डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जीवनपरिचय

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जीवनपरिचय
भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा अल्पपरिचय
पूर्ण नाव : अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम
जन्म– 15 ऑक्टोबर 1931, (रामेश्वर, तमिळनाडू, भारत)
मृत्यू – 27 जुलै 2015 (मेघालयमधील शिलाँग)
वडील– जैनुलाबदिन अब्दुल
प्राथमिक शिक्षण : श्वार्त्ज हायस्कूल, रामअनंतपुरम
पदवी : सेंट जोसेफ कॉलेज, तिरुची (विज्ञान)
व्यावसायिक : 1954 ते 57 मध्ये एम.आय.टी. मद्रास येथून एअरोनॉटिकल इंजिनीअरिंगमध्ये डी.एम.आय.टी.
हे भारताचे अकरावे राष्ट्रपती होते.
आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले.
विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते.
कलाम यांच्या सहकाऱ्यांनी कलाम यांचे ट्विटर अकाउंट सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असून, ‘इन मेमरी ऑफ डॉ. कलाम’ या नावाने अकाउंट सुरू राहील
1957 साली डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमध्ये (डीआरडीओ) वरिष्ठ वैज्ञानिकाचे सहायक म्हणून नोकरी.
भारताचे पहिले हलके विमान होवर क्राफ्ट विकसित करणाऱ्या चमूच्या प्रमुखपदी नियुक्ती. होवर क्राफ्ट विकसित.
1963 ते 1980 या कालावधीत इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये (इस्रो) काम.
1980 : इंदिरा गांधी यांनी इंटिग्रेटेड, गाईडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू केला. याचे सतीश धवन पहिले संचालक होते. त्यानंतर या महत्त्वाकांक्षी योजनेची जबाबदारी डॉ. अब्दुल कलाम यांच्याकडे सोपविण्यात आली आणि भारताने क्षेपणास्त्राच्या क्षेत्रात स्वयंसिद्ध होण्याच्या दिशेने आगेकूच सुरू केली.
11 व 13 मे 1998 : पोखरण येथे दोन यशस्वी अणुचाचण्या घेण्यात आल्या. यात अब्दुल कलाम यांची भूमिका महत्त्वाची होती.
17 जुलै 2002 ते 24 जुलै 2007 : भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला. (त्यांच्या कार्यामुळे ते आजवरचे सर्वाधिक लोकप्रिय राष्ट्रपती ठरले.)
साल | पुरस्कार |
१९८१ | पद्मभूषण |
१९९० | पद्मविभूषण |
१९९७ | भारतरत्न |
१९९७ | इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता |
१९९८ | वीर सावरकर पुरस्कार |
२००० | रामानुजम पुरस्कार |
२००७ | ब्रिटिश रॉयल सोसायटीतर्फे किंग चार्ल्स (द्वितीय) पदक |
२००७ | वॉल्व्हरहॅम्फ्टन विद्यापिठातर्फे डॉक्टर ऑफ सायन्स मानद पदवी |
२००९ | अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स संस्थेतर्फे हूवर पदक |
२००९ | अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे आंतरराष्ट्रीय पुरस्कार |
२०१० | वॉटलू विद्यापिठातर्फे डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग |
२०११ | एस. गुजराथी विद्यापीठाचा डॉक्टर ऑफ सायन्स |
२०११ | इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर संस्थेचे मानाचे सभासदत्व |
२०१२ | डॉक्टर ऑफ लॉ (सिमॉन फ्रेजर विद्यापीठ) |
२०१४ | डॉक्टर ऑफ सायन्स (एबिनबर्ग विद्यापीठ, इंग्लंड) |
डेव्हलपमेंट इन फ्ल्यूइड मेकॅनिक्स अॅण्ड स्पेस टेक्नोलॉजी | १९८८ | डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि रोद्दाम नरसिम्हा |
इंडिया २०२०: ए व्हिजन फॉर दी न्यू मिलेनियम | १९९८ | डॉ. एपीजे कलाम आणि वाय. एस. राजन |
विंग्ज ऑफ फायर (मराठीत अनुवाद – अग्नपिंख) | १९९९ | डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि अरुण तिवारी |
इग्नायटेड माईंड्स: अनलिशिंग दी पॉवर विदिन इंडिया | २००२ | डॉ. एपीजे अब्दुल कलाम |
दी ल्यूमिनस स्पार्क्स | २००४ | डॉ. एपीजे अब्दुल कलाम |
मशिन इंडिया | २००५ | डॉ. एपीजे अब्दुल कलाम |
इन्स्पायरिंग थॉट्स | २००७ | डॉ. एपीजे अब्दुल कलाम |
इनडॉमटिेबल स्पिरीट्स | २००७ | डॉ. एपीजे अब्दुल कलाम |
एनव्हिजनिंग अॅन एम्पॉवर्ड नेशन | डॉ. एपीजे कलाम आणि सिवाथानू पिल्लई | |
यू आर बॉर्न टू ब्लॉसम : टेक माय जर्नी बियाँड | २०११ | डॉ. एपीजे कलाम आणि अरुण तिवारी |
टर्निंग पॉईंट्स : ए जर्नी थ्रु चॅलेंजेस | २०१२ | डॉ. एपीजे अब्दुल कलाम |
टार्गेट थ्री बलियिन | २०११ | डॉ. एपीजे कलाम आणि श्रीजन पाल सिंग |
माय जर्नीः ट्रान्सफॉर्मिंग ड्रीम्स इन्टू अॅक्शन्स | २०१३ | डॉ. एपीजे कलाम आणि व्ही. पोनराज |
ए मॅनीफेस्टो फॉर चेंज : ए सिक्वेल टू इंडिया २०२० | २०१४ | डॉ. एपीजे अब्दुल कलाम |
ट्रान्सेंडिंग माय स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स विथ प्रमुख स्वामीजी | २०१५ | डॉ. एपीजे अब्दुल कलाम |
रिइग्नायटेड : सायंटिफकि पाथवेज टू ए ब्रायटर फ्यूचर | २०१५ | डॉ. एपीजे कलाम आणि श्रीजन पाल सिंग |