भारतीय व्हॉईसरॉयचा कार्यकाल बद्दल माहिती भाग 5
भारतीय व्हॉईसरॉयचा कार्यकाल बद्दल माहिती भाग 5
13. लॉर्ड वेव्हेल (1944 ते 1947) :-
वेव्हेलच्या काळातील महत्वाच्या घटना.
वेव्हल योजना :-
- लॉर्ड वेव्हल च्या काळात ब्रिटनमध्ये हाऊस ऑफ कॉमन्सच्या निवडणुका होणार होत्या. ब्रिटनमध्ये आपल्यावर होत असलेली टीका कमी व्हावी म्हणून पंतप्रधान चर्चिलने भारतीय नेत्यांशी चर्चा करण्याचे अधिकार लॉर्ड वेव्हेलला दिले, यानुसार लॉर्ड वेव्हेलने एक योजना तयार केली. ही योजना वेव्हेल योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेवर चर्चा करण्याकरिता जून 1945 मध्ये सिमला येथे भारतातील प्रमुख राजकीय नेत्यांची परिषद बोलविण्यात आली. या परिषदेमध्ये मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एकमत न होऊ शकल्यामुळे वेव्हल योजना फेटाळण्यात आली.
त्रिमंत्री कमिशन :-
- जून 1945 मध्ये इंग्लंडमध्ये निवडणुका होऊन मेजर अॅटली यांचे सरकार सत्तेवर आले. पंतप्रधान अॅटली यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये बोलताना 28 फेब्रुवारी 1946 रोजी बालतांना जून 1948 पूर्वी इंग्लंड आपली भारतातील सत्ता सोडून देईल असे जाहीर केले होते. अशी घोषणेनुसार भारताला स्वातंत्र्य देण्याच्या प्रश्नावर चर्चा करण्याकरिता त्रिमंत्री कमिशन पाठविण्याची घोषणा केली. मार्च 1946 मध्ये त्रिमंत्री कमिशन भारतात आले.
हंगामी सरकार (सन 1946 ते 1952) :-
- भारतात आलेल्या त्रिमंत्री कमिशनने भारतीयांच्या नेतृत्वखालील हंगामी सरकारची स्थापना करण्याची घोषणा केली. या तरतुदीनुसार 2 सप्टेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नेतृत्वाखाली 14 जणांचे हंगामी सरकार स्थापन करण्यात आले.
संविधान सभेची स्थापना :-
- त्रिमंत्री कामिशनच्या अहवालातील तरतुदीनुसार जुलै 1947 मध्ये प्रांतिक कायदेमंडळामार्फत संविधानसभा स्थापन करण्यात आली. हंगामी सरकार स्थापन झाल्यापासून ते स्वतंत्र भारताची पहिली निवडनुक होईपर्यंत ही संविधान सभा कायदेमंडळाचे सुद्धा काम करीत असे.
लॉर्ड माऊंट बॅटन (मार्च 1947 ते जून 1948) :-
अॅटली यांनी लॉर्ड वेव्हल यांच्या जागी लॉर्ड माऊंट बॅटन यांची व्हॉईसरॉय म्हणून नियुक्ती केली.
माऊंटबॅटन योजना :-
- 24 मार्च 1947 मध्ये माऊंट बॅटन यांनी व्हॉईसरॉय पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारतातील प्रमुख राजकीय नेत्यांशी विचार विनिमय करून सत्तातराविषयी योजना तयार केली. या योजनेची 3 जून 1947 रोजी जाहीर घोषणा करण्यात आली. माऊंट बॅटनने जाहीर केलेली ही योजना भारताच्या इतिहासामध्ये फाळणीची योजना म्हणून ओळखली जाते.
भारतीय स्वातंत्र्याचा कायदा :-
- लॉर्ड माऊंटबॅटन यांनी ही योजना प्रसिध्द केली. या योजनेवर आधारित 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पास केला. 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तान व 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत हे दोन जगाच्या पाठीवर स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात आले.