कोयना नदीच्या वीजनिर्मितीवर मर्यादा :
- कोयना धरणातील वीजनिर्मितीसाठी आरक्षित केलेला पाणीसाठा संपल्यामुळे कोयना प्रकल्पाच्या वीजनिर्मितीवर मर्यादा आली आहे.
- राज्यात उष्णतेची लाट पसरलेली असताना कोयनेच्या वीजनिर्मितीवर मर्यादा आल्यामुळे विजेच्या नियोजनाचे मोठे संकट वीजनिर्मिती कंपनीसमोर आहे.
- 1 जूनपासून पाणी वापराचे तांत्रिक वर्ष नव्याने सुरू होणार आहे. त्यानंतर कोयनेची वीजनिर्मिती सुरळीत सुरू होण्याची शक्यता आहे.
- कोयना धरणात पाणी साठविण्याची क्षमता 105.25 टीएमसी आहे. धरणातील पाण्याचे वाटप कृष्णा पाणी वाटप लवादाच्या निर्देशाप्रमाणे केले जाते. पश्चिमेकडील टप्पा 1 ते 4 मधून वीजनिर्मितीसाठी 67.50 टीएमसी पाणीसाठा आरक्षित आहे. 31 मेपर्यंत महानिर्मिती कंपनीकडून या पाण्याचे नियोजन केले जाते.
देशाकडून पाक सीमेजवळ 1400 बंकर उभारले जाणार :
- पाकिस्तान सीमेनजीकच्या गावांमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षितेसाठी 1400 नवे बंकर बांधले जात असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिली.
- पाकिस्तानच्या सीमेनजीक राहणारे लोक हे सामान्य नसून धोरणात्मक दृष्टीने त्यांचे मोठे महत्त्व आहे, त्यामुळे त्यांची सुरक्षितता हे सरकारचे कर्तव्य असल्याचे राजनाथसिंह यांनी म्हटले आहे.
- तसेच काश्मिरी पंडितांचेही पुनर्वसन करण्यास केंद्र सरकार कटिबद्ध होत आहे.
राज्यात शेततळे खोदाईत पुरंदर तालुका अव्वलस्थानी :
- राज्य सरकारच्या कृषी विभागाने राबविलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत पुरंदर तालुका पुणे जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.
- जिल्ह्यात 2 हजार 500 शेततळी खोदण्याचे उद्दिष्ट होते, त्यापैकी 1 हजार 989 शेततळी पूर्ण झाली आहेत. त्यात पुरंदर तालुक्यातील 567 शेततळ्यांचा समावेश आहे. उर्वरित 12 तालुक्यांत मिळून 1 हजार 422 तळी पूर्ण झाली आहेत.
- तसेच ही योजना सुरू झालेल्या दोन वर्षांत पुरंदर तालुक्यातील 567 शेततळ्यासाठी सर्वाधिक 2 कोटी 44 लाख 2 हजार रुपये खर्च झाले आहेत. पुरंदरनंतर इंदापुरात 452, बारामतीत 305, शिरूरमध्ये 207 शेततळी पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यात 2 हजार 500 शेततळी खोदण्याचे उद्दिष्ट होते, त्यातील 68 शेततळ्यांची कामे अजून सुरू आहेत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले आहे.
राळेगणसिद्धी येथे सौरऊर्जा प्रकल्प लवकरच कार्यान्वित :
- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून राळेगणसिद्धी येथे सरकारी जमीनीवर लवकरच सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होत आहे. हा प्रकल्प येत्या एक महिन्यात कार्यान्वीत होणार आहे. तो सुरू झाल्यावर येथील शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीजपुरवठा व तोही पूर्ण दाबाने मिळणार आहे.
- जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील हा पहिलाच मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प ठरणार आहे. राळेगणसिद्धी येथे या मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपुजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते.
- येथील सरकारी गायरान जमीनीवर हा प्रकल्प उभारण्याचे काम सध्या प्रगती पथावर आहे. सुमारे एक महिन्यात हा प्रकल्प ऊभा कार्यान्वीत होईल अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पाचे काम मुंबई येथील वारी एनर्जी ही कंपणी करत आहे. बांधा वापार आणि हस्तांतरीत करा या तत्वावर हे काम होत आहे. या प्रकल्प उभारणीचा सर्व खर्च कंपनीच स्वतः करणार आहे. त्या नंतर येथे तयार होणारी वीज सरकारला म्हणजेच वीजवितरण कंपणीला विकत देणार आहे. व त्यातून आपला खर्च ती वसुल कराणार आहे.
- येथे तयार होणारी वीज येथेच वापरली जाणार असल्याने मोठ्या प्रमाणात वीजगळती थांबणार आहे. त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान थांबणार आहे. शिवाय येथील शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी ही वीज सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळात 12 तास उपलब्ध होणार आहे. त्या मुळे शेतकऱ्यांना रात्री आंधारात किंवा थंडी-वाऱ्यात शेतात पिकास पाणी देण्यास जावे लागणार नाही. शेतकऱ्यांचे वन्यप्राणी व किटकांपासूनही संरक्षण होणार आहे.
वैशाली पवार ठरल्या ‘मिसेस इंडिया 2018’च्या मानकरी :
- लाखो चाहत्यांच्या शुभेच्छा आणि ‘लाईक्स‘ मिळवून ‘मिसेस इंडिया वर्ल्ड 2018‘ सौंदर्य स्पर्धेत उतरलेल्या सांगलीकर वैशाली पवारने ती आली…तिने पाहिले…आणि जिंकले असाच माहोल दिल्लीतील ‘ग्लॅमरस‘ दुनियेत निर्माण केला.
- सौंदर्य आणि बुद्धिमतेच्या कसोटीवर तिने स्वत:ला सिद्ध करत ‘मिसेस इंडिया‘ च्या मुकुटावर स्वत:चे नाव कोरले. यंदाच्या स्पर्धेत प्रथमच वैशिष्ट्यपूर्ण भारतीय पोशाखात वैशालीचा मुकुट प्रदान सोहळा रंगला. ‘मिसेस वर्ल्ड’ साठी आता तिची निवड झाली आहे.
- मूळची सांगलीकर आणि कर्नाटकची सून झालेल्या वैशालीची नुकतीच नवी दिल्लीतील ‘मिसेस इंडिया‘ स्पर्धेसाठी निवड झाली होती. निवडीनंतर वैशालीवर लाखो चाहत्यांनी सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव केला होता. सौंदर्य स्पर्धेचा मुकुट पटकावणारच असा प्रचंड आत्मविश्वास घेऊन ती स्पर्धेत उतरली. ‘मिसेस कर्नाटक रॉयल क्वीन‘ स्पर्धेतील विजेतेपदाचा अनुभव वैशालींच्या पाठीशी होता.
दिनविशेष :
- पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) सत्येंद्रनाथ टागोर यांचा जन्म 1 जून 1842 रोजी झाला.
- फिंगरप्रिंटिंगचे जनक हेन्री फॉल्स यांचा जन्म 1 जून 1843 मध्ये झाला.
- विष्णुपंत गोविंद दामले, शेख फत्तेलाल, व्ही. शांताराम व केशवराव धायबर यांनी प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे 1 जून 1929 मध्ये स्थापना केली.
- मुंबई व पुणे दरम्यान दख्खनची राणी (Deccan Queen) ही रेल्वेगाडी 1 जून 1930 रोजी सुरू झाली.
- 1 जून 1945 रोजी टाटा मूलभूत संशोधन संस्थेची (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च) स्थापना झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा