अना बर्न्स यांना मॅन बुकर पुरस्कार (संपूर्ण माहिती)
अना बर्न्स यांना मॅन बुकर पुरस्कार (संपूर्ण माहिती)
- उत्तर आयर्लंडच्या लेखिका अॅना बर्न्स (Anna Burns) यांना 16 ऑक्टोबर 2018 रोजी मॅन बुकर पुरस्कार जाहीर करण्यात आला. इंग्रजी वाण्ड्मय क्षेत्रातील प्रतिष्ठेचा समाजाला जाणारा हा सन्मान मिळविणार्या त्या उत्तर आयर्लंड या देशाच्या पहिल्या साहित्यिक ठरल्या आहेत.
- अॅना बर्न्स (वय 56 वर्ष) यांच्या ‘मिल्कमॅन‘ या कादंबरीला हा पुरस्कार मिळाला आहे. उत्तर आयर्लंडमधील राजकीय स्थित्यंतराच्या काळात एक तरुणी आणि विवाहित पुरुष यांच्यातील प्रेमकहाणी या कादंबरीतून स्पष्ट होते.
अना बर्न्स यांच्या विषयी माहिती-
- जन्म: बेलफास्ट, सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्य.
- पहिली कादंबरी: No Bones (2001), No Bones या कादंबरीसाठी ‘Winifred Hollby Memorial Prize‘ व ‘Orange Prize‘.
- दुसरी कादंबरी: Little Constructions (2007).
- ‘बुकर‘च्या 49 वर्षांच्या इतिहासात हा पुरस्कार मिळविणार्या 17व्या, तर 2013 नंतर पुरस्कार मिळविलेल्या पहिल्या महिला.
1. सुरुवात: 1969.
2. स्वरूप: 50.85 लाख रुपये.
3. इंग्रजी भाषेत उत्कृष्ट लिखाण करणार्या व्यक्तिला दरवर्षी हा सन्मान दिला जातो.
4. भारताच्या किरण देसाई यांना सन 2006 मध्ये ‘The Inneritance of Loss’ या कादंबरीसाठी व सन 2008 मध्ये अरविंद अडीगा (Arvind Adiga) यांना ‘The White Tiger‘ या कादंबरीसाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.