चालू घडामोडी (10 डिसेंबर 2017)
पाककडून रुपयाचे अवमूल्यन :
- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी चर्चेनंतर रुपयाचे अवमूल्यन करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे पाकिस्तानचे धोरण असल्याचे स्पष्ट झाले आहे.
- पाकिस्तान सरकार आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी प्रतिनिधी यांच्यात काल देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत चर्चेची पहिली फेरी झाली असून, आता 12 व 14 डिसेंबर रोजी धोरणात्मक निर्णय घेताना दोन दिवसांची सुटी ठेवण्यात आली आहे.
- वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की स्टेट बँक ऑफ पाकिस्तान आता बाजारपेठेतील स्थितीनुसार चलनाचे समायोजन करण्यास परवानगी देणार आहे.
- गेल्या महिन्यात 2.5 अब्ज डॉलर्सची बंधपत्रे जारी करण्यात आली होती, त्या व्यवहारात अडचणी येऊ नयेत यासाठी रुपयाचे अवमूल्यन करण्यात येत आहे.
- काल रुपयांची किंमत डॉलरला 110 रुपये होते व नंतर 107 रुपयांवर आली.
- पाकिस्तानचे नेतृत्व अर्थ सचिव शाहीद मेहमूद करीत असून, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे नेतृत्व हॅराल्ड फिंगर करीत आहेत.
चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिका प्रकल्प पाक लष्कराच्या ताब्यात :
- चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिकेसाठी पाकिस्तानला निधी उपलब्ध करण्यावर चीनने र्निबध आणले असताना हा प्रकल्प पाकिस्तान लष्कराने ताब्यात घेण्यासाठी चीन प्रयत्नशील असण्याची शक्यता युरोपियन फाऊंडेशन ऑफ साऊथ एशियन स्टडीजच्या (ईएफएसएएस) विश्लेषकांनी वर्तविली आहे.
- संयुक्त कार्यकारी समूहाच्या (जेडब्ल्यूजी)20 नोव्हेंबरला झालेल्या बैठकीमध्ये या प्रकल्पातील तीन प्रमुख रस्त्यांच्या बांधणीसाठी निधी उपलब्ध होण्याची अपेक्षा होती. परंतु इस्लामाबादला सध्याची निधी वितरित करण्याची प्रक्रिया रद्द करण्याचे तसेच लवकरच नवे दिशानिर्देश करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले होते.
- परंतु या प्रकल्पातील लाचखोरीमुळे चीनने निधी वितरित करण्यास अटकाव केला आहे. यामुळे हा प्रकल्प पाकिस्तानचे सत्ताकेंद्र असलेल्या पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतल्यास प्रकल्पाच्या यशाची हमी वाढेल व दर्जेदार कामही होईल, असे चीनने ईएफएसएएस या अहवालात म्हटले आहे.
ईयू-ब्रिटन यांच्यात करार :
- युरोपीयन युनियन (ईयू) आणि ब्रिटन यांच्यात ब्रिटनने युरोपियन युनियनमधून कोणत्या अटींवर बाहेर पडायचे यावर ऐतिहासिक करार झाला.
- ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे या चर्चेसाठी येथे दाखल झाल्यावर हा करार झाला.
- युरोपियन कमीशनने म्हटले की ब्रिटनने आयरीशची सीमा, घटस्फोट विधेयक आणि नागरिकांचे हक्क यांच्यासह वेगळे होण्याच्या मुद्यांवर पुरेशी प्रगती केलेली आहे.
- 14 व 15 डिसेंबर रोजी युरोपियन युनियनच्या नेत्यांची शिखर परिषद होत असून तीत ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या वाटाघाटींच्या दुसर्या टप्प्यासाठी या कराराने मार्ग मोकळा केला आहे. युरोपियन युनियनचा ब्रिटन जवळपास चार दशकांपासून सदस्य होता व त्यातून बाहेर पडण्यासाठी ब्रिटनला सार्वमताने जून 2016 मध्ये परवानगी दिली.
लिओनार्दो दा विंचींचे चित्र खरेदी करणाऱ्या राजपूत्राचा अखेर शोध लागला :
- गेल्या महिन्यात लिओनार्दो दा विंचींच्या 500 वर्षे जुने असलेल्या चित्राविषयी चर्चा रंगली होती. 500 वर्षे जुनं चित्र तब्बल 3 हजार कोटी रुपयांना विकलं गेल्यामुळे हे चित्र चर्चेत आलं होतं. पण हे चित्र नक्की कोणी विकत घेतलं होतं, याविषयी गुप्तता पाळण्यात आली होती. पण आता हे चित्र कोणी विकत घेतलंय याची माहिती समोर आली आहे.
- लिओनार्दो दा विंचींच्या या चित्राचं नाव आहे साल्वाडोर मुंडी. ते ख्रिस्तांचं चित्र होतं. हे चित्र खरेदी करणारा माणूस हा सौदीचा एक राजपुत्र असल्याचं वृत्त द न्यूयॉर्क टाईम्सने दिलं आहे.
- या राजपुत्राचं नाव बागेर बीन मोहम्द बीन फरहान अल सौद आहे. नोव्हेंबर महिन्यात साल्वाडोर मुंडी या चित्राचा लिलाव पार पडला. लिलावात अनेकांनी मोठ मोठ्या किंमती सांगितल्या होत्या.
- 19 मिनिटं चाललेल्या या लिलावात शेवटी एक फोन आला. या फोनवरील व्यक्तीने सगळ्यात जास्त बोली लावून हे चित्र विकत घेतलं. या चित्राची किंमत एखाद्या विमानाएवढी असल्याने प्रत्येकाने आश्चर्य व्यक्त केलं होतं.
भूतानच्या जेत्सुन जगातील सर्वात लहान आणि तरुण महाराणी :
- जेत्सुन पेमा वांगचूक या वयाच्या 21 व्या वर्षी महाराणीच्या गादीवर विराजमान झाल्या होत्या. 2011 साली त्यांनी भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांच्याशी विवाह केला होता. त्या आता 27 वर्षांच्या आहेत.
- महाराणी जेत्सुन आणि राजा वांगचुक यांच्यात जवळपास 10 वर्षांचं अंतर आहे. भुतानमध्ये जन्माला आलेल्या जेत्सुन यांनी लंडनमध्ये उच्चशिक्षण घेतलं आहे. पण लंडनला जाण्याआधी त्या भारतात वर्षभर शिक्षण घेत होत्या. पश्चिम बंगालच्या सेंट जोसेफ कॉन्वेंट शाळेत त्या शिकल्या आहेत. त्यानंतर हिमाचलमधील एका महाविद्यालयात बारावीपर्यंतच शिक्षण त्यांनी घेतलं. भुतानच्या या महाराणीला हिंदी भाषाही येत असल्याचीही माहिती समोर येतेय. तसंच, इंग्रजी भाषेवरही त्यांचं प्रभुत्व आहे. लंडनहून शिक्षण घेऊन भुतानमध्ये परतलेल्या जेत्सुन यांनी राजा वांगचूक यांच्याशी लग्न केलं. जेत्सुन यांचे वडिल वैमानिक आहेत.
- वयाच्या 21 व्या वर्षी महाराणी पदावर विराजमान झालेल्या या राणीला जगातील सगळ्यात तरुण राणी म्हणूनही संबोधलं जातं.
भारतातील पहिल्या महिला फोटोजर्नलिस्ट होमाई व्यारावाला यांना गुगलची आदरांजली :
- सध्याच्या काळात पत्रकारिता क्षेत्रात महिला असणे ही काही मोठी गोष्ट नाही. पण एक वेळ अशी होती जेव्हा एखादी महिला फोटो पत्रकार असणं एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नव्हतं. पण होमाई व्यारावाला यांनी जुन्या विचारसरणीला छेद देत फोटो पत्रकारितेत करिअर केलं आणि अशाप्रकारे त्या देशाच्या पहिल्या महिला फोटो जर्नलिस्ट झाल्या.
- भारताच्या पहिल्या महिला फोटो पत्रकार असणा-या होमाई व्यारावाला यांची 104 वी जयंती आहे.
- यानिमित्त गुगलने डुडलद्वारे त्यांना आदरांजली वाहिली आहे.
- स्वतंत्र भारतातील पहिल्या तीन दशकांतील अनेक घटना होमाई व्यारावाला यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्या होत्या.
- होमाई व्यारावाला यांचा जन्म एका पारसी कुटुंबात गुजरात येथे झाला. त्यांना ‘डालडा 13’ या टोपणनावाने ओळखले जात होते. या नावाने ओळखले जाण्याचे कारण म्हणजे त्यांचा जन्म 1913 मध्ये झाला.
- 1938 मध्ये त्यांनी व्यावसायिक फोटोग्राफीला सुरूवात केली. 1942 मध्ये त्यांनी दिल्लीत ब्रिटिश इन्फर्मेशन सर्व्हिसेस ऑफ फोटोग्राफरमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
- 2011 मध्ये त्यांना पद्मविभूषण देऊन सन्मान करण्यात आला होता.
आता ‘ओटीपी’च्या माध्यमातून मोबाईल करा ‘आधार’शी लिंक :
- सध्या विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘आधार’ लिंक करणे बंधनकारक करण्यात येत आहे. तसेच मोबाईल क्रमांकही आधारशी लिंक करण्यासाठी फेब्रुवारीपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.
- मात्र, अद्यापही असंख्य मोबाईलधारकांनी मोबाईल क्रमांक आधारशी लिंक केला नाही. त्यामुळे आता नवी योजना राबवण्यात येणार असून, या योजनेनुसार घरबसल्या ओटीपीच्या माध्यमातून मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करता येऊ शकतो.
- सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे सुरक्षाविषयक प्रश्न उपस्थित केल्याने न्यायालयाने सर्व मोबाईलधारकांना त्यांचा मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक करण्यास सांगितले होते. त्त्यासाठी फेब्रुवारीची डेडलाईन देण्यात आली आहे.
- त्यामुळे या सर्व मोबाईलधारकांच्या सोयीसाठी 1 जानेवारीपासून घरबसल्या मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करता येऊ शकतो. यासाठी व्हॉइस गाईडेड प्रणालीच्या माध्यमातून आधार लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकते. त्यानंतर संबंधित मोबाईलधारकाला वन टाईम पासवर्ड त्यांच्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त होईल. त्यानंतर त्या क्रमांकाच्या माध्यमातून मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करता येऊ शकेल.
दिनविशेष :
- 1901 : नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले.
- 1906 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांना नोबेल शांति पुरस्कार देण्यात आला. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले अमेरिकन होत.
- 1896 : स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते अल्फ्रेड नोबेल यांचे निधन.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
आजच्या चालू घडामोडींचा व्हिडिओ