भारतातील पवित्र स्थळे
भारतातील पवित्र स्थळे
Must Read (नक्की वाचा):
आयोध्या | उत्तर प्रदेश, राम जन्म-भूमी म्हणून प्रसिद्ध. |
हरिव्दार | गंगेच्या काठी कुंभमेळा भरतो. |
सारनाथ | बनारस जवळ गौतमबुद्धाचे पहिल्या प्रवचनाचे प्रसिद्ध ठिकाण. |
बुद्धगया | बिहारमध्ये बुद्धाला बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले. |
रामेश्वर | तामिळनाडूमध्ये शंकर पिंडीवर कावड आणून गंगोत्री जल वाहतात. |
बद्रीनाथ | हिमालयात श्री विष्णूचे पवित्र मंदिर. |
बनारस | (काशी, वाराणसी) येथे गंगेच्या काठी विश्वेश्वर मंदिर आहे. |
माऊंट अबु पहाड | राजस्थान दिलवाडा पर्वतमाला जैन मंदीरे आहेत. |
तिरूपती बालाजी | आंध्र प्रदेशात श्री बालाजीचे देशातील सर्वात श्रीमंत मंदिर, केशवपन मोठया प्रमाणावर केले जाते. |
पंढरपूर | महाराष्ट्रात हिंदूचे श्रीविठ्ठल मंदिर प्रसिद्ध, आषाढ कार्तिक महिन्यात यात्रा भरते. |
केदारनाथ | हिमालयात श्री शंकराचे प्राचीन देवालय. |
जगन्नाथपुरी | जगन्नाथाची रथयात्रा प्रसिद्ध. |
अलाहाबाद | गंगा, यमुना, सरस्वती या तीन नद्यांचा त्रिवेणी संगम, 12 वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. |
बद्रिनाथ | हिमालयात श्री विष्णूचे प्राचीन देवालय. |
कोल्हापूर | महालक्ष्मी मंदिर. |
शिर्डी | श्री साईबाबाचे समाधीस्थान (महाराष्ट्र) |
शेगांव | विदर्भात अकोल्याजवळ श्री संत गजानन महाराजांची समाधी आहे. |
मथुरा | श्रीकृष्ण मंदीरे, कृष्ण जन्म स्थान. |
नांदेड | शिखाचे दहावे धर्मगुरू श्री गुरु गोविंदसिंहाची समाधी आहे. |
अमृतसर | पंजाबात शिख धर्मियांचे सुवर्ण मंदिर प्रसिद्ध आहे. |
अमरनाथ | काश्मिरमध्ये श्रावण पोर्णिमेला बर्फाचे स्वयंभू शिवलिंग निर्माण होते. त्या दिवशी उत्सव असतो. |
पार्श्वनाथ | बिहार प्रांतात जैन धर्माची 55 देवालये आहेत. |