अमरावती प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण माहिती
अमरावती प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण माहिती
Must Read (नक्की वाचा):
- जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – अमरावती
- क्षेत्रफळ – 12,210 चौ.कि.मी.
- लोकसंख्या – 28,87,826 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
- तालुके – 14 – अचलपूर, मोर्शी, दर्यापूर, अमरावती, चांदुरबाजार, भातकुली, अंजनगांव (सुर्जी), नांदगांव (खं.), चिखलदरा, धारणी, वरुड, तिवसा, चांदूर रेल्वे, धामनगांव रेल्वे.
- सीमा – अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, दक्षिणेस यवतमाळ जिल्हा असून पूर्वेस नागपूर व वर्धा हे दोन जिल्हे आहेत. पश्चिम व नैऋत्येस अकोला जिल्हा आहे.
- अमरावती येथे पूर्वी उंबराची झाडे मोठ्या प्रमाणात होती. उंबराच्या या झाडांवरून उंदुबरावती असे झाले व कालांतराने उमरावतीचे अमरावती असा अपभ्रंश होत जावून आजचे अमरावती हे नाव उदयास आले.
- अमरावती जिल्हयातल कौंडन्यपूर हे गाव रुख्मिणीचे माहेर म्हणून प्रसिद्ध. डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांची कर्मभूमी. डॉ. पंजाबराव देशमुख, विर वामनराव जोशी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे बाबा अशा थोर पुरुषांची जन्मभूमी.
- अमरावती विधापिठाचे नामकरण ‘संत गाडगे बाबा अमरावती विधापीठ’ असे करण्यात आले.
- अमरावती – येथील संत गाडगे महाराजांनी समाधी व अंबादेवी मंदीर प्रसिद्ध आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे मुख्यालय येथे आहे.
- चिखलदरा – थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले हे स्थळ विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाते.
- परतवाडा – इमारती लाकडाच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे.
- रिद्धपूर – येथे गोविंद्प्रभुंची समाधी आहे. महानुभावांची काशी म्हणून प्रसिद्ध.
- शेडगाव – संत गाडगे महाराजांचे जन्मगाव म्हणून प्रसिद्ध आहे.
- मोझरी – संत तुकडोजी महाराजांनी स्थापना केलेला गुरुकुंज आश्रम येथे आहे. महाराजांची समाधी येथेच आहे.
- ऋणमोचन – येथील मुदगलेश्वराचे मंदीर प्रसिद्ध आहे.
- बडनेरा – विड्याच्या पानासाठी बडनेरा परिसर प्रसिद्ध आहे.
- कौंडिण्यपुर – विदर्भाची पौराणिक राजधानी कुंडीनपूर या नावाने महाभारतात प्रसिद्ध असलेले आता कौंडिण्यपुर म्हणून ओळखले जाते. प्राचीन अवशेषांकरिता विशेष प्रसिद्ध आहे.
- सालबर्डी – हे गाव मोर्शी तालुक्यात असून मारू नदीच्या काठावर वसलेले आहे. गावाजवळच 2 बौद्ध व 5 हिंदू लेणी आहेत. शिवाय नुकत्याच काळात पाशुपत पंथाच्या 2 लेण्यांचा शोध लागलाय. तसेच लंकेश्वर व पंचवतार मंदिरे, डोंगरावरील शिव मंदीर प्रसिद्ध आहे.
- कुंडीनपूरचा राजा भीष्मकाची कन्या रुक्मिणी ही भगवान श्रीकृष्णाची पत्नी असल्याचा उल्लेख महाभारतात सापडतो.
- वर्धा नदीच्या काठावर कौंडण्यपुर येथे विठ्ठल-रुक्मिणी चे मंदीर विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे. येथे मोठी यात्रा भरल्या जाते. ही भगवान श्रीकृष्णाची पत्नी असल्याचा उल्लेख महाभारतात सापडतो.
- मर्यादापुरषोत्तम रामाचे आजी अजोबा नल, दमयंतीपैकी नल यांची कौंडण्यपुर ही जन्म नगरी असल्याचा उल्लेख आढळतो.
- अमरावती जिल्ह्यातून वाहणार्या नद्या – तापी, पूर्णा, वर्धा, पेढी, चंद्रभागा, विदर्भा, गाडगा, सिपना, शहाणूर
- अमरावती जिल्ह्यामध्ये औधोगिक वसाहती – अमरावती, अंजनगाव, दर्यापूर, अचलपूर, मोर्शी, वरुड.
- ढाकणे-कोलखाज वन्यप्राणी अभयारण्य अमरावती जिल्ह्यात आहे.
- अमरावती विधापिठाचे नाव-संत गाडगे बाबा अमरावती विधापीठ.
- अमरावती जिल्ह्यामध्ये कृषी उत्पादनाच्या प्रमुख बाजारपेठा- अमरावती, चांदूर, दार्यापूर, अचलपूर, धामनगांव, वरुड.
- अमरावती जिल्ह्यामध्ये प्रमुख औधोगिक उत्पादने – तेल गाळणे, हस्तकला, यंत्रमाग, कापड, हातमाग.
- अमरावती जिल्ह्यातून गेलेला राष्ट्रीय हमरस्ता – घुळे-कलकत्ता (6)
- अमरावती जिल्ह्यातील आदिवासी जमाती – कोरकू व गोंड
- अमरावत जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण – चिखलदरा
- जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – अकोला
- क्षेत्रफळ – 5,429 चौ.कि.मी.
- लोकसंख्या – 18,18,617 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
- तालुके – 7 – अकोट, बाळापूर, तेल्हारा, अकोला, मूर्तीजापूर, पातुर, बार्शी टाकळी.
- सीमा – उत्तरेस व पूर्वेस अमरावती जिल्हा, दक्षिणेस वाशिम जिल्हा असून पश्चिमेस बुलढाणा जिल्हा आहे.
- अकोला हे शहर अकोलसिंग नावांच्या रजपूत सरदाराने वसविले असल्याचे सांगितले जाते. या शहराचा ‘आईन-ए-अकबरी’ यामध्ये नरनाळ्याच्या सुभ्याचा अकोला हा एक परगणा असल्याचा उल्लेख आढळतो. कापसाचे आगार म्हणून हा जिल्हा ओळखला जातो.
- 22 किमी. क्षेत्रावर पसरलेला, 67 बुरूज व 27 दरवाजे असलेला किल्ला इतिहास प्रसिद्ध असू गाविलगडच्या पर्वतरांगेत वसला आहे.
- अकोला – मोरणा नदीमुळे या शहराचे जुने व नवे असे दोन भाग पडलेले आहे. पंजाबराव कृषी विधापीठाचे मुख्य ठिकाण, सतीमाता मंदीर व जैन मंदीर व जैन मंदीर प्रसिद्ध आहे.
- बाळापूर – बालापूरचा किल्ला 1757 मध्ये इस्माईल खानाने पूर्ण केला या किल्ल्याच्या खाली बळादेवीचे मंदीर आहे.
- नरनाळा – येथील 22 दरवाज्यांचा किल्ला पर्यटकांचे आकर्षण आहे. 1509 मध्ये महाबत खानाने बाधलेली मस्जिद आहे.
- मूर्तीजापूर – येथे संत गाडगे महाराजांचा आश्रम आहे.
- पातुर – हे साग व चंदनी लाकडासाठी प्रसिद्ध आहे.
- पारस – औष्णिक वीज निर्मिती केंद्र.
- अकोट – सतरंज्या व गोणी प्रसिद्ध.
- आडगाव – ता. अकोट, मुगल काळातील परगण्याचे हे केंद्र. याच गावात 1671 साली व्दारकेश्वराचे मंदीर बाधण्यात आले. गावाजवळच इंग्रज अधिकारी मेजर बुलक याचे थडगे आहे.
- हिवरखेड – आंब्यासाठी प्रसिद्ध आहे.
- मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यात सातपुड्याच्या पर्वत रांगेतून उगम असलेली पूर्णा नदी ही अकोल्या जिल्ह्याची प्रमुख नदी होय.
- अकोला जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम या जिल्ह्याची निर्मिती 1 जुलै 1998 रोजी करण्यात आली.
- अकोला जिल्ह्यातून गेलेले राष्ट्रीय हमरस्ते – धुळे-कोलकत्ता (6)
- अकोला जिल्ह्यात शिवाजी शिक्षण संस्थेच्या जास्त शाळा आहेत.
- जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – बुलढाणा
- क्षेत्रफळ – 9,661 चौ. कि.मी.
- लोकसंख्या – 25,88,039 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
- तालुके – 13 – जळगांव जामोद, मलकापुर, बुलढाणा, खामगांव, नांदुरा, चिखली, मेहकर, शेगाव, देऊळगांवराजा, सिंदखेडराजा, संग्रामपुर, लोणार, मोताळा.
- सीमा – बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, दक्षिणेस परभणी व जालना हे दोन जिल्हे असून पूर्वेस अकोला जिल्हा आहे. पश्चिमेस औरंगाबाद व जळगाव हे दोन जिल्हे आहेत.
- प्राचीन ‘कुंतल’ देशात हा प्रदेश समाविष्ट होता. सम्राट अशोकाच्या साम्राज्याच्या हा प्रदेश एक भाग होता. भिल्लांचे वस्तीस्थान म्हणजे ‘भिल्लठाणा’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन बुलढाणा हे नाव रूढ झाले.
- जिल्ह्याचे मुख्यालय असलेले बुलढाणा हे शहर वनश्रीने नटलेले व निसर्गरम्य स्थळ आहे. या शहराला विदर्भाचे प्रवेशव्दार म्हणून ओळखले जाते.
- हजारो वर्षापूर्वी उल्का पडल्यामुळे या जिल्ह्यात लोणार हे ठिकाण खार्या पाण्याच्या सरोवरासाठी जगभर प्रसिद्ध आहे.
- बुलढाणा – हे शहर अजिंठ्याच्या डोंगर रांगात वसले असून थंड हवेचे ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे.
- खामगाव – येथे एक कुष्ठरोग निवारण केंद्र आहे. जवळच गारडगावाला प्रेक्षणीय बुद्ध विहार आहे.
- मलकापुर – येथील गौरीशंकर मंदिर विहार आहे.
- देऊळगाव राजा – देऊळगाव -राजा येथील बालाजी मंदीर प्रसिद्ध आहे.
- शेगांव – येथे गजानन महाराजांची समाधी आहे.
- सिंदखेड-राजा – छत्रपती शिवाजी महाराजाच्या मातोश्री जिजाई यांचे जन्मस्थान
- जामोद – जामोदचे प्राचीन जैन मंदीर प्रसिद्ध आहे.
- लोणार – उल्कापातामुळे तयार झालेला तलाव व त्या शेजारी यादवकालीन मंदीर प्रसिद्ध आहे. 18 व्या शतकात लोणार महात्म्यही लिहिले गेले त्यात लवणासुर या राक्षसाची कथा या महात्म्यात येते.
- राणीबाग वनोधान बुलढाणा जिल्ह्यात आहे.
- लोणार क्रेटर वनोधान बुलढाणा जिल्ह्यात आहे.
- बुलढाणा जिल्ह्यातून पेनगंगा, पूर्णा, पांडव, नळगंगा, बेंबळा, बाणगंगा, केदार, ज्ञानगंगा या नद्या वाहतात.
- बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख औधोगिक उत्पादने कापड, यंत्रमाग, भांडी, तेल काढणे, साखर, हत्यारे ही आहेत.
- बुलढाणा जिल्ह्यात नळगंगा नदीवर नळगंगा धरण आहे.
- बुलढाणा जिल्ह्यातून गेलेल्या लोहमार्गाची एकूण लांबी मुंबई-भुसावळ-हावडा (ब्रोंडगेज), जलंब-खामगांव (ब्रोंडगेज), 46 कि.मी.
- जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – वाशिम
- क्षेत्रफळ – 5,153 चौ.कि.मी.
- लोकसंख्या – 11,96,714 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
- तालुके – 6 – वाशिम, मलेगांव, रिसोड, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा.
- सीमा – उत्तरेस अकोला व अमरावती, दक्षिणेस यवतमाळ व हिंगोली जिल्हे असून पूर्वेस यवतमाळ आणि पश्चिमेस बुलढाणा जिल्हा आहे.
- 1 जुलै 1998 रोजी अकोला जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम जिल्हा निर्माण करण्यात आला.
- वाशिमला पुरातन इतिहास आहे. वाशिमचे पुरातन नाव वत्सगुल्म होते. वत्स ऋषीच्या नावावरून हे नाव आले असावे. काही अवशेशावरून वाकाटक साम्राज्याचा संदर्भही वाशिम सोबत जोडला आहे.
- या जिल्ह्याचा बराचसा भाग डोंगराळ व पठारी आहे. पैनगंगा ही या जिल्ह्याची प्रमुख नदी असून दक्षिण भाग सखल प्रदेशाचा आहे.
- या जिल्ह्यामध्ये आंध, गोंड आणि बंजारा या आदिवासी जमाती येथे प्रामुख्याने आढळतात.
- वाशिम – येथील पद्मावती तलाव, मधेश्वर मंदिर आणि बालाजी मंदिर प्रसिद्ध आहे.
- कारंजा – नृसिंह सरस्वतीचे जन्मस्थान. येथील जैन मंदिर प्रेक्षणिय आहे.
- तर्हाळा – हे पठाण लोकांचे पवित्र स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.
- रिसोड – अमरदासबाबांचे मंदिर आहे.
- जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – यवतमाळ
- क्षेत्रफळ – 13,582 चौ.कि.मी.
- लोकसंख्या – 27,75,457 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
- तालुके – 16 – दारव्हा, यवतमाळ, पुसद, राळेगांव, वणी, बाभुळगांव, कळंब, मारेगांव, पांढरकवडा, घाटंजी, दिग्रस, नेर, उमरखेड, महागांव, आर्णी, झरिजामाणी.
- सीमा – उत्तरेस वर्धा व अमरावती जिल्हा, दक्षिणेस नांदेड जिल्हा व आंध्र प्रदेश आहे. पूर्वेस चंद्रपूर जिल्हा आणि पश्चिमेस परभणी व अकोला जिल्हा आहे.
- यवतमाळ शहराचे नाव पूर्वी यवत किंवा यवते असे असावे. यवते चा महाल असा प्रत्यय लागून यवतमाळ हे नाव पडले असावे.
- महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी अग्रेसर असल्यामुळे ‘पांढरे सोने पिकविणारा किंवा कापसाचा जिल्हा’ म्हणून ओळखला जातो.
- वर्धा व पैनगंगा या दोन नधा जिल्ह्याच्या प्रमुख नधा होत.
- यवतमाळ – प्राचीन भारताच्या इतिहासाचे संशोधन करणारी शारदाश्रम ही संस्था येथे आहे. येथील केदारेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे.
- वणी – येथील रंगनाथस्वामींचे मंदिर प्रसिद्ध आहे.
- पाटणबोरी – हे ठिकाण पांढरकवडा तालुक्यात असून दगडापासून फरशी बनविण्याचा उधोग येथे आहे.
- घाटंजी – मोरोली महाराजांच्या यात्रेकरिता प्रसिद्ध.
- कळंब – कलंबचा श्री चिंतामणी विदर्भातील भाविकांचे महत्वाचे श्रद्धास्थान आहे. भारतातील 21 महत्वाच्या आणि पौराणिक आधार असलेल्या गणेश स्थानांमध्ये श्री चिंतामणीचा समावेश होतो.
- पोहरा देवीचे जगदंबा मंदिर बंजारा समाजाची काशी म्हणून उल्लेख होतो.
- जैनांची काशी म्हणून ओळखले जाणारे शिरपूर जैन हे पुरातन गांव जैन धर्मीयांच्या तीर्थक्षेत्राबरोबरच प्रेक्षणीय पर्यटन स्थळ आहे.
- किनवट अभयारण्य यवतमाळ जिल्ह्यात आहे.
- टेपेश्वर राखीव मृगया क्षेत्र यवतमाळ जिल्ह्यात आहे.
- यवतमाळ जिल्हयातून पैनगंगा नदी वाहते.
- यवतमाळ जिल्ह्यातून गेलेला राष्ट्रीय हमरस्ता – हैद्राबाद- जबलपुर (क्र.7)
- विदर्भामध्ये नागपुर व अमरावती ही दोन प्रशासकीय विभाग येते.
- नागपुर प्रशासकीय विभागात 6 जिल्हे व अमरावती प्रशासकीय विभागात 5 जिल्हे अशी एकूण 11 जिल्हे विदर्भात आहे.
- विदर्भात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा – गडचिरोली. (क्षेत्रफळ – 14,412 चौ.कि.मी.)
- विदर्भात क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा – भंडारा. (क्षेत्रफळ – 3,895 चौ.कि.मी.)
- विदर्भातील लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा – नागपूर.
- सहकारी तत्वावर विदर्भातील पहिला साखर कारखाना – जिजामाता सहकारी साखर कारखाना मर्यादित हा होय.
sir govind prabhu yanchi samadhi riddhapur la nahi ahr