चालू घडामोडी (10 डिसेंबर 2016)
चलनात लवकरच प्लॅस्टिक नोटा येणार :
- सरकारने आता कागदाऐवजी प्लास्टिकच्या नोटा छापण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आवश्यक साहित्य मिळविण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.
- वित्त राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत ही माहिती दिली. क्षेत्रीय चाचण्या घेतल्यानंतर रिझर्व्ह बँक दीर्घकाळापासून प्लास्टिकच्या नोटा आणण्याची योजना आखीत असल्याचे त्यांनी सांगितले.
- पाच शहरांमध्ये प्रयोग करणार क्षेत्रीय चाचणी म्हणून 10 रुपयांच्या 1 अब्ज प्लास्टिक नोटा देशातील पाच शहरांत चलनात आणण्यात येणार आहेत. या पाच शहरांत कोची, म्हैसूर, जयपूर, सिमला आणि भुवनेश्वर यांचा समावेश आहे.
- 05 वर्षांचे सरासरी आयुष्य प्लास्टिकच्या नोटांना आहे. त्यांची कॉपी करणेही कठीण आहे. कागदी नोटांपेक्षा त्या अधिक स्वच्छही असतात.
- सुरक्षा धागा नसलेल्या 1 हजारांच्या काही नोटा डिसेंबर 2015 मध्ये आढळून आल्या होत्या, तसेच त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
ललिता बाबर मॅरेथॉन स्पर्धेची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर :
‘लॉयर्स कलेक्टिव्ह’चे लायसन्स रद्द करण्यात आले :
- प्रख्यात वकील इंदिरा जयसिंह यांच्या ‘लॉयर्स कलेक्टिव्ह’ या स्वयंसेवी संघटनेचे (एनजीओ) लायसन्स केंद्र सरकारकडून रद्द केल्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
- अनेक कार्यकर्त्यांनी यावर टीका केली आहे. सरकारच्या या निर्णयावर टीका करताना नाझ फाऊंडेशनच्या कार्यकारी संचालक अंजली गोपालन म्हणाल्या की, लॉयर्स कलेक्टिव्ह यांना पाठविलेल्या आदेशात सर्वात आश्चर्यचकित करणारी बाब ही आहे की, महिलांच्या विकासासाठी आणि सशक्तीकरणासाठी या संस्थेने काहीही केले नाही.
- इतिहासकार आणि सामाजिक कार्यकर्त्या उमा चक्रवती यांनी आरोप केला आहे की, या संघटनांना लक्ष्य करण्याची ही एक पद्धत आहे.
- गत काही वर्षांत न्यायासाठी लढाई लढल्याबाबत जेएनयूच्या प्राध्यापक आयशा किदवई यांनी एनजीओंचे कौतुक केले आहे.
- फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन अॅक्टच्या (एफसीए) उल्लंघनाबाबत लॉयर्स कलेक्टिव्ह या संस्थेचे लायसन्स गृहमंत्रालयाकडून कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहे.
लॅम्बासिंगी या गावाला आंध्रप्रदेशचे काश्मीर म्हणून संबोधतात :
- दक्षिण भारत आणि उत्तर भारत ही देशाची दोन टोक आहेत. उत्तरेकडे उत्तराखंड, हिमाचलप्रदेश, जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये डोंगराळ भागात बर्फ पडणे नैसर्गिक आहे.
- खास बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक इथे जातात. पण असाच बर्फ दक्षिणेकडच्या एका राज्यामध्ये पडतो.
- आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम जिल्ह्यातील चिंतापाली तालुक्यातील लॅम्बासिंगी या छोटयाशा गावात काहीवेळा बर्फ पडतो.
- तसेच या हिलस्टेशनला आंध्रप्रदेशचे काश्मीर म्हटले जाते. समुद्रसपाटीपासून हे गाव 1025 मीटर उंचीवर आहे.
- डिसेंबर-जानेवारी महिन्यात इथे पारा शून्य डिग्रीपर्यंत घसरतो. चारवर्षांपूर्वी 15 जानेवारी 2012 रोजी वातावरणात झालेल्या बदलांमुळे इथे बर्फवृष्टी झाली होती.
- वनराईने नटलेला हा प्रदेश पाहताक्षणीच नजरेत भरतो. प्रमुख इथे कॉफीचे उत्पादन घेतले जाते.
पृथ्वीला प्रदक्षिणा मारणारे पहिले अमेरिकन जॉन ग्लेन यांचे निधन :
- पृथ्वीला प्रदक्षिणा मारणारे पहिले अमेरिकन अंतराळवीर जॉन ग्लेन यांचे 95 व्या वर्षी निधन झाले.
- 1962 साली त्यांनी केलेल्या अवकाश प्रवासामुळे ते अमेरिकन लोकांच्या घराघरात पोहचले होते. त्यांचा करिश्मा इतका होता की अंतराळवीर म्हणून निवृत्त झाल्यावर ते अनेक वर्षे लोकप्रिय सिनेट म्हणून देखील नावाजले गेले.
-
- मर्क्युरी 7 या अवकाश यानातून प्रवास केलेले ते शेवटचे अंतराळवीर होते.
- अंतराळवीर होण्याआधी ते फायटर पायलट होते, त्यांनी दोन युद्धामध्ये आपली सेवा प्रदान केली होती. त्यांच्या नावावर उड्डाणाचे अनेक विक्रम आहेत.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा