चालू घडामोडी (1 जानेवारी 2018)
सुपरस्टार रजनीकांत भाजपाला पाठिंबा देणार :
- सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनी वर्षाच्या अखेरच्या दिवशी स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा केली.
- जयललिता यांच्या मृत्यूनंतर रजनीकांतसारख्या सुपरस्टारने राजकारणात प्रवेश कऱणे महत्त्वाचे मानले जात आहे.
- माझा पक्ष तामिळनाडूमधील आगामी विधानसभा निवडणूक लढवेल असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. आपण वेगळा पक्ष स्थापन करत असल्याची घोषणा केली असली तरीही त्यांनी अद्याप आपल्या पक्षाचे नाव मात्र गुलदस्त्यातच ठेवले आहे.
- तामिळनाडूचे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष तमिलिसे सौदरराजन यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी रजनीकांत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पाठींबा देणार असल्याचे म्हटले आहे.
Must Read (नक्की वाचा):
चालू घडामोडी (31 डिसेंबर 2017)
पंतप्रधान नरेंद्र मोदींची नवी घोषणा :
- मुस्लिम महिलांना पुरुष पालकाशिवाय हज यात्रेला जाता येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’ या मासिक कार्यक्रमात केली आहे. हा धागा पकडून लगेच पुढील वर्षी 1300 मुस्लिम महिलांना पुरूष सहकाऱ्याशिवाय हज यात्रेला पाठवण्यात येत आहे, असे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी जाहीर केले.
- त्रिवार तलाक विरोधी विधेयकाच्या मंजुरीनंतर मुस्लिम महिलांच्या जोखडमुक्तीसाठी सरकारने उचललेले हे दुसरे मोठे पाऊल आहे.
- पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या मन की बात कार्यक्रमात सांगितले की, मुस्लिम महिलांना पुरुष सहकारी बरोबर असल्याशिवाय हज यात्रेला जाता येणार नाही हा गेल्या अनेक वर्षांपासून अमलात असलेला निर्णय त्यांच्यावर अन्याय करणारा आहे. आता आमचे सरकार हा र्निबध काढून टाकत आहे. मुस्लिम महिला पुरुषाशिवाय हज यात्रेला जाऊ शकतील. अल्पसंख्याक मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार आता 45 वयाच्या वरील मुस्लिम महिला पुरुष सहकाऱ्याशिवाय हज यात्रेला जाऊ शकतील. फक्त त्यांनी चार-चारच्या गटाने जावे.
संगणक टायपिंग परीक्षा अधिक सोपी होणार :
- महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात येत असलेल्या शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षेत आता ‘डिलीट किंवा बॅकस्पेस’चे बटन दाबल्यानंतर कमी होणाऱ्या गुणांची अट रद्द करण्यात आली आहे. दरम्यान संस्थाचालक व विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून संगणक टायपिंग परीक्षा अधिक सोपी झाल्याने परीक्षेत उत्तीर्णाचे प्रमाण वाढणार आहे.
- शासनाच्या 31 ऑक्टोबर 2013 च्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद, पुणे संलग्न असलेल्या शासन मान्यता प्राप्त वाणिज्य शिक्षण संस्थामध्ये संगणक टंकलेखन अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे.
- सदर अभ्यासक्रमातील विभाग 1 मध्ये वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव) बहुपर्यायी प्रश्नाचा समावेश असून विभाग 2 मध्ये ई-मेल, पत्र, तक्ता आदींचा समावेश आहे. तर विभाग 3 मध्ये सात मिनिटांचा गती उताऱ्याचा समावेश आहे.
अक्कलकोट येथे योग आणि चिकित्सा शिबिर आयोजन :
- विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने अक्कलकोट येत्या 17, 18 आणि 19 मार्च रोजी योग गुरू स्वामी रामदेवबाबा यांचे योग आणि चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे.
- तालुक्याच्या ठिकाणी असे शिबिर पहिल्यांदाच होत आहे. दरवर्षी विवेकानंद प्रतिष्ठान सामुदायिक विवाह सोहळा, रद्दीतून शिक्षण, गणेशोत्सव व्याख्यानमाला यासह अनेक प्रकारचे उपक्रम राबविते.
- गेल्या वर्षी विजयपूरच्या सिद्धेश्वर महाराजांची भव्य प्रवचनमाला प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेण्यात आली. त्याचे उत्कृष्ट नियोजन झाले होते. यावर्षी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर प्रतिष्ठानने तालुक्याला नव्हे तर जिल्हयालाही आरोग्यदायी व चिकित्सा मिळणारी भेट दिली आहे.
आता टेलिग्रामवर मल्टीपल अकाऊंट सुविधा :
- टेलिग्राम मॅसेंजरवर आता कुणीही युजर तीन विविध मोबाईल क्रमांकांचे तीन स्वतंत्र अकाऊंट वापरू शकणार आहे. टेलिग्रामच्या ताज्या अपडेटच्या माध्यमातून ही सुविधा देण्यात आली आहे.
- टेलिग्राम मॅसेंजरची 4.7 ही नवीन आवृत्ती अपडेटच्या स्वरूपात सादर करण्यात आली आहे. एका महिन्यातच या मॅसेंजरने दोन अपडेट सादर केल्याची बाब लक्षणीय आहे.
- तसेच यात अनेक नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यातील सर्वात लक्षवेधी फिचर म्हणजे मल्टीपल अकाऊंट होय.
- सध्या पॅरलल स्पेससारख्या अन्य थर्ड पार्टी अॅप्लीकेशन्सच्या मदतीने एका स्मार्टफोनवर टेलिग्रामचे दोन अकाऊंट वापरणे शक्य आहे. आता मात्र कोणत्याही बाह्य अॅपच्या मदतीविना ही सुविधा मिळणार आहे.
- ताज्या अपडेटमध्ये मल्टीपल अकाऊंटची सुविधा दिलेली आहे. याच्या मदतीने एकाच स्मार्टफोनवर तीन विविध मोबाईल क्रमांकाने टेलिग्राम अकाऊंट वापरता येतील. या तिन्ही खात्यांचे नोटिफिकेशन्स त्या युजरला मिळतील. या नोटिफिकेशन्सला कस्टमाईज करण्याची सुविधाही असेल. तर साईडबारवर स्वाईप करून कुणीही आपल्याला हव्या त्या अकाऊंटचा वापर करू शकेल.
‘बीएसएनएल’ने लॉन्च केला 499 रुपयांत मोबाइल :
- मोबाइलचे उत्पादन करणारी भारतीय कंपनी डीटेल (Detel) सोबत मिळून BSNL ने एक मोबाइल लॉन्च केला आहे. या मोबाइलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची किंमत आहे. या मोबाइलची किंमत फक्त 499 रुपये इतकी आहे.
- Detel D1 हा सर्वात स्वस्त फिचर मोबाइल असल्याचा दावा कंपनी करत आहे. या मोबाइलमध्ये BSNL कनेक्शन असणार आहे.
- पहिल्या रिचार्जची वैधता 365 दिवसांसाठी असणार आहे. मोबाइल फोनमध्ये एका वर्षापर्यंत इनकमिंग आणि आऊटगोईंग कॉलची सुविधा देण्यात येत आहे. याशिवाय 103 रुपयांचा टॉकटाइमही दिला जात आहे. बीएसएनएल टू बीएसएनएल कॉलसाठी प्रती मिनिट 0.15 पैसे आणि इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 0.40 पैसे प्रती मिनिट आकारण्यात येणार आहे.
दिनविशेष :
- सन 1862 मध्ये 1 जानेवारी रोजी ‘इंडियन पिनल कोड’ अस्तीत्वात आले.
- पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना 1 जानेवारी 1883 रोजी झाली.
- स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सन 1900 मध्ये 1 जानेवारी रोजी मित्रमेळ्याची स्थापना केली.
- 1 जानेवारी 1919 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.
- चित्तरंजन दास आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1 जानेवारी 1923 रोजी स्वराज्य पार्टीची स्थापना केली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन वर्ष 2018 च्या हार्दिक शुभेच्छा
आजच्या चालू घडामोडींचा व्हिडिओ
{source}
<iframe width=”350″ height=”250″ src=”https://www.youtube.com/embed/hSzXrH9-guY?autoplay=1″ frameborder=”0″ gesture=”media” allow=”encrypted-media” allowfullscreen></iframe>
{/source}