Current Affairs of 10 May 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (10 मे 2016)

नोवाक जोकोविचला माद्रिद ओपन मास्टर्स किताब :

  • जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविचने ब्रिटनच्या अ‍ॅण्डी मरेलाचा अंतिम फेरीत पराभव करून 29 वेळा माद्रिद ओपन मास्टर्स किताब जिंकण्याची कामगिरी केली आहे.
  • अंतिम फेरीत जोकोविचने मरेला 6-2, 3-6, 6-3 असे नमवून जेतेपदावर मोहोर उमटवली.
  • जोकोविचचे या वर्षातील हे पाचवे जेतेपद ठरले आहे. यापूर्वी कतार ओपन, इंडियन वेल्स, मियामी ओपन व ऑस्ट्रेलियन ओपन किताब संपादन केला होता.
  • मरेने उपांत्य फेरीत स्पेनच्या राफेल नदालला, तर जोकोविचने केई निशिकोरी याला नमवून अंतिम फेरी गाठली होती.
  • नदालला विजेतेपदाचा दावेदार मानण्यात येत होते. मात्र, मरेने त्याचे आव्हान परतवून लावत आपणच किताब राखणार असल्याचे संकेत दिले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (9 मे 2016)

देशातील 56 हजार गावे मोबाईलने जोडली जाणार :

  • दूरसंचार विभाग देशातील 55 हजार 669 गावांमध्ये मार्च 2019 पर्यंत टप्प्याटप्प्याने मोबाईल सेवा पुरवणार आहे.
  • दूरसंचार विभागाकडून नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे.
  • युती सरकारला दोन वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने दूरसंचार विभागातील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
  • तसेच या अहवालानुसार ईशान्य भारतात आठ हजार 621 गावांमध्ये 321 मोबाईल मनोऱ्यांच्या मदतीने सप्टेंबर 2017 पर्यंत मोबाईल सेवा पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
  • ईशान्य भारतातील मोबाईल कनेक्‍टिव्हिटीसाठी आतापर्यंत पाच हजार 336 कोटींची दूरसंचार विकास योजना याआधीच मंजूर करण्यात आली आहे.
  • ग्रामीण भारताला हायस्पीड ब्रॉडबॅण्डसोबत कनेक्‍ट करण्यासाठी 48 हजार 199 ग्रामपंचायती एप्रिल 2016 अखेरपर्यंत ऑप्टिक फायबरने जोडण्यात आल्या आहेत.
  • अतिशय दुर्गम भागातील इंटरनेट कनेक्‍टिव्हिटीसाठी केंद्र सरकारने भारतनेट प्रकल्प मिशन मोड म्हणून हाती घेतला आहे.
  • तसेच त्यामध्ये अडीच लाख ग्रामपंचायतीमधील सुमारे साठ कोटी नागरिक “डिजिटली कनेक्‍ट” होतील.
  • भारतनेटच्या माध्यमातून ई-गव्हर्नन्स सेवा, ई-कॉमर्स, टेली मेडिसीन, टेली एज्युकेशन, आर्थिक व्यवहार यांसारख्या सेवा तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोचतील.
  • डिजिटल कनेक्‍टिव्हिटीमुळे रोजगाराच्या संधीदेखील ग्रामीण पातळीवर मिळणे शक्‍य होईल, असा विश्वास दूरसंचार विभागाने अहवालातून व्यक्त केला आहे.

अद्भुत खगोलीय दृश्य सूर्यावर काळा डाग :

  • बुधाचा काळा ठिपका सूर्याच्या पृष्ठभागावरून सरकत असल्याचे अनोखे खगोलीय दृश्य (दि.9) बघायला मिळाले.
  • दहा वर्षांच्या कालखंडानंतर आलेली बुध पारगमन किंवा अधिक्रमणाची ही दुर्मीळ घटना खगोलप्रेमींसाठी अनोखी मेजवानी ठरली.
  • काय असते बुधाचे अधिक्रमण
  • (दि.9) संध्याकाळी 4.40 वाजता बुधाच्या पारगमनाला प्रारंभ झाला.
  • तसेच हे दृश्य शतकातून केवळ 13-14 वेळा दिसते.
  • भारतात 10 वर्षांनंतर हा दुर्मीळ योग जुळून आला.
  • युरोप, आफ्रिका, ग्रीनलँड, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, आर्क्टिक, उत्तर अटलांटिक महासागर आणि प्रशांत महासागराच्या (पॅसिफिक) भागातही हे दृश्य दिसले.
  • बुधाचे अधिक्रमण –
  • 15 नोव्हेंबर 1999
  • 7 मे 2003
  • 8 नोव्हेंबर 2006

जगातील पहिला होलोग्राफिक स्मार्टफोन :

  • त्रिमिती दृश्यचित्रफिती व प्रतिमा कुठलाही चष्मा किंवा अन्य साधनाचा वापर न करता बघता येतील, असा होलोग्राफिक स्मार्टफोन जगात प्रथमच तयार करण्यात आल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. हा स्मार्टफोन लवचिक आहे.
  • होलोफ्लेक्स असे या स्मार्टफोनचे नाव असून त्याच्या मदतीने कुठलेही बाह्य़ साधन न वापरता त्रिमिती प्रतिमा व चित्रपट पाहता येतात.
  • होलोफ्लेक्समुळे स्मार्टफोनबरोबरच्या आंतरक्रिया बदलणार असून त्यामुळे वापरकर्त्यांच्या हालचालींना मर्यादा राहणार नाहीत, असे कॅनडातील क्विन्स विद्यापीठाचे रोएर व्हेर्टेगाल यांनी सांगितले.
  • होलोफ्लेक्स स्मार्टफोनमध्ये 1920 गुणिले 1080 इतके उच्च विवर्तन असून त्यातील लाइट एमिटिंग डायोड लवचिक आहेत.
  • तसेच त्यांना फ्लेक्सिबल ऑरगॅनिक लाइट एमिटिंग डायोड असे म्हणतात. त्यांचा वापर स्पर्श पडद्यात करण्यात आला आहे.
  • होलोफ्लेक्समध्ये लवचिक सेन्सर असून त्यामुळे वापरकर्ते फोन वाकवू शकतात, झेड अक्षावर वस्तू फिरत असल्याचा आभास त्यात होईल.
  • व्हेरटेगाल यांनी सांगितले की, होलोफ्लेक्स तंत्रज्ञानाचे अनेक उपयोग आहेत.
  • त्रिमिती प्रारूपे वापरून त्याप्रमाणे वस्तू तयार करणे शक्य होणार आहे.
  • विशिष्ट कॅमेरा वापरून होलोग्राफिक व्हिडिओ कॉन्फरन्सेस घेता येतील.

गांधीलमाशीच्या नव्या प्रजातीस ब्रॅड पीट्सचे नाव :

  • वैज्ञानिकांनी भारत व दक्षिण आफ्रिकेत गांधीलमाश्यांच्या दोन नवीन प्रजाती शोधल्या असून त्यातील एका प्रजातीला हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पीट याचे नाव देण्यात आले आहे.
  • गांधील माश्यांच्या नव्या प्रजातीचे नाव कोनोब्रेगमा ब्रॅडपिटी असे ठेवले असून या माश्या पतंग व फुलपाखरांच्या अळ्यांवर वाढतात.
  • तसेच या माश्या त्यांच्या यजमानाच्या शरीरात अंडी घालतात व नंतर त्यापासून नवीन माश्या तयार होऊन त्या ममीभूत अळीतून बाहेर पडतात.
  • या गांधीलमाश्यांचे वर्तन प्राणघातक असले तरी त्या शेतीसाठी फार उपकारक असतात. त्यांच्यामुळे जैवनियंत्रणाची क्रिया साधली जाते.
  • संतोष श्रीविहारअवुनजीकट्टू परामबिल रणजिथ या केरळच्या कालिकत विद्यापीठातील दोघांनी माश्यांच्या या प्रजाती शोधल्या आहेत.
  • तसेच त्यांनी शोधलेली आणखी दुसरी एक प्रजाती आहे ती परोपजीवीच असून भारतात या प्रजातीतील उपप्रजातीची ही माशी प्रथमच सापली आहे.
  • नवीन माशीला नाव शोधत असताना थायलंडच्या चुलालोंगकोर्न विद्यापीठातील भूंतिका ए ब्यूटचर यांनी ब्रॅड पीटचे नाव देण्याचे ठरवले.

यंत्रमानवही विद्यापीठ प्रवेश परीक्षा देणार :

  • यंत्रमानवाला कृत्रिम बुद्धिमत्ता प्रदान करता येते त्याला काही मर्यादा असल्या तरी विविध क्षेत्रांत त्यांचा वापर वाढत आहे.
  • चीनमध्ये यंत्रमानवाला राष्ट्रीय महाविद्यालय प्रवेश परीक्षेसाठी बारावीच्या विद्यार्थ्यांबरोबर बसवले जाणार आहे.
  • विद्यापीठ प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या या प्रवेश परीक्षेस बसण्याची संधी त्याला पुढील वर्षी दिली जाणार आहे.
  • विशिष्ट पद्धतीने तयार केलेला हा यंत्रमानव गणित, चिनी भाषा, मुक्त कलांची र्सवकष चाचणी अशा तीन परीक्षा देणार असून त्यात इतिहास, राज्यशास्त्र व भूगोल हे विषय असणार आहेत, असे चेंगडू येथील कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लिन हुई यांनी म्हटले आहे.
  • यंत्रमानवाला इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच ठराविक वेळेत उत्तरे लिहून पूर्ण करावी लागणार आहेत, बंद खोलीत परीक्षा घेतली जाणार असून, त्या वेळी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक व नोटरी यांची उपस्थिती राहील.
  • यंत्रमानव एका प्रिंटरला जोडलेला असेल, त्याला इलेक्ट्रॉनिक पद्धतीची प्रश्नपत्रिका दिली जाईल.
  • अर्थात, ती इतर मुलांना मिळेल तेव्हाच त्यालाही लोड केली जाणार आहे.
  • यंत्रमानवाचा इंटरनेटशी काही संबंध असणार नाही, त्यामुळे कॉपी करण्याचा प्रश्न राहणार नाही.
  • हा यंत्रमानव त्याच्या कृत्रिम बुद्धिमत्ता आज्ञावलीच्या मदतीने प्रश्नांची उत्तरे देईल असे चायना डेलीने म्हटले आहे.

दिनविशेष :

  • मायक्रोनेशिया संविधान दिन.
  • दक्षिण कोरिया पालक दिन.
  • मेक्सिको मातृ दिन.
  • महाराष्ट्र जलसंधारण दिन.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (11 मे 2016)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago