भारतात मुस्लिम सत्तेची स्थापना

भारतात मुस्लिम सत्तेची स्थापना

Must Read (नक्की वाचा):

प्राचीन भारताचा इतिहास

1. महंमद गझनवी :-

  • अकराव्या शतकापासून भारतावर तुर्काची आक्रमणे होण्यास सुरुवात झाली. गझनीचा तुर्क सत्ताधीश सबक्तगीन याने भारतावर स्वार्‍या करून पंजापर्यंत प्रांत आपल्या राज्याला जोडला होता.
  • सन 998 मध्ये त्याचा मुलगा महंमद हा गझनचा सुलतान झाला.
  • त्याने सन 1001 ते 1027 पर्यंत भारतावर सतरा स्वार्‍या केल्या. या स्वार्‍या करतांना राज्य स्थापनेऐवजी भारतातील संपत्ती लुटून नेणे हा त्यांचा मुख्य हेतु होता.

    त्याने मथुरा व सोमनाथचे मंदिर लुटून अमाप संपत्ती गझनीला नेली.

2. महंमद घुरी :-

  • महंमद घुरी हा अफगाणिस्तानमधील एक सुलतान होता. महंमद गझनवी स्वार्‍यानंतर दीडशे वर्षांनी त्याने भारतावर आक्रमण केले.
  • सन 1992 मध्ये तराईनच्या सुद्धा दिल्लीचा राजा पृथ्वीराज चव्हाण याचा पराभव करून दिल्ली ताब्यात घेतली त्यानंतर कनोजचा राजा जयचंदचा पराभव करून त्याचे राज्य आपल्या ताब्यात घेतले पुढे त्याने बंगाल व बिहारवर आक्रमण करून सत्ता स्थापित केली.
  • त्याने जिंकलेल्या प्रदेशाचा राज्यकारभार बघण्याकरिता आपला विश्वासू सरदार कुतूबुद्दीन ऐबकची नियुक्ती केली.
  • अशाप्रकारे भारतात मुस्लिम साम्राज्य प्रस्तापित झाले. त्यानंतरच्या काळात दिल्लीच्या गादिवर खालील सत्ताधीश आले.

कुतूबुद्दीन ऐबक (सन 1206 ते 1210) :

 

  • सन 1206 मध्ये महंमद घुरी मरण पावला. त्यानंतर कुतूबुद्दीन ऐबकने स्वत:ला स्वतंत्र राजा म्हणून घोषित केले.
  • याच काळात ऐबकने दिल्लीच्या कुतुबमिनारच्या बांधकामास सुरवात केली.
  • सन 1210 मध्ये तो मरण पावला.
  • त्याच्या ठिकाणी त्याचा बदायुनचा सुभेदार आणि कुतूबुद्दीन ऐबकचा जावई अल्तमश सत्तेत आला.

शमशूद्दीन अल्तमश (सन 1210 ते 1226) :

  • कुतूबुद्दीन ऐबकच्या मुत्यूनंतर काही सरदारांनी अल्तमशविरुद्ध बंडखोरी केली होती. ती ऐबकने मोडून काढली आणि स्थिरता प्रस्थापित केली.
  • बगदादच्या खलीपाने त्यास भारताचा सुलतान म्हणून मान्यता दिली.
  • अल्तमश हा दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून ओळखला जातो.
  • अल्तमशला सुलतान म्हणून मान्यता मिळाल्यानंतर त्याने टका नावाचे नाणे सुरू केले होते. त्याने आपल्या हयातीमध्ये कुतूबमिनारचे बांधकाम पूर्ण केले.

रझिया सुलतान (सन 1226 ते 1240) :

  • अल्तमशच्या मृत्यूनंतर त्याची मुलगी रझिया सुलतान दिल्लीच्या राजगादिवर आली. ती प्रजादक्ष आणि कर्तबगार स्त्री होती.
  • परंतु, दिल्लीच्या सिंहासनावर एक स्त्री असने हे सरदारांना खपत नव्हते.
  • दिल्लीचे सुलतान पद भूषविणारी ती एकमेव पहिली महिला होती.
  • सन 1240 मध्ये तिचा वध करण्यात आला.

गियासुद्दून बल्बन (सन 1266 ते 1287) :

  • रझिया सुलतानच्या मृत्यूनंतर दिल्लीच्या गादीवर काही प्रमाणात अस्थिरता आली होती. सन 1266 मध्ये गियासुद्दीन बल्बन हा दिल्लीचा सुलतान झाला.
  • त्याने आपल्या विरोधकाचा बंदोबस्त करून आपली सत्ता मजबूत केली.
  • तात्काळ युद्ध करता यावे म्हणून त्याने खडे सैन्य ठेवण्याची प्रथा सुरू केली. यामुळे तास वायव्य सीमेवर मंगोलाचा बंदोबस्त करता आला.
  • उर्दू भाषेचा रचयिता आणि प्रसिद्ध कवि या राजाचा दरबारी होता.

जलालूद्दीन खिलजी (सन 1290 ते 1296) :

  • गियासुद्दीन बल्बनच्या मृत्यूनंतर त्याचे वारस कमकुवत निघाले. याचा फायदा घेवून पंजाबचा प्रांधिकारी जलालूद्दीन खिलजीने दिल्लीच्या गादीवर आपला हक्क प्रस्तापित करून खिलजी वंशाची स्थापना केली.
  • त्याचा पुतण्या अल्लाऊद्दीन खिलजी हा पराक्रमी आणि महत्वाकांक्षी होता.
  • त्याने सन 1296 मध्ये देवगिरीवर आक्रमण करून अमाप संपत्ती लुटली.
  • ही बातमी ऐकून जलालूद्दीन खिलजी आपल्या पुतण्याला भेटावयास कडा येथे गेला असता.
  • अल्लाऊद्दीनने त्याचा वध केला आणि दिल्लीची सत्ता हस्तगत केली.

अल्लाऊदीन खिलजी (सन 1296 ते 1316) :

  • अल्लाऊद्दीन खिलजी हा महत्वाकांक्षी होता. त्याने अल्पावधीतच संपूर्ण भारत आपल्या नियंत्रणाखाली आणला.
  • सम्राट अशोकानंतर संपूर्ण भारतावर सत्ता प्रस्तापित करणारा अल्लाउद्दीन खिलजी हा दूसरा राजा होय.

अल्लाउद्दीन खिळजीचा साम्राज्य विस्तार :-

  • सन 1299 मध्ये त्याने गुजरातवर आक्रमण करून गुजरातवर सत्ता प्रस्तापित केली.
  • त्यानंतरच्या काळात राजपुताना, मेवाड, माळवा व राजस्थानवर ताबा मिळविला.
  • सन 1306 मध्ये त्याचा सेनापती मलिक कफुरने दक्षिणेकडे मोहीम काढून दिवगिरी, तेलंगणा, मुदराईवर ताबा मिळविला.
  • अशाप्रकारे अल्पावधीतच संपूर्ण भारत नियंत्रणाखाली आणला.

अल्लाउद्दीन खिलजीच्या काळातील सुधारणा :-

महसूल व्यवस्थेत सुधारणा :-

  • अल्लाउद्दीन खिलजीने जमिनीची मोजणी करून जमिनीच्या उत्पादकेनुसार शेतसारा निश्चित केला.

बाजार नियंत्रण व्यवस्था :-

  • सैन्यास खाद्यन्न आणि आवश्यक गरजेच्या वस्तु योग्य दरात उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्याने नियंत्रित बाजार व्यवस्था सुरू केली.
  • या मालाचे भाव सरकारमार्फत निश्चित केले जात असे.
  • त्याकरिता त्याने स्वतंत्र विभाग सुरू केला होता.

गियासुद्दीन तूघलक (सन 1320 ते 1325) :

  • अल्लाउद्दीन खिलजीच्या मुत्यूनंतर त्याचा मुलगा ख्रुस्त्रो खान सत्तेत आला.
  • वायव्य सरहद्द प्रांताचा प्रांधिकारी गियासुद्दीन तुघलकने ख्रुस्त्रोखानचा खून करून दिल्लीची सत्ता हस्तगत केली आणि तुघलक वंशाची स्थापना केली.
  • हे सुख त्याला फार दिवस उपभोगता आले नाही.
  • त्याचा मुलगा महंमदबिन तुघलकने कपटाने त्याला ठार करून दिल्लीची सत्ता हस्तगत केली.

महंमदबिन तुघलक (सन 1325 ते 1351) :-

  • महंमदबिन तुघलक हा उतावीळ्या स्वभावाचा आणि व्याहारकी दृष्टीकोणाच्या अभावामुळे त्या राबवितांना त्यास अपयश आले.

दूआबमध्ये करवृद्धी (सन1326) :-

  • दूआब भारतातील सर्वात सुपीक प्रदेश आहे. या प्रांतातील शेतकर्‍यांवर कराची वाढ केली.
  • ही योजना लागू करतांना दूआबमध्ये दुष्काळ पडला आणि अधिकार्‍यांनी जबरदस्तीने कराची वसूली केली. यामुळे दूआबमध्ये बंड झाले.

देवगिरी भारताची राजधानी (1326) :-

  • दिल्लीचा बादशहा महंमदबिन तुघलकने आपल्या राज्याच्या केंद्रवरती ठिकाण म्हणून देवगिरीची तुघलक साम्राज्याची राजधानी म्हणून निवड केली.
  • सन 1326 मध्ये त्याने दिल्लीच्या जनतेसह दिवगिरी येथे आगमन केले. यावेळी देवगिरीचे नांव दौलताबाद असे करण्यात आले.
  • परंतु, दौलताबाद येथे साधंनाचा अभाव असल्यामुळे पुन्हा त्याने दिल्लीला प्रस्थान केले.
  • या काळात देवगिरीला भारताच्या राजधानीच सन्मान प्राप्त झाला होता.

चलन व्यवस्थेत सुधारणा (सन 1329) :-

  • महंमदबिन तुघलकने मुद्रापद्धतीत सुधारणा करून तांब्याची मुद्रा प्रचारात आणली आणि सोन्याच्या मुद्रेच्या मोबदल्यात तांब्याची नाणे चलनात आली.
  • लोकांनी घरीच टाकसाळ सुरू केला.
  • बाजारात तांब्याच्या चलनाचा सुळसूळाट होवून सोन्याची नाणी गायब झाली.

फिरोझशहा तुघलक (सन 1351 ते 1388) :-

  • महंमदबिन तुघलक नंतर त्याचा मुलगा फिरोझशहा तुघलक सुलतान झाला. हा उत्तमप्रशासक होता. त्याने लोककल्याणाची काम सुरू केली यामुळे तो विशेष प्रसिद्धीला आला होता.
  • त्याने लोकांना जाचक असलेले कर रद्द करून फिरोझपूर, जौनपूर, हिस्सार व फिरोझाबाद ही नवीन शहरे बसविली सतलज आणि यमुना नदीवर कालवे काढले.
  • फिरोजशहा तुघलक नंतर सत्तेत आलेले तुघलक घराण्याचे वारस कमकुवत निघाले.
  • सन 1398 मध्ये मध्य आशियाचा सरदार तैमुलंगने भारतावर स्वारी करून प्रचंड लूट केली. या लुटीमधून दिल्ली महंमदबिन तूघलकने सुद्धा सुटली नाही.
  • त्यानंतर सन 1414 मध्ये तूघलक घराण्याची सत्ता संपूष्ठात आली.
Must Read (नक्की वाचा):

मौर्यकालीन भारत

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.