Current Affairs (चालू घडामोडी) of 10 January 2015 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू |
2. | स्वेच्छानिवृत्ती विमा कर्मचार्यांना पेन्शनवाढ नाही |
3. | नर्सरीला प्रवेश वय तीन वर्ष |
4. | सचिनचे चित्रपट सृष्टीत पदार्पण |
5. | दांडी कुटीर संग्रालयाचे उद्घाटन |
6. | आठ नव्या ग्रहांचा शोध |
7. | दिनविशेष |
जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू :
- जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे.
- सरकार स्थापन करण्यासाठी 87 उमेदवारांची मत जमवण्यात कोणत्याच पक्षाला यश न आल्याने राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे.
- 20 डिसेंबर 2014 रोजी झालेल्या निवडणुकांत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाले नाही.
स्वेच्छानिवृत्ती विमा कर्मचार्यांना पेन्शनवाढ नाही :
- भारतीय सर्वसाधारण विमा महामंडळ आणि त्याच्या अखत्यारित असलेल्या चार सहकारी सर्वसाधारण विमा कंपन्यांमधून 2004 मध्ये स्वेच्छानिवृत्तीघेवून बाहेर पडणार्या देशभरातील कर्मचार्यांनी वाढील पेन्शनसाठी केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत.
- या कर्मचार्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर या कंपन्यांनी डिसेंबर 2005 मध्ये कर्मचार्यांना पगारवाढ लागू केली होती.
- या तारखेला आम्हीसुद्धा नोकरीत होतो.त्यामुळे आमच्या पेन्शनमध्ये वाढ केली जावी, अशी स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचार्यांची मागणी होती.
नर्सरीला प्रवेश वय तीन वर्ष :
- वयाची तीन वर्ष पूर्ण केलेल्या मुलांनाच पूर्व प्राथमिक वर्गात (नर्सरी) प्रवेश देण्यात येईल.
- येत्या शैक्षणिक वर्षापासून (2015-2016) ही वयाची अट लागू केली जाणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तवडे यांनी स्पष्ट केले.
सचिनचे चित्रपट सृष्टीत पदार्पण :
- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित येणार्या चित्रपटात स्वतः सचिन भूमिका करणार आहे.
- ब्रिटिश लेखक जेम्स एरस्किन या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत तर चित्रपटासाठी ‘200 नॉट आउट‘ही निर्मिती संस्था काम करीत आहे.
दांडी कुटीर संग्रालयाचे उद्घाटन :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगर येथे “दांडी कुटीर” संग्रालयाचे उद्घाटन केले.
- या संग्रालयात महात्मा गांधीजींची तीन मजल्याच्या डोमर आकारातील विविध रुपे दाखवली आहे तसेच स्वातंत्र्य चळवळीच्या घटनांचे येथे सादरीकरण देखील आहे.
- महात्मा गांधीजींना भारतात परतायला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दोन टपाल संचाचे विंनिमोचन केले.
आठ नव्या ग्रहांचा शोध :
- नासाने सोडलेल्या केप्लर या यानाला यश मिळाले असून त्याने जीवनसृष्टी असलेल्या आठ नव्या ग्रहांचा शोध लावला आहे.
- त्यातील दोन ग्रह हे पृथ्वीसारखेच आढळून आले आहेत. त्या दोन ग्रहांना केप्लर-438 बी व केप्लर-442 अशी नावे देण्यात आली आहेत.
- ती दोन्ही ग्रह सुर्यापेक्षा कमी तापमान व आकार असलेल्या ‘रेड इवार्क‘ या गटातील तार्याभोवती फिरत आहेत.
- या दोन्ही ग्रहांचा पृष्ठभाग हा पृथ्वीसारखा खडबडीत आहे.
दिनविशेष :
- 1966 – भारत-पाकिस्तान यांच्यात ताश्कंद येथे शांतता करार झाला.