चालू घडामोडी (1 जुलै 2016)
सौरऊर्जा प्रकल्पांना जागतिक बॅंकेचे पाठबळ :
- सौरऊर्जेच्या वापरासाठी भारताने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करत जागतिक बॅंकेने (दि.30 जून) या क्षेत्राच्या विकासासाठी एक अब्ज डॉलरची मदत जाहीर केली.
- तसेच, भारताच्या नेतृत्वाखाली 121 देशांच्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीबरोबरही (आयएसए) बॅंकेने करार करत जागतिक स्तरावर सौरऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी सहकार्य करण्याचे मान्य केले.
- यानुसार, 2030 पर्यंत सौर क्षेत्रात एक हजार अब्ज डॉलरची गुंतवणूक निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
- जागतिक बॅंकेचे अध्यक्ष जिम योंग किम हे भारतात आले असून, त्यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी झाली.
- तसेच या करारामुळे जागतिक बॅंक ही ‘आयएसए’ची आर्थिक भागीदार बनली आहे.
- सौरऊर्जेचा वापर वाढविणे, हे केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट असून, त्याला पाठबळ म्हणून सौरनिर्मिती प्रकल्पांमध्ये एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचेही जागतिक बॅंकेने या वेळी जाहीर केले.
भारतवंशीय राजेश अग्रवाल लंडनचे उपमहापौर :
- भारतात जन्मलेले आणि कष्टांनी लक्षाधीश बनलेले राजेश अग्रवाल (वय 39) लंडनचे उपमहापौर झाले आहेत.
- तसेच सादिक खान हे तेथील महापौर आहेत.
- लंडन शहराचा बुद्धिमत्तेकडे आणि साहसी उपक्रमांकडे बघण्याचा खुलेपणा सार्वमतामुळे बदलून जायला नको, असे अग्रवाल म्हणाले.
- भारतात सामान्य वातावरणात वाढलेले राजेश अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या रॅशनलएफएक्स या विदेशी चलन व्यवहारांतील प्रचंड मोठ्या कंपनीची गेल्या वर्षीची वार्षिक उलाढाल 1.3 अब्ज पौंडांची होती.
ज्येष्ठ लेखक रा.चिं. ढेरे यांचे निधन :
- मराठीतील ज्येष्ठ लेखक, संशोधक रामचंद्र चिंतामण ढेरे यांचे (दि.1) त्यांच्या निवासस्थानी निधन झाले.
- ढेरे यांचा दैवतशास्त्र, सांस्कृतिक इतिहास या विषयात विशेष अभ्यास होता. त्यांनी या विषयावर विपुल लेखनही केले आहे.
- साहित्याच्या प्रेमापोटी त्यांनी त्यांनी स्वत:कडील पुस्तकांचा संग्रह एखाद्या संशोधन संस्थेप्रमाणे ट्रस्टच्या माध्यमातून समाजासाठी खुला केला.
- तसेच त्यांच्या संग्रहामध्ये इतिहास, संत साहित्य, जुने मराठी वाङमय, लोकसाहित्य, लोकसंस्कृती अशा वेगवेगळ्या विषयांवरील साहित्य आहे.
- मराठी संस्कृतीचा अभ्यास व संशोधन करणाऱ्या तरुण संशोधकांसाठी हा संग्रह उपयुक्त असा आहे.
- रा.चिं. ढरे यांना मिळालेले पुरस्कार –
- साहित्य अकादमी पुरस्कार1987 – ‘श्रीविठ्ठल:एक महासमन्वय’महाराष्ट्र साहित्य परिषदेचा गं.ना. जोगळेकरपुरस्कार(2013)
- त्रिदल फाउंडेशनचा पुण्यभूषण पुरस्कार (14 मार्च 2010)
- पुणे महानगरपालिकेचा महर्षीवाल्मीकी पुरस्कार (2013)
- अखिल भारतीय यादव महासंघाचा विशेष पुरस्कार (29-3-2015)
काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी मेहबूबा मुफ्ती :
- अनंतनाग मतदारसंघातून राज्य विधानसभेवर निवडून गेलेल्या जम्मू – काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी (दि.30 जून) सदस्यत्वाची शपथ घेतली.
- तसेच येथील राज्य सचिवालयात विधानसभा अध्यक्ष कविंदर गुप्ता यांच्या कक्षात त्यांना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली.
- अनंतनाग जिल्ह्यातून विधानसभेवर जाण्याची त्यांची ही चौथी वेळ आहे.
नव्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र बराक 8 ची यशस्वी चाचणी :
- जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या नव्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र बराक 8 ची चाचणी घेण्यात आली आहे.
- (दि. 30 जून) सकाळी ओडिशाच्या किनारपट्टीवरील संरक्षण तळावरून ही चाचणी घेण्यात आली.
- सुरक्षेसाठी चाचणीच्या आधी ओडिशाच्या चंडीपूर रेंजजवळील 7 गावांमधील 3600 लोकांना इतरत्र हलविण्यात आले आहे.
- नव्याने विकसित केलेल्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची (एमआरएसएएम) ओडिशातील तटरक्षक तळावर यशस्वी चाचणी घेण्यात आली.
- बॅलेस्टिक क्षेपणास्त्र बराक – ची क्षमता किलो मीटरपर्यंत मारा करण्याची आहे. याची लांबी चार मीटर असून यावर किलोग्रॅम वजन लोड केले जाऊ शकते.
- तसेच या क्षेपणास्त्रात ‘मल्टिफंक्शनल सर्व्हेलिअंस’ ही प्रणाली असून हे क्षेपणास्त्र रडारच्या कक्षेत येत नाही. याची अंतिम चाचणी भारताचे सुरक्षा अधिकारी, डीआरडीओ आणि इस्त्राईलच्या उद्योजकांसोबत घेण्यात आली.
दिनविशेष :
- महाराष्ट्र कृषी दिन.
- घाना प्रजासत्ताक दिन.
- 1913 : वसंतराव नाईक, हरितक्रांतीचे आणि रोजगार हमी योजनेचे जनक यांचा जन्म.
- 1955 : पूर्वीच्या इंपीरिअयल बॅंकेची आता स्टेट बॅंक ऑफ इंडिया नावाने स्थापना झाली.
- 1961 : कल्पना चावला, अंतराळवीर यांचा जन्म.
- 1961 : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची स्थापना.
- 2006 : चीन मध्ये किंगहाइ-तिबेट रेल्वेचे उद्घाटन.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा