आधार बिल योजना (Aadhar Bill Yojana)

आधार बिल योजना (Aadhar Bill Yojana)

*संसदेत 16 मार्च 2016 रोजी आधार (वित्तीय व इतर अनुदान, लाभ व सेवा लक्षित पुरवठा) विधेयक, 2016 मुळ स्वरुपात संमत करण्यात आले.

*केंद्र सरकारने आधार विधेयकास धन विधेयक स्वरुपात लोकसभेमध्ये सादर केले.

आधार बिल विधेयकाचा उद्देश – सामान्य जनता, गरिबांपर्यंत कल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचविणे.

आधार बिल –

भारताच्या प्रत्येक नागरिकास एक बहूउद्देशीय राष्ट्रीय ओळखपत्र उपलब्ध करण्याच्या उद्देशाने “आधार” ची संकल्पना मांडण्यात आली. बायोमेट्रिक माहिती जसे बोटांचे ठसे, डोळ्यांच्या बुबळांना ओळख स्वरुपात जोडण्यात आले आहे. 28 जानेवारी 2009 रोजी यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.

*या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचा अध्यक्ष म्हणून माहिती तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी यांची निवड करण्यात आली.

*आधार 12 अंकांचा एक विशिष्ट ओळख क्रमांक आहे, जो “भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण” सर्व भारतीयांसाठी उपलब्ध करतो.

*12 अंकी आधार क्रमांक भारतामध्ये कोठेही व्यक्तीची ओळख व पत्त्याच्या स्वरुपात मान्य राहील.

*भारतामध्ये 29 सप्टेंबर 2010 रोजी पहिली आधार संख्या सादर करण्यात आली.

*वर्ष 2016-17 च्या साधारण अर्थसंकल्पामध्ये एक प्रस्ताव सादर करण्यात आला, ज्यामध्ये अनुदान आणि दुसरे सरकारी लाभासाठी आधार कार्ड असणे गरजेचे आहे. सध्या 98 कोटी लोकांना आधारकार्ड नंबर देण्यात आला आहे. सरासरी प्रति 26 लाख बायोमेट्रिक आणि 1.5 लाख e-kyc पेमेंट करण्यात येतात. आधार 11.19 कोटी प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (DBT) खात्याशी जोडण्यात आला आहे; परंतु देशामध्ये 16.5 कोटी LPG ग्राहक खात्यामध्ये अनुदानाचा लाभ घेत आहेत.

आधारचे लाभ/फायदे –

1. आधार संख्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनभराची ओळख आहे.

2. सरकारी व खासगी माहिती आधारित नकली ओळखीस मोठया प्रमाणात समाप्त करण्यामध्ये आधारकार्ड महत्वपूर्ण मार्ग आहे.

3. आधार संख्येपासून ग्राहकासबँकिंग, मोबाईल कनेक्शन आणि सरकारी व बिगर सरकारी सेवांची सुविधा मिळवण्यासाठी महत्वपूर्ण राहील.

Must Read (नक्की वाचा):

ई-नाम योजना (E-NAM Yojana)

You might also like
1 Comment
  1. Bharat Salunke says

    BHARAT ENTERPRISE’S

Leave A Reply

Your email address will not be published.