अ.क्र | ठळक घडामोडी |
1. | नव्या राष्ट्रीय आरोग्य धोरणाच्या मसुद्याची प्रत प्रदर्शित
|
2. | बँक खात्यात अनुदान
|
3. | केंद्र सरकारची नवी योजना
|
4. | कर्करोगावर रुग्णानुसार वेगळे उपचार
|
5. | न्यायाधीशांच्या नियुक्ती विधेयकावर राष्ट्रपतींची मंजूरी
|
6. | रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांच्या अध्यक्षतेखालील नियुक्त्या |
7. | दिनविशेष |
नव्या राष्ट्रीय आरोग्य धोरणाच्या मसुद्याची प्रत प्रदर्शित :
- नव्या राष्ट्रीय आरोग्य धोरणाच्या मसुद्याची प्रत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने संकेतस्थळावर प्रदर्शित केली आहे.
- या धोरणाबाबत या मंत्रालयाने संबंधितांकडून सुचना, भाष्य आणि दृष्टिकोन मागवले आहे.
बँक खात्यात अनुदान :
- घरगुती गॅस ग्राहकांना 1 जानेवारीपासून त्यांच्या बँक खात्यात सिलिंडरवरील अनुदान जमा होणार आहे.
- त्यातून ग्राहक बाजारभावानुसार सिलेंडर घेवू शकतील.
- बँक खात्यात थेट अनुदान जमा होण्याच्या योजनेचे सदस्य होताच ग्राहकाच्या बँक खात्यात 568 रुपये जमा होतील.
केंद्र सरकारची नवी योजना :
- औपचारिक व अनौपचारिक अशा दोन्ही क्षेत्रांत सर्व प्रकारच्या नोकर्यांमध्ये किमान वेतन 15 हजार रुपये करण्याची केंद्र सरकारची योजना आहे.
- राष्ट्रीय किमान वेतन कायदा 1948 अन्वये किमान 45 आर्थिक कामांसाठी किमान वेतन ठरवून देण्याची तरतूद आहे.
- राज्यांनाही ती लागू आहे पण राज्ये एकूण 16 हजार आर्थिक विभागात किमान वेतन ठरवू शकतात.
- आता सरकारच्या नव्या प्रस्तावानुसार कुठल्याही क्षेत्रात काम करणार्या लोकांचे किमान वेतन 15 हजार रुपये म्हणजे दुपटीहून जास्त होणार आहे.
कर्करोगावर रुग्णानुसार वेगळे उपचार :
- कर्करोगावर रुग्णानुसार वेगळे उपचार करण्याची सोय आता उपलब्ध होणार असून त्यात भारतीय वंशाच्या वैज्ञानिकांचा मोठा सहभाग आहे.
- त्यांनी तरुणांच्या कर्करोग पेशी प्रयोगशाळेत वाढवण्याचा अभिनव मार्ग शोधला असून त्यामुळे उपचार शोधून काढणे सोपे झाले आहे.
- मशिगन विद्यापीठाने हे तंत्र विकसित केले असून पृर्वीच्या पद्धतीपेक्षा तीन पट प्रभावी आहे.
न्यायाधीशांच्या नियुक्ती विधेयकावर राष्ट्रपतींची मंजूरी :
- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी न्यायाधीशांच्या नियुक्ती करण्याच्या पद्धतीत मूलभूत बदल करणारे राष्ट्रीय न्यायिक नियुक्त्या आयोग विधेयकावर स्वाक्षरी केली.
- हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी ऑगस्टमध्येच मंजूर केले होते फक्त राष्ट्रपतींची त्यावर स्वाक्षरी बाकी होती.
- आता 24 उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयांमधील न्यायमूर्तीची नेमणूक राष्ट्रीय न्यायिक नियुक्त आयोगामार्फत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
- यापूर्वीची या नियुक्त्यांसाठी अस्तीत्वात असलेली कॉलेजियम अर्थात निवड मंडळ पद्धत रद्दबातल ठरली आहे.
- या नेमणुका न्यायिक आयोगामार्फत करण्यात याव्यात, अशी तरतूद नव्या कायद्यात करण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांच्या अध्यक्षतेखालील नियुक्त्या :
- बँक ऑफ इंडिया कर्मचारी संचालक पी.कोटीश्र्चरण यांची इंडियन ओव्हरसीस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ म्हणून नियुक्ती झाली आहे.
- पंजाब बँकेचे कर्मचारी संचालक किशोर कुमार सांसी यांची विजया बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ म्हणून नियुक्ती झाली आहे.
- बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी संचालक अनिमेश चौहान यांची ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ म्हणून नियुक्ती झाली आहे.
- बँक ऑफ बडोदाचे कर्मचारी संचालक पी.श्रीनिवास यांची युंनियन बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ म्हणून नियुक्ती झाली आहे.
- वरील सर्व नियुक्ती रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांच्या अध्यक्षतेखालील नियुक्ती मंडळाच्या शिफारशिनुसार झाल्या आहेत.
दिनविशेष :
- ख्रिस्ती नववर्षारंभ 2015 ह्या नवीन ख्रिस्ती सालाची सुरवात.
- 1862 – इंडियन पीनल कोड अमलात आले.
- 1892 – एक गांधीवादी कार्यकर्ता हरिभाई देसाई यांचा जन्म.
- 1923 – चित्तरंजन दास आणि पंडित नेहरू यांनी ‘स्वराज्य पार्टी’ची स्थापना केली.