चालू घडामोडी (1 ऑगस्ट 2017)
प्रा. संजय खडसे यांना उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्कार जाहीर :
- बाळापूर येथील उपविभागीय अधिकारी प्रा संजय खडसे यांना सन 2016-17 या वर्षांचा महाराष्ट्र शासनाचा अमरावती विभाग स्तरावरील उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे.
- महसूलदिनी 1 ऑगस्टला अमरावती येथे विभागीय आयुक्त यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे .
- अकोला व बाळापुर येथे केलेल्या लोकाभिमुख कामाची व सामाजिक जाणिवेतून केलेल्या कामाची दखल घेतली.
- प्रा. संजय खड्से यानी मिशन दिलासामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले. अनाथ मुलांचा शोध घेऊन त्यांना मदत केली. प्रशासनामध्ये संगणकाचा वापर करून प्रशासन गतिमान केले.
- सर्व सामान्य नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक अतिशय तत्परतेने करतात स्पर्धात्मक परीक्षेच्या विद्यार्थ्याना मार्गदर्शन इत्यादी उपक्रमांमुळे सर्वसामान्य नागरिकात प्रा. खडसे लोकप्रिय आहेत.
- तहसीलदार असताना त्यांना 2012-13 मध्ये देखील सर्वोत्कृष्ट तहसीलदार पुरस्कार प्राप्त झाला होता.
बांधकाम क्षेत्रातील प्रिमीयम एफएसआय दर वाढणार :
- बांधकाम क्षेत्राला गती मिळावी म्हणून सरकारने मंजूर केलेला वाढीव बांधकामासाठीच्या प्रिमीयम एफएसआयचा (चटई क्षेत्र निर्देशांक) दर वाढवण्याचा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारला दिला आहे.
- सरकारने नुकताच हा दर निश्चित केला होता. मात्र तो टीडीआरपेक्षा (हस्तांतरणीय विकास हक्क) कमी असल्याने त्याचा विकासकामांसाठी आरक्षण टाकून भूखंड मिळण्यावर परिणाम होणार असल्याने महापालिकेने हा वाढीव दराचा प्रस्ताव तयार केला आहे.
- महापालिका विकास आराखड्यात नागरी हितासाठी म्हणून अनेक भूखंडांवर आरक्षण टाकत असते. त्या भूखंडमालकांना पूर्वी नुकसानभरपाई म्हणून सरकारी रेडीरेकनरच्या दराप्रमाणे रोख रक्कम दिली जात असे.
- मात्र ही रक्कम बाजारभावापेक्षा कमी असते. त्यामुळे भूखंडमालकांचे आर्थिक नुकसान होते. ही बाब लक्षात घेऊन काही वर्षांपूर्वी नुकसानभरपाई म्हणून टीडीआर देण्याचा निर्णय झाला. ही टीडीआरसंबधित जागा मालकाला योग्य त्या ठिकाणी कायदेशीरपणे एखाद्या बांधकाम विकसकाला विकता येतो.
- पण आता सरकारने वाढीव बांधकामासाठी प्रिमीयम एफएसआय देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा दर बांधकामांच्या प्रकारानुसार प्रतिचौरस फुटासाठी बाजारभावाच्या 50 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे.
कामगार नेते नाना क्षीरसागर यांचे निधन :
- ज्येष्ठ कामगार नेते नाना क्षीरसागर (वय 62 वर्षे) यांचे 31 जुलै रोजी निधन झाले. त्यांनी महाराष्ट्र कामगार सेना, महाराष्ट्र रिक्षा सेना, महाराष्ट्र हमाल सेना, हातगाडी पथारी संघटना, महाराष्ट्र टेम्पो सेना अशा अनेक संघटनांच्या माध्यमातून असंघटित कामगारांसाठी काम उभे केले होते.
- नाना यांचे पूर्ण नाव किशोर माधव क्षीरसागर असे होते. ते गुरुवार पेठेतील फुलवाला चौकामध्ये राहत होते.
- नानांनी ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार निर्मूलन संस्थेचे पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले होते.
- तसेच यासोबत डॉ. बाबा आढाव यांच्या बांधकाम कामगार पंचायतीचेही काही काळ काम केले होते. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र संघटना सुरु केल्या. विविध असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या संघटना त्यांनी सुरु केल्या.
स्वयंपाकाच्या गॅसचे अनुदान बंद होणार :
- स्वयंपाकाच्या गॅसवर दिले जाणारे अनुदान टप्प्याटप्प्याने पूर्णपणे बंद करण्याचे सरकारने ठरविले असून अनुदान शून्यावर येईपर्यंत सिलिंडरच्या किमती दरमहा चार रुपयांनी वाढविण्यास तेल कंपन्यांना सांगितले आहे.
- सध्या ग्राहकास वर्षाला 14.2 किलोचे 12 गॅस सिलिंडर अनुदानित दराने मिळतात. त्याहून जास्त लागणारे सिलिंडर बाजारभावाने घ्यावे लागतात.
- पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, मार्च 2018 किंवा अनुदान शून्यावर होईपर्यंत सिलिंडरची किंमत दरमहा चार रुपयांनी वाढविली जाईल. तसेच सिलिंडरवरील अनुदान हळूहळू कमी करून शून्यावर आणण्याचे ठरविले आहे.
- इंडियन ऑईल, हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम या सरकारी कंपन्यांना 1 जुलै 2016 पासून दरमहा दोन रुपयांनी दर वाढविण्याची परवानगी सरकारने दिली होती. त्याप्रमाणे 10 वेळा दरवाढ केली.
- तसेच मंत्री पुढे म्हणाले की, आता ही मासिक दरवाढ दुप्पट केली आहे. सिलिंडरची किंमत बाजारभावाच्या पातळीवर येईपर्यंत किंवा पुढील आदेश होईपर्यंत ही दरवाढ सुरू राहील. सिलिंडरच्या किमतीत दरमहा केली जाणारी ही वाढ ‘व्हॅट’ वगळून असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दिनविशेष :
- मराठी लेखक व समाजसुधारक ‘अण्णाभाऊ साठे’ यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 मध्ये झाला.
- 1 ऑगस्ट 1920 हा दिवस भारतीय स्वातंत्र्यसैनिक ‘बाळ गंगाधर टिळक’ यांचा स्मृतीदिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा