Current Affairs of 1 December 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (1 डिसेंबर 2015)

चालू घडामोडी (1 डिसेंबर 2015)

पोलिस आयुक्‍त जावेद अहमद यांची सौदी अरेबियाच्या राजदूतपदी नियुक्‍ती :

  • मुंबईचे पोलिस आयुक्‍त जावेद अहमद यांची सौदी अरेबियाच्या राजदूतपदी नियुक्‍ती होणार असून त्यांच्या रिक्‍त जागी संजय बर्वे किंवा दत्ता पडसलगीकर यांची नियुक्‍ती होण्याची चर्चा सुरू आहे.
  • सध्या महाराष्ट्राच्या सेवेत असणारे संजय बर्वे तसेच दिल्लीत इंटेलिजन्स ब्युरोत असणारे दत्ता पडसलगीकर आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ अधिकारी सतीश माथूर यांची नावे या पदासाठी चर्चेत आहेत.

‘मुंबई इंडियन्स’ संघाच्या मुख्य मार्गदर्शकपदावरून अनिल कुंबळेची सोडचिठ्ठी :

  • ‘इंडियन प्रीमिअर लीग’मधील (आयपीएल) ‘मुंबई इंडियन्स’ संघाच्या मुख्य मार्गदर्शकपदावरून पायउतार होण्याचा निर्णय अनिल कुंबळे यांनी जाहीर केला.
  • जानेवारी 2013 पासून कुंबळे ‘मुंबई इंडियन्स’चे मुख्य मार्गदर्शक म्हणून काम पाहत होते.
  • कुंबळे यांच्या कारकिर्दीमध्ये मुंबईच्या संघाने 2013 आणि 2015 मध्ये ‘आयपीएल’मध्ये विजेतेपद पटकाविले.
  • तसेच 2013 मध्ये चॅम्पियन्स लीग स्पर्धेमध्येही मुंबईचा संघ अजिंक्‍य होता.

आमदार वसंत कुशवाह यांचे निधन :

  • बिहारमधील मधुबनी जिल्ह्याचे आमदार वसंत कुशवाह यांचे शपथविधीपूर्वीच हृदयविकाराने निधन झाले.
  • बिहार विधानसभेत आज शपथविधी होणार असल्यामुळे कुशवाह हे रविवारी रात्री शहरात दाखल झाले होते.

केंद्रांमधून मॅगी नूडल्सचे उत्पादन सुरु केल्याचा निर्णय :

  • नेस्ले इंडिया या कंपनीने भारतामधील सर्व केंद्रांमधून मॅगी नूडल्सचे उत्पादन सुरु केल्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली.

    Maggi

  • सुमारे पाच महिन्यांच्या बंदीनंतर गेल्या 9 नोव्हेंबर रोजी मॅगी नूडल्सचे उत्पादन पुन्हा सुरु करण्यात आले होते. यानंतर आता टप्प्याटप्प्याने मॅगी उत्पादनाचे सर्व प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्यात आल्याचे नेस्लेने स्पष्ट केले आहे.
  • ताहलिवाल (हिमाचल प्रदेश), मोगा (पंजाब), बिचोलीम (गोवा), नंजांगुड (कर्नाटक) व पंतनगर (उत्तराखंड) येथे मॅगी नूडल्सची उत्पादन केंद्रे आहेत.
  • तसेच अन्न तपासणीच्या मापदंडांची समाधानकारक पूर्णता न करु शकल्याच्या आरोपामुळे मॅगीवर बंदी घालण्यात आली होती. याशिवाय 30 हजार टनांपेक्षा जास्त मॅगी नूडल्स नष्टही करण्यात आले होते. कंपनीस यामुळे 450 कोटी रुपयांचा फटका बसला होता.

महात्मा गांधी यांना पाठविण्यात आलेली पत्रे प्रसिद्ध करण्याचा निर्णय :

  • महात्मा गांधी यांनी त्यांच्या काळातील अनेक प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांशी केलेली वैचारिक देवाणघेवाण प्रकाशमान करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी यांना पाठविण्यात आलेली साडेआठ Mahatma Gandhiहजारांपेक्षा जास्त पत्रे प्रसिद्ध करण्याचा निर्णय साबरमती आश्रमने घेतला आहे.
  • “कलेक्‍टेड वर्क्‍स ऑफ महात्मा गांधी” या ग्रंथामध्ये गांधी यांनी लिहिलेली 31 हजारांपेक्षा जास्त पत्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
  • मात्र यामध्ये गांधी यांना पाठविण्यात आलेल्या पत्रांचा समावेश करण्यात आलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर, हा निर्णय घेण्यात आला आहे.
  • रोमां रोलॉं, रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, मेडेलेन स्लेड (मीराबेन), इस्थर फेरिंग अशा अनेक प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांनी गांधीजींना पाठविलेली पत्रे व या माध्यमामधून झालेली, ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली चर्चा यामुळे प्रकाशात येणार आहे.

रविचंद्रन अश्विनची क्रमवारीत तीन स्थानाने प्रगती :

  • भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने आयसीसीतर्फे जाहीर करण्यात आलेल्या कसोटी गोलंदाजांच्या मानांकनामध्ये तीन स्थानाने प्रगती करताना कारकिर्दीतील सर्वोत्तम दुसऱ्या स्थानी झेप घेतली.
  • अश्विनसह डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि लेग स्पिनर अमित मिश्रा यांनी कारकिर्दीतील सर्वोत्तम मानांकन पटकावले.
  • दिल्लीतील फिरोज शाह कोटला मैदानावर खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळविला तर मानांकनामध्ये टीम इंडियाला दुसऱ्या स्थानावर दाखल होण्याची संधी राहील.
  • अश्विन कसोटी मानांकनामध्ये 856 मानांकन गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. यापूर्वी अश्विन 806 मानांकन गुणांसह पाचव्या स्थानी होता.
  • दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील कामगिरीमुळे अश्विनला 50 मानांकन गुणांचा लाभ झाला आहे.

नवे शैक्षणिक धोरण पुढील वर्षी सादर :

  • सर्व राजकीय पक्षांसोबत विचारविनिमयाद्वारे नवे शैक्षणिक धोरण तयार करण्यात येत असून पुढील वर्षी ते सादर केले जाईल, अशी अपेक्षा केंद्र सरकारने व्यक्त केली.

 

सेवा हमी कायद्यांतर्गत 200 सेवा ऑनलाइन करण्यात येतील :

  • सेवा हमी कायद्यांतर्गत येत्या 26 जानेवारीपर्यंत 200 सेवा ऑनलाइन करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
  • येथील हॉटेल ताजमध्ये स्मार्ट हेल्थ, स्मार्ट गव्हर्नन्स, स्मार्ट सिटीसाठी डिजिटल तंत्रज्ञान या विषयावर ई-इंडिया महाराष्ट्र समिट आयोजित करण्यात आली होती. या समिटच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.

 

दिनविशेष :

  • भारत लोकशिक्षण दिनDinvishesh
  • एड्स प्रतिबंधक दिन
  • 1958 : मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
  • 1963 : नागालँड भारताचे 16वे राज्य झाले.
  • 1965 : भारतात सीमा सुरक्षा दल (बॉर्डर सिक्युरीटी फोर्स) ची स्थापना.
  • 1973 : पापुआ न्यू गिनीला ऑस्ट्रेलियापासून स्वातंत्र्य.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.