Current Affairs (चालू घडामोडी) of 24 November 2014 For MPSC Exams

अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना |
2. | मॅग्नस कार्लसन ठरला बुद्धिबळाचा जगज्जेता |
3. | दोन भारतीय ख्रिस्त धर्मगुरूंना मिळाला ‘संत’ पदाचा बहुमान |
4. | शिव मंदिराच्या व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी |
5. | पंडित बिर्जू महाराज यांना आदित्य विक्रम बिर्ला कला शिखर पुरस्कार |
सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना:
- सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजनेंतर्गत एक किवा दोन मुलींवर थांबणार्याना प्रोत्साहन अनुदान दिले जाते.
- मुलगी एक असेल तर आईला रोख 2 हजार व मुलीच्या नावे 8 हजार रुपयांची ‘एफडी’ (Fixed Deposit) केली जाणार आहे.
- 2 मुली असतील तर मातेस रोख 2 हजार व दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी 4 हजार ‘एफडी’ केली जाईल. ‘एफडीची’ रक्कम मुलीच्या 18 वर्षांनंतर मिळेल.
मॅग्नस कार्लसन ठरला बुद्धिबळाचा जगज्जेता:
- कार्लसनने अकरा डावांमध्ये तीन विजय मिळवले तर, आनंदला फक्त एक विजय मिळवता आला होता.
- कार्लसन सलग दुसर्यांदा जगज्जेतेपद मिळवले आहे तर आनंदने आत्तापर्यंत पाचवेळा विजेतेपद मिळवले आहे.
- नॉर्वेचा अव्वल मानांकीत मॅग्नस कार्लसन याने विश्वविजेते पदाचा आव्हानवीर विश्वनाथन आनंद चा एक डाव बाकी ठेवून पराभव केला आहे.
दोन भारतीय ख्रिस्त धर्मगुरूंना मिळाला ‘संत’ पदाचा बहुमान:
- विश्वातील एकूण पाच धर्मगुरूंना मिळाले ‘संत’ पद; त्यात भारताचे फादर कुरीयाकोस इलायस छवारा आणि सिस्टर इफारासिया या केरळ चा दोन कॅथॉलिन ख्रिश्चन धर्मगुरूंना पोप फ्रान्सिस यांनी रविवारी ‘संत’ पद बहाल केले.
- यापूर्वी 2008 मध्ये सिस्टर अल्फान्सा यांना ‘संत’ पद मिळाले होते.
- केरळच्या 100 वर्ष जुन्या असलेल्या सायरो मलबार कॅथॉलीक चर्चमधील आतापर्यत तिघांना ‘संत’ पद देण्यात आले आहे.
शिव मंदिराच्या व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी:
- थायलंड आणि कंबोडिया यांच्या सीमेवर असलेल्या प्रेह विहार या वादग्रस्त शिव मंदिराचे व्यवस्थापन संयुक्तपणे करण्याचा निर्णय भारत आणि चीन यांनी घेतला आहे.
- हे मंदिर यूनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत असून, त्यांच्या मालकीवरून थायलंड आणि कंबोडियामध्ये युद्धेही झाली आहे.
पंडित बिर्जू महाराज यांना आदित्य विक्रम बिर्ला कला शिखर पुरस्कार:
- आदित्य विक्रम बिर्ला कला शिखर पुरस्कार विख्यात कथ्थक गुरु ‘पंडित बिर्जू महाराज‘ यांना शनिवारी राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते मुंबई समारंभापूर्वी देण्यात आला.
- संगीत कला केंद्राच्या वतीने दरवर्षी नामांकित कलाकारांना हा पुरस्कार देण्यात येतो.
Superb this page