आहारशास्त्राविषयी संपूर्ण माहिती
आहारशास्त्राविषयी संपूर्ण माहिती
Must Read (नक्की वाचा):
समतोल आहार :
- शरीरांची कार्यक्षमता व आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात आणि परिमाणात वेगवेगळ्या अन्नपदार्थ्यांचा समावेश की ज्यातून स्निग्ध पदार्थ, कर्बोदके, प्रथिने, क्षार आणि जीवनसत्वे मिळतील असा आहार म्हणजे ‘समतोल आहार’ होय.
अन्नातील पोषक तत्वे/घटक :
- स्थूल पोषक तत्वे – शरीरासाठी सर्वांत जास्त आवश्यकता. उदा. प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ (मेदपदार्थ)
- सूक्ष्म पोषक तत्वे – अत्यंत कमी प्रमाणात (अल्प) आवश्यकता. उदा. जीवनसत्वे, क्षार.
अन्नपदार्थांचे वर्गीकरण :
- प्राणीज (प्राण्यांपासून मिळणारे – अंडी, मांस, दुध)
- वनस्पती (वनस्पतीपासून मिळणारे धान्य, फळे, भाज्या)
रासायनिक रचनेवरून –
- प्रथिने
- मेद पदार्थ
- कर्बोदके
- क्षार
- जीवनसत्वे
प्रमुख कार्यावरून –
- उर्जा / शक्तीचा पुरवठा करणारे अन्न
- शारीरिक वाढ आणि दुरुस्तीसाठी आवश्यक अन्न
- संरक्षण.
अन्नपोषक मुल्यांवरून –
- एकदल धान्य
- व्दिदल धान्य
- हिरव्या पालेभाज्या
- फळे
- तेल/मेद
- साखर गूळ
- मसाले व तिखट
- तेलबिया
- इतर
प्रथिने (प्रोटीन्स) :
- प्रथिने हि अमिनो आम्लांपासून बनलेली असतात.
- शरीराला ’24’ अमिनो आम्लांची गरज असते.
- त्यापैकी ‘9’ अमिनो आम्ले शरीरात निर्माण होऊ शकत नाहीत. ती आहारातून पुरवावी लागतात. म्हणून अशा अमिनो आम्लांना ‘आवश्यक अमिनो आम्ले’ असे म्हणतात.
- (लायसीन, ल्युसीन, आयासोल्युसीन, व्हॅलिन, हिस्टीजीन, थ्रिओनिन, टिप्ट्रोफॅन, मिथिओनिन, फिनाईल, अॅलॅनिन)
- अमिनो आम्ले ही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर व कधी-कधी फॉस्फरस व लोह यांपासून बनलेली असतात.
प्रथिनांची कार्ये :
- शरीराची वाढ आणि विकास करणे.
- ऊतींच्या डागडुजीसाठी / दुरुस्तीसाठी.
- प्रतिपिंडे (अॅंटीबॉडीज), विकरे (एन्झाइम्स), संप्रेरके (हामोन्स) यांच्या निर्मितीमध्ये.
- रक्तनिर्मितीमध्ये.
- कधी-कधी प्रथिनांपासून उर्जादेखील मिळते.
प्रथिनांची साधने :
- प्राणीज साधने – दूध, अंडी, मांस, मासे.
- वनस्पतीज साधने –
- डाळी-तूर, मूग, हरभरा, उडीद, मसूर, सोयाबीन
- धान्ये – ज्वारी, बाजारी, नाचणी, गहू.
- तेलबिया – शेंगदाणे, तीळ, बदाम, करडई.
- डाळींमध्ये प्रथिनांचे प्रमाण – 20-25% असते.
- सोयबींमध्ये प्रथिनांचे प्रमाण – 43.2% (सर्वाधिक)
- दुधामध्ये प्रथिनांचे प्रमाण- 3.2-4.3%
- अंडी प्रथिनांचे प्रमाण – 13%
- मासे प्रथिनांचे प्रमाण – 15-23%
- मांस प्रथिनांचे प्रमाण – 18-26%
- प्राणीज प्रथिने ही वनस्पतीज प्रथिनांपेक्षा ‘उच्च दर्जाचे’असतात. कारण त्यांच्यामध्ये सर्व आवश्यक अमिनो आम्ले उपलब्ध असतात.