Current Affairs (चालू घडामोडी) of 13 January 2015 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून खुल्लर |
2. | किशोर आमोणकर यांना विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी |
3. | अनिवासी भारतीयांना मिळणारा ई-मतदानाचा हक्क |
नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून खुल्लर :
- नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून केंद्र सरकारने सिंधुश्री खुल्लर यांची नेमणूक केली आहे.
- खुल्लर या नियोजन मंडळाच्या माजी सचिव आहेत.
- खुल्लर या 1975 च्या बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत.
किशोर आमोणकर यांना विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी :
- प्रसिद्ध गायक पद्मविभूषण किशोर आमोणकर यांना मुंबईतील एसएनडिटी विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली.
- संगीत क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल मानद डॉक्टरेट पुरस्कार दिला जातो.
- किशोर यांना डॉक्टरेट पदवी प्रदान राज्यपालांच्या हस्ते देण्यात आली.
- या विद्यापीठाची स्थापना 1961 साली करण्यात आली होती.
- एसएनडिटी विद्यापीठाने या वर्षी 99 वर्षात पदार्पण केले आहे.
अनिवासी भारतीयांना मिळणारा ई-मतदानाचा हक्क :
- अनिवासी भारतीय देखील आता टपाल मतपत्रिकेव्दारे ई-मतदानाचा हक्क बजावू शकतात.
- सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला त्याबाबत योग्य पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.