Current Affairs of 1 October 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (1 ऑक्टोबर 2016)

स्वच्छतेसाठी सिंधुदुर्गला राष्ट्रीय पुरस्कार :

  • स्वच्छता मोहिमेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल पुणे महापालिका आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याने राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार पटकावले आहेत.
  • दिल्लीत झालेल्या इंडोसॅन (इंडिया सॅनिटेशन कॉन्फरन्स) या स्वच्छता परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
  • विज्ञान भवनात झालेल्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री तसेच उपस्थित सर्व मुख्यमंत्र्यांनी स्वच्छ भारतासाठी कटिबद्धता दर्शविणाऱ्या जाहीरनाम्यावर सह्या केल्या.
  • ‘इंडोसॅन’मध्ये ग्रामीण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि महापालिकांच्या आयुक्तांनीही अन्य एका जाहीरनाम्यावर सह्या केल्या.
  • या वेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता पाळण्याचे आवाहन केले.
  • तसेच राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी ‘स्वच्छता समाचार’ सारखी स्वच्छतेवर चर्चा घडवून आणणारे उपक्रम सुरू करावेत, राज्यांनी यावर स्पर्धा घ्याव्यात, रोजगारनिर्मितीच्या संधी शोधाव्यात, असा सल्लाही दिला.
  • घनकचरा व्यवस्थापनात देशभरात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल पुणे महापालिका आणि स्वच्छ सहकार समाज यांना गौरविण्यात आले.

भारतीय युवा हॉकी संघ ‘आशिया चॅम्पियन’ :

  • भारतीय तरुण खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करीत यजमान बांगलादेशला रोमहर्षक सामन्यात पराभूत करीत 18 वर्षांखालील आशिया चषक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.
  • भारताने आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 3-1 असे पराभूत करीत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.
  • भारताने अंतिम सामन्यात बांगलादेशला 5-4 असे पराभूत करीत विजेतेपदाबरोबर साखळी सामन्यात झालेल्या पराभवाचाही हिशेब चुकता केला.
  • तसेच भारताने दुसऱ्यांदा या स्पर्धेचे जेतेपद पटकाविले आहे. यापूर्वी 2001 मध्ये भारताने विजेतेपद पटकाविले होते.
  • मौलाना बशानी नॅशनल हॉकी स्टेडियमवर भारत व बांगलादेश दरम्यान अंतिम सामना पार पडला.

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत विघ्नेशला कांस्यपदक :

  • मुंबई (दि.30 ऑक्टोबर) येथे नुकत्याच पार पडलेल्या पोलंड येथील आंतरराष्ट्रीय सिरीझ अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे शहरातील विघ्नेश देवळेकरने कांस्यपदक जिंकले.
  • स्पर्धेत पुरुष दुहेरीत दिल्लीच्या रोहन कपूरसह खेळताना विघ्नेशने डेन्मार्कच्या मानांकित क्रितोफर क्नुडसेन-टॅबिस सुडेर जोडीचा 2-0 असा पराभव केला.
  • ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेत विघ्नेशने बॅडमिंटनचे सराव केले आहे.
  • एकेरीत उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर दुहेरीत रोहनच्या साथीने त्याने खेळास सुरुवात केली.
  • पोलंड स्पर्धेत विघ्नेश-रोहन जोडीने शानदार खेळाचे प्रदर्शन करत पहिल्या सेटमध्ये 21-12 असा विजय मिळवत सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली.
  • दुसऱ्या सेटमध्ये क्रितोफर-टॅबिस जोडीने योग्य समन्वय दाखवत काहीअंशी प्रतिकार केला.
  • मात्र विघ्नेश-रोहन जोडीने आक्रमक स्मॅशच्या मदतीने त्यांचा प्रतिकार 21-16 असा मोडीत काढत सामन्यात 2-0 अशा फरकाने विजय मिळवला व कांस्यपदकावर नाव कोरले.

भारताकडून 25 देशांना कारवाईची माहिती :

  • भारतीय लष्कराने पाक व्याप्त काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात केलेल्या लष्करी कारवाईची माहिती सरकारने अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्ससह महत्त्वाच्या 25 देशांच्या राजदूतांना दिली.
  • कोणत्या परिस्थितीत ही कारवाई करण्यात आली, याबाबत परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी ‘साउथ ब्लॉक’ मध्ये राजदूतांना ही माहिती दिली.
  • तसेच या वेळी जयशंकर म्हणाले, ‘लष्कराची आजची कारवाई म्हणजे दहशतवाद विरोधी कारवाईचे उत्तम उदाहरण आहे’.
  • जम्मू-काश्‍मीरसह, भारतीय शहरांवर हल्ला करण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आलेल्या दहशतवाद्यांवर ही कारवाई करण्यात आली. आणखी कारवाई करण्याची भारताची कोणतीही योजना नाही. मात्र लष्कर दहशतवाद्यांना आणखी हल्ले करू देणार नाही.
  • विशेष म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुसान राईस यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी चर्चा केली.
  • लष्करे तैयबा’ आणि ‘जैश ए महंमद’ या संघटनेच्या दहशतवाद्यांवर पाकिस्तानने कारवाई करावी, असे अमेरिकेचे मत असल्याचे राईस यांनी या वेळी सांगितले.

भारत अमेरिकामध्ये युद्ध अभ्यास:

  • भारतीय लष्कर आणि अमेरिकेचे सैन्य यांचा उत्तराखंडातील चौबतियाच्या जंगलातील दोन आठवड्यांचा सामूहिक युद्ध सराव यशस्वीपणे पार पडला.
  • ‘युद्ध अभ्यास 2016’ या उपक्रमाअंतर्गत हा सराव झाला.
  • युद्धाच्या दरम्यान एकमेकांच्या सहकार्याने शत्रूविरुद्ध कोणचे डावपेच आखायचे आणि त्याची अंमलबजावणी कशी करायची, याबाबत अभ्यास करण्यात आला.
  • तसेच या युद्ध सरावात भारतीय लष्कराच्या पायदळाचे 225 जवान आणि अमेरिकी सैन्याचे 20 इन्फन्ट्री रेजिमेंटचे 225 सैनिक सहभागी झाले होते.
  • अमेरिकी सैन्याच्या पॅसिफिक भागीदारी कार्यक्रमाअंतर्गत गेल्या 2004 पासून सुरू झालेला दोन्ही देशांचा युद्ध अभ्यास मालिकेतील हा बारावा सराव होता.
  • या सरावांमुळे दहशतवाद्यांना प्रमुख्याने डोंगरी भागात तोंड देण्यासाठी उपाययोजना करणे आणि प्रत्युत्तर देण्याबाबत सैन्यात प्रगती झाली आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago