Current Affairs of 10 February 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (10 फेब्रुवारी 2018)

नीति आयोगाच्या आरोग्य विकास अहवालात केरळ, पंजाब अव्वलस्थानी :

  • नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी आरोग्य अहवाल सादर केला आहे.
  • नीति आयोगाने प्रसिद्ध केलेल्या राज्यांच्या आरोग्य विकास अहवालात केरळ, पंजाब आणि तामिळनाडू या राज्यांनी बाजी मारली आहे. यामध्ये राज्यांना आरोग्य श्रेणीप्रमाणे गुण देण्यात आले आहेत.
  • तसेच ‘हेल्दी स्टेटस प्रोग्रेसिव्ह इंडिया’ असे या अहवालाचे नाव असून यात झारखंड, जम्मू आणि काश्मीर तसेच उत्तर प्रदेश या मोठ्या राज्यांमध्ये आरोग्य सुविधांमध्ये सर्वाधिक वाढ झाल्याचे आढळून आले आहे.
  • तर झारखंड आणि छत्तीसगढ ही राज्ये आरोग्याच्या क्षेत्रात चांगले काम करीत आहेत. ही राज्ये सध्या चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आली आहेत.
  • छोट्या राज्यांमध्ये मिझोराम हे पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर मणिपूर आणि गोव्याचा क्रमांक लागतो.
  • तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये लक्षद्वीपने सर्वाधिक चांगले काम केले आहे.

‘फाल्कन हेवी’ यानातील‘टेस्ला कार’ अवकाशात भरकटली :

  • अमेरिकन उद्योग सम्राट इलॉन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ या कंपनीनं ‘फाल्कन हेवी’ हे प्रचंड शक्तीशाली अवकाश यान अवकाशात सोडले होते.
  • जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका खासगी कंपनीनं अंतराळ उड्डाण यशस्वी केले. या यानासोबत इलॉन मस्क यांनी आपली टेस्ला कारही अवकाशात पाठवली होती.
  • ‘स्टारमन’ रुपातली बाहुलीदेखील लाल रंगाच्या कारसोबत अवकाशात पाठवण्यात आली आहे. पण ही कार अवकाशात आपला मार्ग भरकटली आहे.
  • ‘फाल्कन हेवी’ या शक्तीशाली अवकाशयानातून निघाल्यानंतर टेस्ला कारनं पृथ्वी आणि मंगळाच्या कक्षेत जाणं अपेक्षित होतं पण या कारला अवकाशात तिच्या निश्चित मार्गाकडे पाठवण्यासाठी इंधनाचा स्फोट ज्या तीव्रतेने व्हायला हवा होता, तो झाला नाही त्यामुळे ही कार मार्ग भरकटली आहे.

अलिबाग पोलिसांची संगणकीय प्रणालीव्दारे अभ्यागतांची नोंद :

  • प्रगत व गतीमान महाराष्ट्र उपक्रम आंतर्गत अलिबाग पोलीस ठाण्यात अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली अर्थात व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम कार्यान्वयित करण्यात आली आहे.
  • पोलीस ठाण्यात येणारया अभ्यागतांच्या माहितीचे संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून संकलन व्हावे आणि दैनंदिन कामकाजात सुसूत्रता यावी हा या उपक्रमा मागचा मुळ उद्देश आहे.
  • तसेच जिल्ह्यात पहिल्यांदाच पोलीस ठाण्यात अशा अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीची सुरवात करण्यात आली आहे.
  • या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून येणारया जाणारया अभ्यागतांची माहिती संकलीत केली जाते आहे.
  • तर येणारया व्यक्तीचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, ओळखपत्र क्रमांक, त्याच्या कामाचे स्वरुप, येण्याची वेळ, जाण्याची वेळ, कामाचे निराकरण झाले अथवा नाही यासारख्या नोंदी या संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून संकलित केल्या जात आहे.

इंदिरा नुयींची आयसीसीच्या संचालकपदी निवड :

  • पेप्सिकोच्या प्रमुख इंद्रा नुयी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमध्ये इंडिपेंडन्ट डायरेक्टर (स्वतंत्र संचालक) म्हणून नियुक्ती करण्यात आली असून संचालकपदावर नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला आहेत.
  • आयसीसीत स्वतंत्र संचालकाची नियुक्ती करण्याचा निर्णय जून 2017 रोजी घेण्यात आला तर जून 2018 मध्ये त्या पदभार स्वीकारणार आहेत.
  • तर दोन वर्षांसाठी त्या या पदावर असतील. मात्र, त्यांना पुन्हा मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे.
  • तसेच इंद्रा नुयी या पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला तसेच पहिल्या स्वतंत्र संचालक आहेत.
  • ‘फॉर्च्यून’ मासिकाने जगातील शक्तिशाली महिलांच्या यादीत इंद्रा नुयी यांचा समावेश केला आहे.

दिनविशेष :

  • जे. आर. डी टाटा हे 1929 मध्ये पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले होते.
  • 1931 मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली होती.
  • पुणे विद्यापीठाची स्थापना 1949 मध्ये झाली आहे.
  • गांधी-वध अभियोगातून 1949 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निष्कलंक सुटका झाली होती.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago