Current Affairs of 10 November 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (10 नोव्हेंबर 2017)

भारत बांगलादेश दरम्यान नवीन रेल्वे सेवा सुरू होणार :

  • भारतातील कोलकत्यापासून बांगलादेशातील खुलना यादरम्यान नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याच्या निर्णयाला हिरवा झेंडा दाखविण्यात आला आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्री शेख हसीना यांच्यात 9 नोव्हेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये हा निर्णय घेण्यात आला.
  • दोन शेजारी राष्ट्रांच्या संबंधांच्या आड आंतरराष्ट्रीय शिष्टाचाराची औपचारिकता (प्रोटोकॉल) येता कामा नये असे मत व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी बोलताना म्हणाले, “दोन्ही देशांतील जास्तीत जास्त नागरिकांना एकमेकांच्या संपर्कात राहण्याकरिता प्रोत्साहन दिले पाहिजे.”
  • “आज आमादेर मैत्री बंधन अरो शुभोड होलो” असे बंगाली भाषेत म्हणत पंतप्रधान मोदी यांनी बैठकीच्या सुरवातीला “आज आपल्यातील मित्रत्वाचे संबंध अधिक दृढ झाले” असे मत व्यक्त केले. “या नव्या रेल्वे सेवेमुळे कोलकाता ते ढाका संपर्क आज शक्य झाला आहे. यामुळे लोकांना विनातक्रार आणि सोयीस्कर प्रवास करता येईल. हे बांगलादेश आणि भारत यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधाचे फलित आहे,” असेही मोदी म्हणाले.

अल्फिया शेखने ‘स्ट्राँगेस्ट वुमन’चा किताब पटकावला :

  • पॉवरलिफ्टिंगसारख्या खेळात अल्फिया शेखने आतापर्यंत 35 सुवर्णपदके जिंकली. नऊवेळास्ट्राँगेस्ट वुमन’चा किताब पटकावला. शिवाय आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही ‘चॅम्पियन’ झाली.
  • मात्र, या कामगिरीनंतरही ती उपेक्षेचे जीणे जगत आहे. हलाखीच्या परिस्थितीमुळे नागपूरकन्येला या खेळात टिकून राहण्यात अनेक अडचणी येताहेत. मदत किंवा नोकरी मिळाल्यास आपण खेळावर आणखी लक्ष केंद्रित करून नागपूरसह देशाला नावलौकिक मिळवून देऊ शकते, असे तिचे म्हणणे आहे.
  • काटोल रोड, फ्रेण्ड्‌स कॉलनीत राहणाऱ्या 19 वर्षीय अल्फिया शेखने तीन वर्षांपूर्वी पॉवरलिफ्टिंगमध्ये पाऊल ठेवले. कुणाचेही बळ नसताना अथक परिश्रम व स्वत:च्या गुणवत्तेवर अल्पावधीतच तिने यश संपादन केले.
  • तसेच अल्फिया लास वेगास येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठीही पात्र ठरली आहे. या स्पर्धेसोबतच तिला जर्मनी व इंग्लंडमधील स्पर्धांमध्येही सहभागी व्हायचे आहे.

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सानिया नेहवालला विजेतेपद :

  • भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने नागपूरमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम फेरीत सायनाने पी.व्ही. सिंधूवर 21-17, 27-25 अशी मात करत आपल्या कारकिर्दीतले तिसरे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. याआधी पुरुषांच्या अंतिम सामन्यात एच.एस. प्रणॉयने किदम्बी श्रीकांतवर मात करुन धक्कादायक निकालाची नोंद केली होती.
  • पहिल्या सेटमध्ये सिंधू आणि सायना नेहवालने सावध पवित्रा घेत सुरुवात केली. दोनही खेळाडूंनी सामन्यात आघाडी घेण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघांनाही त्यात यश आले नाही. एका क्षणापर्यंत पहिल्या सेटमध्ये 6-6 अशी बरोबरी झालेली असताना, सायनाने सेटमध्ये आघाडी घेतली. पहिल्या सेटच्या मध्यांतरापर्यंत सायनाने सामन्यात 11-9 अशी आघाडी घेतली. यानंतर सिंधूने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र सायनाने पहिल्या सेटमध्ये 4-5 गुणांची आघाडी कायम ठेवली. अखेर सिंधूची लढत मोडून काढत सायनाने पहिला सेट 21-17 अशा फरकाने विजय मिळविला.

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोमला सुवर्णपदक :

  • जागतिक स्पर्धेत पाच वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मेरी कोमने (Boxer Mary Kom) आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदकाची (Gold Medal) कमाई केली.
  • अंतिम सामन्यात मेरी कोमने उत्तर कोरियाच्या किम ह्योंगला पराभूत केले. आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत 48 किलो वजनी गटातील तिचे पहिले सुवर्ण आहे. यापूर्वी मेरी कोम 51 किलो वजनी गटातून सहावेळा या स्पर्धेत उतरली होती. यात 2003, 2005, 2010 आणि 2013 असे चार वेळा तिने सुवर्ण पदकाची कमाई केली होती. तर 2008 मध्ये तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते.
  • तसेच यावेळी ती पहिल्यांदाच 48 किलो गटात या स्पर्धेत सहभागी झाली होती. उपांत्य फेरीत जपानच्या सुबोसाविरुद्ध आक्रमक खेळ दाखवत तिने अंतिम फेरी गाठली होती.

दिनविशेष :

  • सन 1848 मध्ये 10 नोव्हेंबर रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक राष्ट्रगुरू ‘सुरेंद्रनाथ बॅनर्जी’ यांचा जन्म झाला.
  • बिल गेट्स यांनी 10 नोव्हेंबर 1983 मध्ये विंडोज 1.0 प्रकाशित केले.
  • भारताचे 8 वे पंतप्रधान म्हणून 10 नोव्हेंबर 1990 मध्ये ‘चंद्रशेखर’ यांनी सूत्रे हाती घेतली होती.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago