भारतातील बँका

भारतातील बँका

  • भारतातील संघटित बँकव्यवसायामध्ये मालकीच्या आधारावर दोन प्रकारच्या बँकांचा समावेश होतो: सार्वजनिक क्षेत्रातील बँका व खाजगी क्षेत्रातील बँका.

 

सार्वजनिक क्षेत्रातील बँका (Public Sector Bnaks) –

  • सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये खालील 3 बँक समुहांचा समावेश होतो.
  1. SBI समूह – SBI आणि तिच्या पाच सहयोगी बँका.
  2. 19 राष्ट्रीयीकृत बँका.
  3. प्रादेशिक ग्रामीण बँका (RRBs) (मात्र त्यांच्या विलिनीकरणार्‍या धोरणांमुळे त्यांची संख्या फेब्रुवारी 2013 पर्यंत 82 एवढी कमी झाली आहे.)
  • 2005 मध्ये IDBI Bank चे विलिनीकरण IDBI मध्ये करण्यात आल्याने निर्माण झालेली IDBI Bank Ltd. ही बँक देशातील 28 वी सार्वजनिक क्षेत्रातील बँक (RRBs वगळता) ठरली होती.
  • मात्र 13 ऑगस्ट 2008 पासून स्टेट बँक ऑफ सौराष्ट्रचे व 26 ऑगस्ट 2010 पासून स्टेट बँक ऑफ इंदोरचे भारतीय स्टेट बँकेतील विलिनीकरण झाल्याने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या पुन्हा 26 (RRBs वगळता) झाली आहे.

खाजगी क्षेत्रातील बँका (Private Sector Banks) –

  • भारतातील खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये भारतीय खाजगी बँका व परकीय खाजगी बँका अशा दोन बँक-समुहांचा समावेश होतो.   

भारतीय खाजगी बँका –

  • सद्ध्या भारतात काम करणार्‍या खाजगी बँकांचे तीन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते; जुन्या खाजगी बँका, नव्या खाजगी बँका व स्थानिक क्षेत्रीय बँका.

A. जुन्या खाजगी बँका –

  • 1969 व 1980 च्या बँकांच्या राष्ट्रीयीकरणाबरोबर जवळजवळ 93 टक्के व्यापारी बँक व्यवसाय सार्वजनिक क्षेत्रात आला.
  • 1969 पासून खाजगी क्षेत्रात बँका स्थापन करण्यासाठी परवाना देण्याचे धोरण रिझर्व्ह बँकेने बंद केले.
  • मात्र 1969 पूर्वी स्थापन झालेल्या खाजगी बँका कार्य करीत राहिल्या. त्यांना जुन्या खाजगी बँका असे म्हटले जाते.
  • त्यांच्यापैकी काही महत्वाच्या बँका खालीलप्रमाणे –
  1. फेडरल बँक मर्या.
  2. वैश्य बँक मर्या.
  3. करूर वैश्य बँक मर्या.
  4. युनायटेड वेस्टर्न बँक मर्या. (आयडीबीआय बँकेत विलीन)
  5. कर्नाटक बँक मर्या.
  6. बँक ऑफ मदुरा मर्या.
  7. सांगली बँक मर्या.
  8. लक्ष्मी विलास बँक मर्या.
  9. धनलक्ष्मी बँक मर्या.
  10. नेंदुगडी बँक मर्या.
  11. लॉर्ड कृष्ण बँक मर्या.
  • सध्या (फ्रेब्रुवारी, 2013 मध्ये) भारतात 15 जुन्या खाजगी बँका कार्य करीत आहेत.

B. नव्या खाजगी बँका

  • 1991 च्या आर्थिक सुधारणा सुरू झाल्यावर स्थापन करण्यात आलेल्या वित्तीय क्षेत्र सुधारणाविषयक नरसिंहन समितीने बँकिंग क्षेत्रावरील नियंत्रण दूर करण्याबाबत शिफारसी केल्या. त्यानुसार, RBI ने जानेवारी 1993 मध्ये खाजगी क्षेत्रात नवीन बँका स्थापन करण्यातबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली.
  • या शिथिल धोरणाच्या आधारावर सुरूवातीला 10 नव्या खाजगी बँकांची स्थापना झाली. युटीआयबँक (अहमदाबाद) ही त्यांच्यापैकी पहिली बँक होती. त्यांना नव्या खाजगी बँका असे म्हणतात. कालांतराने त्याची संख्या वाढली.
  • मात्र विलीनीकरणामुळे आज (फेब्रुवारी, 2013) केवळ 7 नव्या खाजगी बँका कार्यरत आहेत. खाजगी क्षेत्रात नव्या बँका स्थापन करण्याच्या RBI च्या जानेवारी 1993 च्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये RBI ने 3 जानेवारी 2001 मध्ये काही बदल घडवून आणले.
You might also like
1 Comment
  1. Krishna barvkar says

    Nice notas

Leave A Reply

Your email address will not be published.