या दृष्टीने गांधीजींनी पहिले पाऊल उचलले.
- त्याचबरोबर आता शेतकरी व कारागीरांवर अधिक विसंबून राहावयास हवे असा काँग्रेसने आग्रह धरला .
- खादी म्हणजेच हाताने कातलेल्या सुताचे हातमागावर विणलेले कापड वापरण्यावर भर हे त्याचेच एक प्रतिक होते.
- त्याच वेळी अमृतसरला कुप्रसिध्द जलियाॅंवाला बाग हत्याकांड घडले.
- 13 एप्रिल 1919 रोजी चहूबाजूंनी बंदिस्त असलेल्या या बागेत शांततापूर्ण जमावाला ब्रिटिश लष्कराच्या एका तुकडीने घेतले व बंदुका आणि मशिनगन्सच्या सहाय्याने अमानुष गोळीबार केला.
- त्याच वेळी युध्दानंतर तुर्कस्तानला औदार्याचे वागणूक देण्याचे आश्र्वासन ब्रिटिशांनी मोडले तुर्कस्तानच्या सुलतानाला खलिफा म्हणजे मुसलमानांचा धार्मिक प्रमुख मानण्यात येत असे.
- पण तेच धोक्यात आल्याने भारतीय मुसलमानांत तीव्र तिरस्कार निर्माण झाला.
असहकार आणि खिलाफत आंदोलन :-
- गांधीजींनी व काँग्रेसने असहकाराचे अहिंसक आंदोलन सप्टेंबर 1920 मध्ये सुरु केले.
- पंजाबात व खिलाफतीबद्दल जो अन्याय झाला होता तो दूर होऊन स्वराज्य मिळेपर्यंत ते चालू राहावयाचे होते.
- गांधीजींनी एका वर्षात स्वराज्य अशी घोषणा केली. सरकारमान्य शाळा महाविद्यालये, कोर्टकचेर्या, विधिमंडळे व परदेशी कापड हयांवर बहिष्कार घालण्याचा व सरकारने दिलेल्या पदव्या किताबांचा त्याग करण्याचा जनतेला आदेश देण्यात आला.
- नंतर सरकारी नोकर्याचे राजिनामे आणि करबंदी सुरु करुन या आंदोलनाला जनतेच्या सत्याग्रहाचे स्वरुप देण्याचा कार्या होता. राष्ट्रीय शाळा व महाविद्यालये सुरु करण्यात आली. स्वहस्ते सूत कातून खादी तयार करण्याचे, अस्पृश्यता न पाळण्याचे व हिंदू मुस्लिम ऐक्याचे संवर्धन करुन ते टिकविण्याचे जनतेला आदेश देण्यात आले. भाषिक आधारावर प्रांतिक काँग्रेस समित्या संचलित करण्यात आल्या.
- काँग्रेस संघटना अगदी खेडयांपर्यंत पोहोचली व तिच्या सभासदत्वाचे वार्षिक शुल्क केवळ चार आणे ठेवण्यात आले. ग्रामीण व शहरी भागांतील गरीब जनतेलाही सभासद होता यावे हा त्यामागचा उद्देश होता.
- या पहिल्या जनआंदोलनास 1920 ते 1922 दरम्यान अभूतपर्व स्वरुप प्राप्त झाले. लाखो विद्याथ्र्यांनी शाळा महाविद्यालये सोडली. शेकडो वकिलांनी आपली प्रॅक्टिस सोडून दिली.
- परदेशी कापडावरील बहिष्कार हे एक जनआंदोलन बनले व परदेशी कापडाच्या हजारो होळयांनी भारतीय नभोमंडळ उजळून गेले.
- परदेशी कापड विकणार्या व दारुच्या दुकानांवरील निरोधनाचा कार्याही विशेष यशस्वी ठरला.
- या आंदोलनात अनेक विभागांत कामगार आणि शेतकरी आघाडीवर होते. तरीही गांधीजी संतुष्ट नव्हते.
- ता. 5 फेब्रुवारीस चौरीचौराची घटना घडली.
- तीन हजार शेतकर्यांच्या एका काँग्रेस मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला व त्यचा सूड म्हणून प्रक्षुब्ध जमावाने पालिसचौकीच पेटवून दिली. त्यांत 22 पोलिस ठार झाले.
- गांधीजींनी हया प्रकाराची विशेष गांभीर्याने दखल घेतली व अहिंसात्मक चळवळीची जनतेला अद्याप योग्य शिकवण मिळाली नाही, असे वाटून त्यांनी 12 फेब्रुवारी 1922 रोजी हे आंदोलन मागे घेतले. मात्र या चळवळीचे परिणाम दीर्घकाळ टिकून राहणारे होते.
(1) त्यामुळे प्रथमच लक्षावधी शेतकरी व नागरी विभागांतील गरीब जनता राष्ट्रीय चळवळीच्या प्रवाहात आली. किंबहुना सार्या भारतीय जनतेलाच आता अस्मितेची जाणीव झाली. त्यात शेतकरी, कामगार, कारागीर, ददुकानदार, व्यापारी, डॉक्टर, इतर व्यावसायिक व कचेर्यांत काम करणार्या नोकरवर्गाचाही समावेश होता. स्त्रियांही या आंदोलनाकडे आकर्षित झाल्या. देशाच्या अगदी दूरवरच्या कोपर्यापर्यंत ही चळवळ फैलावली. किंबहुना जनतेची लढयाची प्रवृज्ञ्ल्त्;ाी आणि स्वार्थत्यागाची भावना यावरच गांधीजींनी आपले सर्व राजकारण आधारले होते. त्यांनी जनतेला राष्ट्रीय संग्रामाच्या आघाडीवर आणले व त्यांचे जनआंदोलनात रुपांतर केले.
(2) भारतीय जनता आता निर्भय बनली. आता ब्रिटिश साम्राज्यशाहीची तिला भीती वाटेनाशी झाली. नेहरुनी नंतर म्हटल्याप्रमाणे गांधीजींनी त्यांच्यातील पौरुषत्व जागृत केले. सार्या देशाच्या बाबतीत असेच घडले.
(3) या संदर्भात असे ध्यानात घ्यावयास हवे की अहिंसा हे दुबळया व भेकडांचे शस्त्र आहे. असे गांधीजी मुळीच मानीत नसत. अगदी खंबीरवृज्ञ्ल्त्;ाीची माणसेच त्याचा उपयोग करु शकत. भेकडपणापेक्षा मला हिंसाचार परवडेल, असे गांधीजींनी पुन: पुन्हा सांगितले आहे. १९२० मध्येच त्यांनी म्हटले होते की, ज्ञ्थ्ुेत्;भिरुता की हिंसा एवढाच पर्याय असेल तर खुशाल हिंसाचाराचा अवलंब करा असाच मी सल्ला देईन, भेकड वृत्तीवरने असहाय्यपणे आपला अवमान निमूटपणे पाहात राहण्यापेक्षा आपल्या मानाच्या रक्षणासाठी हिंदी जनतेने हिंसेचा अवलंब केला तरी मला चालेल.
- असहकार चळवळीचा अत्यंत महत्वाचा परिणाम म्हणजे हिंदी जनतेचा आत्मविश्र्वास आणि स्वाभिमान फार मोठया प्रमाणात वाढला.
- आता भारतीय जनतेचे साम्राज्यशाहीशी युध्दच सुरु झाले होते.
- एखाद्या लढाईत तात्पुरता पराभव पत्करावा लागला तरी आपल्या ध्येयाकडील वाटचालीपासून आता कोणीही तिला विचलित करु शकणार नव्हते.
- ता. 23 फेब्रुवारी 1922 ला चळवळ मागे घेताना गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे, ब्रिटिश जनतेला जाणीव करुन देण्यास हीच योग्य वेळ आहे.
- 1920 मध्ये जो संग्राम सुरु झाला तो आता शेवटाला जाईपर्यंत चालू राहणार आहे.
- मग तो एक महिना वा एक वर्ष किंवा कित्येक महिने वा कित्येक वर्षे चालो अथवा स्वातंत्र्ययुध्दाच्या दिवसांत ब्रिटिशांच्या प्रतिनिधींनी जो वर्णनातील धुमाकूळ घातला तसा ते नव्या जोमाने घालोत वा न घालोत, संग्राम चालूच राहील.
- आपण विधिमंडळातून ब्रिटिशांशी लढा देऊ शकू, अशी स्वराज्य पक्षीयांची श्रध्दा होती. त्यांनी निवडणूका लढविल्या, अनेक विजय मिळविले व अनेक प्रांतिक विधिमंडळातील कामकाज स्थगित करण्यातही यश मिळविले.
- नोव्हेंबर 1927 मध्ये ब्रिटिशांनी घटनात्मक बाबींच्या पाहणीसाठी सायमन आयोग नेमल्याची घोषणा केली. या आयोगात सर्व सभासद इंग्रजच होते.
- भारतीयांना हा मोठाच अपमान वाटला. या आयोगाचे सभासद जेव्हा भारतात आले तेव्हा त्यावर बहिष्कार टाकण्यात आला.
- “सायमन परत जा” अशा घोषणा देत सार्या देशभर निदर्शने झाली.
- लाहोरमध्ये पोलिसांच्या अशाच एका लाठीहल्ल्यात लाला लजपतराय जखमी झाले व त्यातच त्यांचे देहावसान झाले.
सविनय कायदेभंगाची चळवळ :-
- राजकीय उत्साहाची एक नवी लाटच 1928 व 1929 मध्ये उसळली.
- डिसेंबर 1929 मध्ये काॅंग्रेसच्या ऐतिहासिक लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून युवा नेता जवाहरलाल नेहरु यांनी सुत्रे स्वीकारली.
- याच अधिवेशनात काँग्रेसने पूर्ण स्वराज्य हे आपले ध्येय म्हणून जाहीर करणारा ठराव संमत केला.
- 26 जानेवारी 1930 हा पहिला स्वातंत्र्यदिन म्हणून पाळण्यात आला.
- त्या दिवशी तिरंगी ध्वज उभारण्यात आला आणि हयापुढे परकीय अंमलाखाली राहणे म्हणजे मानवाविरुध्द आणि ईश्र्वराविरुध्द गुन्हा आहे, अशी प्रतिज्ञा लोकांनी घेतली. गांधीजींच्या प्रसिध्द दांडी यात्रेने 12 मार्च 1930 रोजी काँग्रेसने दुपारी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु केली.
- त्याचाच परिणाम म्हणून लक्षावधी भारतीयांनी बेकायदा मीठ तयार करुन व ते विकून मिठाचा कायदा मोडला.
- लाखो लोकांनी सत्याग्रह किंवा नि:शस्त्र प्रतिकार केला. हरताळ, निदर्शने आणि परेदशी माल व दारुवरील बहिष्काराच्या मोहिमेतही लाखोंच्या संख्येने लोक सहभागी झाले.
- देशाच्या अनेक भागांत शेतकर्यांनी जमीन महसून व खंड देण्यास साफ नकार दिला. त्यामुळे त्यांच्या जमिनी जप्त करण्यात आल्या.
- महिलांचा सहभाग हे लक्षणीय वैशिष्टय होते.
- ही चळवळ वायव्येला पठाणांच्या वायव्य सरहद्द प्रांतात व ईशान्येला मणिपूर व नागालॅंडपर्यंत पसरली.
- पेशावरमध्ये तर 24 एप्रिलपासून 4 मे पर्यंत ब्रिटिशांचे राज्यच अस्तित्वात नव्हते.
- गांधी आयर्विन कराराद्वारा मार्च 1931 मध्ये तात्पुरती लढाबंदी झाली होती.
- 1932 च्या प्रारंभी मात्र पुनश्च सत्याग्रहास सुरुवात झाली. पण कोणतेही जनआंदोलन कायमचे टिकत नसते, तशीच याही लढयाची तीव्रता हळूहळू कमी होत गेली व 1934 च्या मध्यास चळवळ मागे घेण्यात आली.
- दरम्यान ब्रिटिशांनी लंडनला गोलमेज परिषद आमंत्रित केल्या होत्या. पण भारताच्या राजकीय स्थितीबाबत कोणतेही नवे सूत्र ठरविण्यात त्यांना अपयश आले.
क्रांतिकारकांची चळवळ :-
- राजकीय कार्याचा एक भाग म्हणून विसाव्या शतकात क्रांतिकारी दहशतवादाचा दोनदा उद्रेक झाला.
- प्रथम स्वदेशीची चळवळ अस्तंगत झाली तेव्हा व नंतर असहकार आंदोलन मागे घेण्यात आले तेव्हा. ही चळवळ राष्ट्रवादाने प्रेरित झालेल्या ध्येयवादी युवकांनी चालवली होती.
- प्रभावी राजकीय गटांच्या कार्या ने त्यांचा भाषांतरांवरूनरमनिरास झाला होता. हया युवकांच्या नसानसांत उत्साह सळसळत होता.
- सरकारी अधिकारी, मालमत्ता व पदाधिकारी हयांच्याविरुध्द त्यांनी हिंसाचारी मोहीमच सुरु केली.
- क्रांतिकारी दहशतवादाच्या उगमाचे एक प्रमुख कारण म्हणजे जेव्हा जेव्हा एखाद्या प्रमुख राजकीय चळवळीतील उत्साह ओसरे किंवा ती मागे घेण्यात येई तेव्हा राजकीयदृष्टया पोकळीच निर्माण होई.
- हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची 1924 मध्ये स्थापना होताच क्रांतिकारकांच्या चळवळीला संघटित स्वरुप प्राप्त झाले.
- सरकारची प्रतिकि्रया ताबडतोब दडपशाहीची होती. त्यांचाच परिणाम म्हणजे हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीच्या अनेक क्रियाशील कार्यकत्र्यांना अटक करण्यात येऊन 1925 मध्ये काकोरी कट खटला या नावाने प्रसिध्द असलेला खटला भरण्यात आला.
- समाजवादी विचारांच्या प्रभावामुळे 1928 मध्ये या संघटनेची नाव हिंदुस्थानात सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असे ठेवण्यात आले.
- तुम्हाला चंद्रशेखर आझादांचे नाव माहिती असेलच. ते हया संघटनेचे नेते होते.
- 1920 नंतरच्या काळात भगतसिंग, राजगुरु, रामप्रसाद बिस्मील, सुखदेव व बटुकेश्र्वर दत्त हे नेते क्रांतिकारी कार्यात सर्वपरिचित होते.
- दूरदर्शित्वाचा अभाव ही क्रांतिकारी दहशतवादाची एक प्रमुख त्रुटी होती. वादातील अशा देशभक्तीचे वरदान त्यांना लाभले होते.
- शासनाच्या यंत्रणेलाच गदगदा हलविण्याची त्यांची क्षमता होती. पण ही चळवळ फारच थोडे दिवस टिकली.
- सरकारने ती दडपून टाकली. क्रांतिकारकांना अपयश आले असले तरी राष्ट्रीय चळवळीतील त्यांचे योगदान लहानसहान नाही.
- युवकांना त्यांच्या कार्यामुळे प्रेरणा मिळे आणि त्यांच्या असीम त्यागाच्या कथांनी राष्ट्रवादाची ज्योत जागती आणि पेटती ठेवणे शक्य झाले.