Current Affairs of 1 October 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (1 ऑक्टोबर 2016)
स्वच्छतेसाठी सिंधुदुर्गला राष्ट्रीय पुरस्कार :
- स्वच्छता मोहिमेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल पुणे महापालिका आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याने राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार पटकावले आहेत.
- दिल्लीत झालेल्या इंडोसॅन (इंडिया सॅनिटेशन कॉन्फरन्स) या स्वच्छता परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
- विज्ञान भवनात झालेल्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री तसेच उपस्थित सर्व मुख्यमंत्र्यांनी स्वच्छ भारतासाठी कटिबद्धता दर्शविणाऱ्या जाहीरनाम्यावर सह्या केल्या.
- ‘इंडोसॅन’मध्ये ग्रामीण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि महापालिकांच्या आयुक्तांनीही अन्य एका जाहीरनाम्यावर सह्या केल्या.
- या वेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता पाळण्याचे आवाहन केले.
- तसेच राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी ‘स्वच्छता समाचार’ सारखी स्वच्छतेवर चर्चा घडवून आणणारे उपक्रम सुरू करावेत, राज्यांनी यावर स्पर्धा घ्याव्यात, रोजगारनिर्मितीच्या संधी शोधाव्यात, असा सल्लाही दिला.
- घनकचरा व्यवस्थापनात देशभरात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल पुणे महापालिका आणि स्वच्छ सहकार समाज यांना गौरविण्यात आले.
Must Read (नक्की वाचा):
भारतीय युवा हॉकी संघ ‘आशिया चॅम्पियन’ :
- भारतीय तरुण खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करीत यजमान बांगलादेशला रोमहर्षक सामन्यात पराभूत करीत 18 वर्षांखालील आशिया चषक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.
- भारताने आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 3-1 असे पराभूत करीत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.
- भारताने अंतिम सामन्यात बांगलादेशला 5-4 असे पराभूत करीत विजेतेपदाबरोबर साखळी सामन्यात झालेल्या पराभवाचाही हिशेब चुकता केला.
- तसेच भारताने दुसऱ्यांदा या स्पर्धेचे जेतेपद पटकाविले आहे. यापूर्वी 2001 मध्ये भारताने विजेतेपद पटकाविले होते.
- मौलाना बशानी नॅशनल हॉकी स्टेडियमवर भारत व बांगलादेश दरम्यान अंतिम सामना पार पडला.
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत विघ्नेशला कांस्यपदक :
- मुंबई (दि.30 ऑक्टोबर) येथे नुकत्याच पार पडलेल्या पोलंड येथील आंतरराष्ट्रीय सिरीझ अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे शहरातील विघ्नेश देवळेकरने कांस्यपदक जिंकले.
- स्पर्धेत पुरुष दुहेरीत दिल्लीच्या रोहन कपूरसह खेळताना विघ्नेशने डेन्मार्कच्या मानांकित क्रितोफर क्नुडसेन-टॅबिस सुडेर जोडीचा 2-0 असा पराभव केला.
- ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेत विघ्नेशने बॅडमिंटनचे सराव केले आहे.
- एकेरीत उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर दुहेरीत रोहनच्या साथीने त्याने खेळास सुरुवात केली.
- पोलंड स्पर्धेत विघ्नेश-रोहन जोडीने शानदार खेळाचे प्रदर्शन करत पहिल्या सेटमध्ये 21-12 असा विजय मिळवत सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली.
- दुसऱ्या सेटमध्ये क्रितोफर-टॅबिस जोडीने योग्य समन्वय दाखवत काहीअंशी प्रतिकार केला.
- मात्र विघ्नेश-रोहन जोडीने आक्रमक स्मॅशच्या मदतीने त्यांचा प्रतिकार 21-16 असा मोडीत काढत सामन्यात 2-0 अशा फरकाने विजय मिळवला व कांस्यपदकावर नाव कोरले.
भारताकडून 25 देशांना कारवाईची माहिती :
- भारतीय लष्कराने पाक व्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात केलेल्या लष्करी कारवाईची माहिती सरकारने अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्ससह महत्त्वाच्या 25 देशांच्या राजदूतांना दिली.
- कोणत्या परिस्थितीत ही कारवाई करण्यात आली, याबाबत परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी ‘साउथ ब्लॉक’ मध्ये राजदूतांना ही माहिती दिली.
- तसेच या वेळी जयशंकर म्हणाले, ‘लष्कराची आजची कारवाई म्हणजे दहशतवाद विरोधी कारवाईचे उत्तम उदाहरण आहे’.
- जम्मू-काश्मीरसह, भारतीय शहरांवर हल्ला करण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आलेल्या दहशतवाद्यांवर ही कारवाई करण्यात आली. आणखी कारवाई करण्याची भारताची कोणतीही योजना नाही. मात्र लष्कर दहशतवाद्यांना आणखी हल्ले करू देणार नाही.
- विशेष म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुसान राईस यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी चर्चा केली.
- ‘लष्करे तैयबा’ आणि ‘जैश ए महंमद’ या संघटनेच्या दहशतवाद्यांवर पाकिस्तानने कारवाई करावी, असे अमेरिकेचे मत असल्याचे राईस यांनी या वेळी सांगितले.
भारत अमेरिकामध्ये युद्ध अभ्यास:
- भारतीय लष्कर आणि अमेरिकेचे सैन्य यांचा उत्तराखंडातील चौबतियाच्या जंगलातील दोन आठवड्यांचा सामूहिक युद्ध सराव यशस्वीपणे पार पडला.
- ‘युद्ध अभ्यास 2016’ या उपक्रमाअंतर्गत हा सराव झाला.
- युद्धाच्या दरम्यान एकमेकांच्या सहकार्याने शत्रूविरुद्ध कोणचे डावपेच आखायचे आणि त्याची अंमलबजावणी कशी करायची, याबाबत अभ्यास करण्यात आला.
- तसेच या युद्ध सरावात भारतीय लष्कराच्या पायदळाचे 225 जवान आणि अमेरिकी सैन्याचे 20 इन्फन्ट्री रेजिमेंटचे 225 सैनिक सहभागी झाले होते.
- अमेरिकी सैन्याच्या पॅसिफिक भागीदारी कार्यक्रमाअंतर्गत गेल्या 2004 पासून सुरू झालेला दोन्ही देशांचा युद्ध अभ्यास मालिकेतील हा बारावा सराव होता.
- या सरावांमुळे दहशतवाद्यांना प्रमुख्याने डोंगरी भागात तोंड देण्यासाठी उपाययोजना करणे आणि प्रत्युत्तर देण्याबाबत सैन्यात प्रगती झाली आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा