काळा पैसा धारक पाच भारतीयांची नावे उघड :
- स्वित्झर्लंडने त्यांच्या अधिकृत राजपत्राद्वारे काळा पैसा जमा करणाऱ्या परदेशी व्यक्तींची नावे जाहीर केली आहेत.
-
- भारतीय अधिकाऱ्यांनी मागितलेल्या माहितीच्या आधारावर स्वित्झर्लंडने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात उद्योगपती यश बिर्ला यांच्यासह स्नेहलता सोहनी, संगीता सोहनी, गुरजितसिंह कोचर आणि रितीका शर्मा या पाच भारतीयांची नावे जाहीर झाली आहेत.
- ही यादी संबंधित व्यक्तींच्या देशांना अधिक तपासासाठी पुरविली जाणार आहे.
- या पाच जणांपैकी बिर्ला आणि शर्मा यांच्याबाबत काही माहिती याआधीच स्वित्झर्लंडच्या कर प्रशासन विभागाने भारताला पुरविली आहे.
- गुरजितसिंह कोचर आणि रितीका शर्मा हे दोघेही सिटी लिमोझीन गैरव्यवहाराशी संबंधित आहेत.
- आयकरासंबंधीच्या परस्पर सहकार्यांतर्गत भारतीय प्रशासनाला सविस्तर माहिती देण्यासंदर्भात आक्षेप असल्यास फेडरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कोर्टासमोर 30 दिवसांत अपील करावे, असे स्विस फेडरल टॅक्स ऍडमिनिस्ट्रेशनने या भारतीयांना सांगितले आहे.
- काळा पैसाधारकांची नावे उघड करताना या सर्वांची नावे आणि जन्म तारखांव्यतिरिक्त अन्य कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
निकोटीनवर चंडीगड शहरात बंदी :
- चंडीगडमध्ये निकोटीनवर संपूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
- अलीकडेच निकोटीनवर बंदी असलेले पंजाब हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने याबाबत काल निर्देश दिल्यानंतर चंडीगड प्रशासनाने ही बंदी घातली आहे.
- ‘बर्निंग ब्रेन’ या सोसायटीने दाखल केलेली जनहित याचिका निकालात काढताना न्यायालयाने बंदीचे निर्देश दिले आहेत.
- हुक्का पार्लरमध्ये निकोटीनचा गैरवापर करण्यात येत असल्याच्या प्रकरणी न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी चंडीगड प्रशासनाला आढावा घेण्याचे निर्देश दिले होते.
- विषाचा कायदा 1919 आणि विष (ताबा आणि विक्री) नियम 2015 अन्वये ही बंदी घालण्यात आली आहे.
- द्रवरूपातील निकोटीनच्या वापराचा आढावा घेण्यासाठी न्यायालयाने चंडीगड प्रशासनाला कृती समिती स्थापन करण्याचे निर्देशही दिले आहेत.
‘रेड बॉक्स’ वॉर्निंग तीन राज्यांमध्ये :
- देशातील उष्णतेच्या लाटेची तीव्रता वाढल्याने याचा जबरदस्त फटका दक्षिण भारताला बसला आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगण या दोन राज्यांमध्ये उष्माघातामुळे साडेसातशेपेक्षाही अधिक लोक मरण पावले आहेत.
- पुढील आठवडाभर ही उष्णतेची लाट कायम राहणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हवामान खात्याने ओडिशा, झारखंड, किनारी आंध्रसाठी ‘रेड बॉक्स’ वॉर्निंग जारी केली आहे.
- सर्वसाधारणपणे वातावरणातील उष्णता वाढल्याने जेव्हा उष्माघाताचा धोका बळावतो तेव्हा ‘रेड बॉक्स’ वॉर्निंग जारी करण्यात येते.
- आंध्र प्रदेशातील तापमानाने 45 अंश सेल्सिअसची पातळी ओलांडल्याने ‘रेड बॉक्स’ वॉर्निंग जारी करण्यात आल्याचे समजते.
- आतापर्यंत उष्माघातामुळे आंध्र प्रदेशात 551 आणि तेलंगणमध्ये 213 मृत्यू झाले आहेत.
- रामागुंडम शहरामध्ये 44.8 अंश सेल्सिअस एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली.
- ओडिशामध्येही उष्णतेची लाट आली असून भुवनेश्वरमध्ये 45.4 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे.
- राज्याची औद्योगिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंगूल शहरामध्ये 47 अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदविले गेले.
सीएट क्रिकेट पुरस्कार 2015 वितरण :
- 19 व्या सीएट क्रिकेट पुरस्कारांचे नुकतेच वितरण करण्यात आले असून भारताच्या फलंदाज अजिंक्य रहाणेची सर्वोत्कृष्ट भारतीय क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात आले तर श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकाराची सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली आहे.
- श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यात 264 धावांची विक्रमी खेळी करणारा भारताचा सलामीवीर रोहित शर्माला या विक्रमाबद्दल विशेष पुरस्कार देण्यात आला.
- भारताचे माजी कसोटीपटू आणि कर्णधार कपिलदेव यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
- सीएट पुरस्कार विजेते :
- सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू : कुमार संगकारा’
- विशेष पुरस्कार : रोहित शर्मा
- उत्कृष्ट फलंदाज : हाशीम आमला
- उत्कृष्ट गोलंदाज : रंगना हेराथ
- उत्कृष्ट टी-20 क्रिकेटपटू : ड्वेन ब्राव्हो
- लोकप्रिय क्रिकेटपटू : किरॉन पोलार्ड
- सर्वोत्कृष्ट भारतीय क्रिकेटपटू : अजिंक्य रहाणे
- सर्वोत्कृष्ट स्थानिक क्रिकेटपटू : विनय कुमार
- उत्कृष्ट युवा क्रिकेटपटू : दीपक हुडा
‘मसान’ चित्रपटास कान महोत्सवात पुरस्कार :
- नीरज घायवन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मसान’ या पहिल्याच चित्रपटाला 68व्या कान चित्रपट महोत्सवात दोन पुरस्कार मिळाले आहेत.
त्यात ‘इंटरनॅशनल ज्युरी ऑफ फिल्म क्रीटिक्स’ पुरस्कार व ‘प्रॉमिसिंग फ्युचर’ पुरस्कार या दोन पुरस्कारांचा समावेश आहे.
- तसेच फ्रेंच चित्रपट ‘धीपन’ला पाल्मे डी ऑर पुरस्कार देण्यात आला. हा चित्रपट जॅक्स ऑडीऑर्ड यांनी दिग्दर्शित केला आहे.
आपल्या युद्धग्रस्त देशातून फ्रांसमध्ये पलायन करण्यासाठी निघालेल्या तीन तामिळ निर्वासितांबद्दल हा चित्रपट आहे.
मनोज ‘नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त :
- मनोज मिश्रा यांची ‘नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड’चे (एनएफएल) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते माजी अध्यक्ष नीरू अबरोल यांची जागा घेतील.
- एनएफएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त होण्यापूर्वी मनोज मिश्रा राज्य वाणिज्य निगमचे (स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन, एसटीसी) वित्त संचालक म्हणून कार्यरत होते.
- या मिनिरत्न कंपनीची स्थापना 23 ऑगस्ट 1974 रोजी झाली. तिचे नोंदणीकृत कार्यालय नवी दिल्ली इथे असून कॉर्पोरेट कार्यालय नोएडा (उत्तर प्रदेश) येथे आहे. एनएफएल भारत सरकारच्या केमिकल अँड फर्टिलायझर्स मंत्रालयाच्या अंतर्गत आहे.
निर्भय शर्मा यांची मिझोरामचे 18वे राज्यपाल म्हणून शपथ’ :
- सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल निर्भय शर्मा यांनी 26 मे रोजी मिझोरामचे 18वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली.
- त्यांना गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश टी वाईफेई यांनी संविधानाच्या 159व्या कलमानुसार पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
- यापूर्वी पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांच्यावर मिझोरामच्या राज्यपाल पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती.
- निर्भय शर्मा यांनी याआधी अरुणाचल प्रदेशचे राज्यपालपद भूषविले आहे.
दिनविशेष :
- 1872 – ‘चाफा बोलेना’ या कवितेमुळे लोकप्रिय झालेले कवी ‘बी’ यांचे मूळ नाव नारायण मुरलीधर गुप्ते.
- 1945 – टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना.
- 1998 – कादंबरीकार गोपाल नीळकंठ तथा गो.नी.दांडेकर यांचे निधन.