चालू घडामोडी (1 फेब्रुवारी 2016)
भारतीय महिलांची ‘गिनेस’ नोंद :
- जगभरातील भारतीय महिलांनी 11 हजार 148 चौरस मीटरचे मोठे ब्लॅंकेट बनवून रविवारी (ता. 31) विश्वविक्रम केला.
- गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली आहे, चेन्नई येथे ही घोषणा करण्यात आली.
- जगातील सर्वांत मोठी लोकरीची शाल विणण्याचा विक्रम या महिलांनी मोडला आहे.
- ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, नाशिक, नागपूर, गुरगाव, हैदराबादसह सिंगापूर, ओमान, मस्कत, बहारीन, यूएस, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील भारतीय महिला या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या, ऑगस्ट 2015 पासून हे ब्लॅंकेट विणण्याचे काम सुरू होते.
- यापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील महिलांनी तीन हजार 377 चौरस मीटरची शाल विणून गिनेस बुकमध्ये नोंद केली होती, हा विक्रम मोडत भारतीय महिलांनी 11 हजार 148 चौरस मीटरचे मोठे ब्लॅंकेट विणून विश्वविक्रम केला आहे.
नोव्हाक जोकोवीचला टेनिस स्पर्धेत सहाव्यांदा जेतेपदाचा मान :
- जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला सर्बियाच्या नोव्हाक जोकोवीचने वर्चस्व कायम राखताना क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या ब्रिटनच्या अॅण्डी मरेचा (दि.31) अंतिम लढतीत 6-1, 7-5, 7-6 ने पराभव केला आणि ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत विक्रमी सहाव्यांदा जेतेपदाचा मान मिळवला.
T-20 मध्ये टीम इंडिया नंबर वन :
- तिसऱ्या आणि आखेरच्या (दि.31) T-20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 7 गडी राखून विजय मिळवत ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियातच व्हाईट वॉश देण्याचा पराक्रम भारताने केला.
- आयसीसीने जाहीर केलेल्या T-20 संघाच्या रँकीगमध्ये भारताने प्रथम क्रमांकावर गरुडझेफ घेतली आहे.
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका सुरु होण्यापुर्वी भारत T-20 रँकीकमध्ये कसोटी खेळणाऱ्या देशात सर्वात शेवटच्या 8 व्या स्थानी होता.
- भारताने ऑस्ट्रेलियाला व्हाइट वॉश दिल्यामुळे रेटींग गुणात भारताने नंबर एकवर असलेल्या वेस्ट इंडीजला पच्छाडले आणि क्रमांक एकचे स्थान काबिज केले.
पीक विमा योजनेचा लाभ :
- गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांच्या हिताच्या चर्चा खूप झाल्या, कृती मात्र कमी झाली, या पाश्र्वभूमीवर अलीकडेच केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना अंमलात आणली आहे.
- या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, येत्या दोन वर्षांत देशातील किमान निम्म्या शेतकऱ्यांनी तरी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे, आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमात मोदी यांनी हे आवाहन केले.
- शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना अलीकडेच सुरू करण्यात आली आहे.
- तसेच या योजनेबाबत पंतप्रधान म्हणाले की, नैसर्गिक संकटात सर्वाधिक नुकसान होते ते शेतकऱ्यांचे. त्यांची वर्षभराची मेहनत वाया जाते.
- अशा परिस्थितीत त्यांना आश्वस्त करण्यासाठी, त्यांना सुरक्षेची हमी देण्यासाठी म्हणून पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे.
- अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे या योजनेची अधिकाधिक प्रसिद्धी करण्याची गरज असून त्यासाठी मला शेतकऱ्यांच्या मदतीची गरज आहे.
- या विमा योजनेचा प्रीमियमही खरीप पिकासाठी दोन टक्के तर रब्बी पिकासाठी दीड टक्का एवढा अत्यल्प आहे.
- पिकाची काढणी होऊन 15 दिवसांनी जरी नुकसान झाल्यास ही योजना शेतकऱ्यांसाठी लागू राहणार आहे.
एका मिस कॉलवर ऐकता येणार ‘मन की बात’ :
- देशातील जनतेशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर सुरु केलेला’मन की बात’ हा कार्यक्रम आता मोबाईलवरही ऐकता येणार आहे.
- 8190881908 या क्रमांकावर मिस कॉल देऊन मोबाईलवर कधीही मन की बात ऐकता येईल.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (दि.31) देशातील नागरिकांशी नवीन वर्षातील पहिली मन की बात केली.
- सध्या ही सेवा फक्त हिंदी भाषेपुरतीच मर्यादित असणार आहे. पण लवकरच सर्वांना त्यांच्या मातृभाषांतही ही मन की बात एकता येणार आहे.
- भारताचे स्वातंत्र्य आणि सभ्यता ही खादीत आहे, असे सरदार पटेल यांनी म्हटले होते.
- देशातील तरूणाईला फॅशनच्या युगात खादी आकर्षित करत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात म्हटले.
- पंतप्रधान म्हणाले, भारताचे स्वातंत्र्य आणि सभ्यता हे खादीत आहे, असे सरदार पटेल यांनी म्हटले होते.
- देशातील तरूणाईला फॅशनच्या युगात खादी आकर्षित करत आहे. तसेच, यावेळी त्यांनी देशवासियांना खादीचे कपडे वापरण्याचा सल्ला दिला.
राजस्थानमध्ये ‘जलस्वराज’चा नारा :
- देशातील एकूण जलस्रोतांपैकी अवघे 1.6 टक्के जलस्रोत वाट्याला आलेल्या राजस्थानने आता दुर्मिळ होत असलेल्या नैसर्गिक स्रोतांचे पुनर्भरण करण्यासाठी लोक चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
- ‘मुख्यमंत्री जल स्वावलंबन अभियान’ (एमजेएसए) असे या चळवळीचे नामकरण करण्यात आले असून, मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या हस्ते नुकतेच त्याचे उद्घाटन झाले.
- जमिनीची उत्पादकता वाढवून राज्यातील प्रत्येक खेड्याला पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचे उद्दिष्ट या मोहिमेच्या माध्यमातून समोर ठेवण्यात आले आहे, विविध टप्प्यांमध्ये राज्यातील तीन हजारांपेक्षा अधिक गावे या चळवळीत सामावून घेतली जाणार आहेत.
- विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या झलवार मतदारसंघातून या मोहिमेचा प्रारंभ झाला आहे, या मोहिमेसाठी खासगी व्यक्ती- संस्था, बिगर सरकारी संस्था, कॉर्पोरेट कंपन्यांसह सामाजिक, धार्मिक आणि विविध जातींच्या संस्थांची मदत घेतली जाणार आहे.
- महाराष्ट्राचा घेतला आदर्श
- महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या ‘जलस्वराज अभियाना’च्या धर्तीवर राजस्थानात ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
- महाराष्ट्रातील दुष्काळाचा सामना करणाऱ्या आठ जिल्ह्यांत ‘जलस्वराज अभियान’ राबविण्यात येणार आहे.
- ‘एमजेएसए’साठी राजस्थान सरकार 30 जूनपर्यंत तीन हजार 568 कोटी रुपयांचा निधी उभा करणार आहे.
दिनविशेष :
- 1977 : भारतीय तटरक्षक दलाची स्थापना झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा