चालू घडामोडी (10 जून 2017)
टाटा मोटर्समध्ये ‘साम्य’वादाचा अंमल :
- देशातील सर्वांत मोठी ऑटोमोबाइल कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने कंपनीतील सर्व पदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
- कंपनीत टीमवर्कला वाव मिळावा आणि कर्मचाऱ्यांना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळावी, यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कंपनीचे सर्व कर्मचारी एकाच स्तरावर (समान) येणार आहेत.
- कंपनीत यापुढे कोणीही बॉस नसेल आणि सर्व जण केवळ कर्मचारी म्हणूनच ओळखले जातील. टाटा मोटर्सकडून जनरल मॅनेजर, सीनिअर जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट ही पदे बरखास्त करण्यात येणार आहेत.
- कंपनीने यासंबंधी एक परिपत्रक जारी केले आहे. या निर्णयामुळे पद आणि पदानुक्रमाचा विचार न करता काम करण्याची सर्वांना संधी मिळेल, असे कंपनीने म्हटले आहे.
- टाटा मोटर्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तब्बल 10 हजार कर्मचाऱ्यांना हा निर्णय लागू होणार आहे.
भिवंडीच्या महापौरपदी जावेद दळवी यांची निवड :
- भिवंडीच्या महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे जावेद दळवी विजयी झाले, तर उपमहापौरपदी शिवसेनेचे मनोज काटेकर यांची निवड झाली.
- विशेष महासभेच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी जीवन गलांडे होते, तर या सभेसाठी उपविभागीय अधिकारी संतोष थिटे व आयुक्त योगेश म्हसे उपस्थित होते.
- महापौरपदासाठी एकूण सात सदस्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी विलास पाटील, सुमित पाटील, मदन पाटील यांच्यासह पाच जणांनी अर्ज मागे घेतल्याने केवळ दळवी व टावरे रिंगणात होते.
- सदस्यांनी हात वर करून मतदान केले. त्यामध्ये दळवी यांना 62, तर टावरे यांना 28 मते मिळाली.
भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी अनिल कुंबळे कायम :
- भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेलाच कायम ठेवण्यात येणार आहे.
- सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय क्रिकेट बोर्डाची सल्लागार समिती ज्यामध्ये सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश आहे त्यांनी अनिल कुंबळेलाच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
- तसेच या तीन सदस्यीय समितीची बैठक झाली. या बैठकीत अनिल कुंबळेच्या जागी दुस-या प्रशिक्षकाची निवड न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दिनविशेष :
- 1924 पासून 10 जून जागतिक दृष्टीदान दिन म्हणून पाळला जातो.
- 10 जून 1966 रोजी ‘मिग’ या जातीच्या विमानांची नाशिक येथे निर्मिती करण्यात आली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा