Current Affaire (चालू घडामोडी) of 17 November 2014 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | सायना नेहवाल, कदम्बी श्रीकांतला विजेतेपद |
2. | ‘जी-20’ ची कसोटी |
3. | किसान वाहिनी जानेवारीत |
4. | रोसेटा मोहिमेत धुमकेतूची छायाचित्रे व माहिती मिळाली |
सायना नेहवाल, कदम्बी श्रीकांतला विजेतेपद:
- भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाळ आणि कदम्बी श्रीकांत यांनी रविवारी चीन भूमीवर तिरंगा फडकावला.चायना खुल्या सुपर ‘सिरिस प्रिमियर’ स्पर्धेत प्रथमच विजेतेपद प्राप्त करून या दोघांनी ईतिहास घडवला.
- सात लाख अमेरिकन डॉलर रकमेचा या स्पर्धेत सायनने जपानच्या युवा अकेन यामागूची हिचा 21 -12, 22-20 अशा फरकाने पराभव केला आणि या वर्षातील तिसरे विजेतेपद जिंकले.
- 21 वर्षीय श्रीकांतचे चीनच्या पाच वेळा विश्वविजेत्या लीन डानाचे आव्हान 21-19, 21-17 असे मोडीत काढले.
‘जी-20’ ची कसोटी:
- ऑस्ट्रेलियातील ब्रिस्टेन येथे रविवारी वीस राष्ट्रांच्यागटाची बैठक पार पडली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेली काळ्या पैशाची भूमिका संपूर्ण संघटनेने उचलून धरली.
- काळ्या पैशाची माहिती आपोआप मिळावी त्यासाठी नवे जागतिक धोरण ठरवावे, असे मोदी यांचे म्हणणे होते.
किसान वाहिनी जानेवारीत:
- दूरदर्शन किसान टीव्ही चॅनल जानेवारीच्या मध्यवधीत कार्यक्रम प्रक्षेपित करण्यास सुरू करील, असे सांगण्यात आले.
- वरिष्ठ अधिकार्यांनी दिलेल्या महितींनुसार जानेवारी मध्यवधिपर्यंत दूरदर्शन ची 24 तास किसान वाहिनी सुरू करण्याचा उद्देश आहे. त्यासाठी भारती प्रक्रिया सुरू असून विविध पदांसाठी व्यवसायिकांना स्थान दिले जात आहे. या वाहिनी साठी 100 कोटी रुपये खर्च येणार आहे.
रोसेटा मोहिमेत धुमकेतूची छायाचित्रे व माहिती मिळाली:
- युरोपीय आकाश संस्थेच्या फिलि या यंत्रमानवरूपी ल्यडरने 64 पी चुरयुमोवगेरिसमेन्को या धुंकेतुवर चांगले बस्तान बसवले असून त्याने रोसेटा या मातृयानाशी संपर्क साधला. शिवाय याची छायाचित्रे पृथ्वीकडे पाठवली आहेत.
- हे लेडर अपेक्षित स्थांनापासून 1 की.मी अंतरावर उतरले होते. यानाने धुमकेतूची घनता, रचना, तापमान, व वातावरण याचा अभ्यस केला आहे.