Current Affairs of 10 September 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (10 सप्टेंबर 2017)

गेम बंदीनंतर गुजरात सरकारची घोषणा :

  • भारतात धुमाकूळ घालीत असलेल्या व पालकांसाठी चिंतेचे कारण बनलेल्या “ब्लू व्हेल” या ऑनलाइन गेमच्या प्रवर्तकाची माहिती देणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस देण्याचे गुजरात सरकारने जाहीर केले.
  • हा गेम खेळणाऱ्या अनेकांनी त्याच्या शेवटच्या आव्हानानुसार आत्महत्या करून जीवन संपविले आहे.
  • त्यामुळेच “डेथ गेम” ठरलेल्या ब्लू व्हेलवर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी बंदी घातल्याची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षासाठी विशेष समिती :

  • मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षामार्फत हृदयशस्त्रक्रिया, किडनी, मूत्रपिंडरोपण, कर्करोग इ. गंभीर स्वरूपाच्या आजारांनी त्रस्त रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी अर्थसाह्य करण्यात येते.
  • याशिवाय, सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियमांतर्गत नोंदणी केलेल्या रुग्णालयामार्फत गरीब व गरजू रुग्णांवर स्वस्त दरात उपचार केले जातात.
  • तसेच याचे पुढचे पाऊल म्हणून आता रुग्णांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षांतर्गत विशेष समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाचे बळकटीकरण करण्यासाठी ही समिती रुग्णांच्या अर्जांची छाननी व तपासणी करणार आहे.
  • या समितीच्या अध्यक्षपदी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधानसचिव असतील. तर वैद्यकीय शिक्षण संचालक यांच्यावर समितीच्या सह-अध्यक्षपदाची जबाबदारी राहणार आहे.
  • या समितीत एकूण सात सदस्य असणार आहेत. याविषयी नुकताच सार्वजनिक आरोग्य विभागाने शासननिर्णय जाहीर केला आहे.

राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुष्मिता देव :

  • सिल्चरच्या काँग्रेस खासदार सुष्मिता देव यांची अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या नव्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली.
  • महिला काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षा शोभा ओझा यांच्या जागेवर आता देव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • देव आणि ओझा या सध्या काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत.
  • ओझा यांची ऑगस्ट 2013 मध्ये महिला काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

राजीव महर्षी देशाचे नवे कॅग :

  • केंद्र सरकारने माजी केंद्रीय गृह सचिव राजीव महर्षी यांची नियंत्रक आणि महालेखापालपदी (कॅग) नियुक्ती केली आली आहे.
  • महर्षी यांचा गृह सचिवपदाचा कार्यकाळ 31 ऑगस्ट रोजी संपला. त्यांनी दोन वर्षे या पदाची धुरा सांभाळली.
  • राजीव महर्षी यांच्यानंतर राजीव गऊबा यांच्याकडे केंद्रीय गृह सचिवपदाची जबाबादारी असेल.
  • 1978च्या राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी असलेले राजीव महर्षी शशिकांत शर्मा यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत.
  • राजीव महर्षी 30 वर्षांपासून अधिक काळापासून प्रशासकीय सेवेत आहेत. त्यांनी व्यवसाय व्यवस्थापन विषयात स्ट्रॅथक्लाइड बिझनेस स्कूलमधून पदवी घेतली आहे.
  • त्यांनी इतिहास विषयात नवी दिल्लीतील सेंट स्टिफन्स महाविद्यालयातून बीए आणि एमए केले आहे.
  • राजीव महर्षींनी आतापर्यंत केंद्रात आणि राजस्थान सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
  • राजस्थान सरकारचे मुख्य सचिव, अर्थखात्याचे मुख्य सचिव, इंदिरा गांधी नहर बोर्डाचे सचिव, बिकानेरचे जिल्हाधिकारी सचिव या पदांवर त्यांनी काम केले आहे.
  • याशिवाय केंद्रात अर्थसचिव, खते विभागाचे सचिव या पदांवर काम करण्याचा अनुभव महर्षींना आहे.

विक्रमी अवकाशयात्री पेगी व्हिटसन पृथ्वीवर परतणार :

  • आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात 288 दिवसांचे विक्रमी वास्तव्य करणारी नासाची महिला अवकाशयात्री पेगी व्हिटसन आता पृथ्वीवर परतण्याच्या तयारीत आहे.
  • उड्डाण अभियंता जॅक फिशर व रशियाच्या रॉसकॉसमॉस अवकाश संस्थेचे कमांडर फ्योदोर युरीशिखिन यांच्यासह ती सोयूझ एमएस 04 या अवकाश यानाने परत येत असून ते कझाकस्तानमध्ये उतरणार आहे.
  • पेगी व्हिटसन हिने अवकाशात 288 दिवस वास्तव्य केले असून पृथ्वीभोवती 4623 प्रदक्षिणा मारल्या आहेत.
  • नोव्हेंबर 2016 पासून ती अवकाशात होती. तिचे हे अवकाशातील तिसरे प्रदीर्घ वास्तव्य होते.
  • तिने कारकीर्दीत 665 दिवस अवकाश वास्तव्य केले असून कुठल्याही अमेरिकी अवकाशवीरापेक्षा हा काळ अधिक आहे. जागतिक पातळीवर तिचे आठवे स्थान आहे.
  • युरीशिखिन व फिशर हे एप्रिलमध्ये अवकाश स्थानकात गेले होते. त्यांनी अवकाशात 136 दिवस पूर्ण केले आहेत.
  • युरीशिखिन याचे अवकाशात पाच मोहिमात मिळून 673 दिवस वास्तव्य झाले आहे. तो जागतिक क्रमवारीत सातवा आहे.
  • या अवकाश मोहिमेत पेगी व्हिटसन, फिशर व युरीशिखिन यांनी जैवतंत्रज्ञान, भौतिकशास्त्र, पृथ्वी विज्ञानातील अनेक प्रयोग केले आहेत.

सायप्रसच्या उच्चायुक्तपदी आर के राघवन :

  • मोदी सरकारने माजी सीबीआय प्रमुख आर के राघवन यांची सायप्रसच्या उच्चायुक्तपदी नेमणूक केली आहे.
  • उच्चायुक्तपदी सहसा आयएफएस (भारतीय विदेश सेवा) अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची प्रथा असताना मोदी सरकारकडून या राजकीय नियुक्तीमुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
  • 76 वर्षीय राघवन हे जानेवारी 1999 ते एप्रिल 2001 या कालावधीत सीबीआयच्या संचालकपदी होते.
  • वर्ष 2002मध्ये त्यांच्याकडे गुजरात दंगलीच्या तपासाची जबाबदारी देण्यात आली होती. तपासानंतर राघवन यांनी मोदी यांना क्लीनचिट दिली होती.
  • 2008मध्ये राघवन यांना सर्वोच्च न्यायालयाने ग्रोधा दंगलीचा तपास करणाऱ्या एसआयटीच्या पथकाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली होती.
  • गुजरात दंगलीपूर्वी राघवन यांना 2006मध्ये सर्वोच्च न्यायालयाने रॅगिंग प्रतिबंधक समितीच्या नेतृत्वाची जबाबदारी दिली होती.
  • राघवन यांनीच भारतातील पहिला सायबर सेल स्थापन केला होता. तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या भ्रष्टाचारप्रकरणाची यांनीच चौकशी केली होती.
  • 2000मध्ये मॅच फिक्सिंगचे प्रकरणही राघवन यांच्याकडेच सोपवण्यात आले होते. या प्रकरणात मोहम्मद अजहरूद्दीन आणि अजय जडेजा यांचे क्रिकेटचे करिअर संपुष्टात आले होते.

श्रीलंकेच्या नौदल प्रमुखपदी ट्रॅव्हिस सिनिया :

  • श्रीलंका देशाच्या नौदल प्रमुखपदाची धुरा चार दशकांनंतर प्रथमच तामिळी वंशांच्या रिअर अ‍ॅडमिरल ट्रॅव्हिस सिनिया यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
  • श्रीलंकेत तामीळ वंशाच्या नागरिकांना शिक्षण व रोजगारात स्थान मिळत नसल्याचे सांगत तामिळी बंडखोरांनी 1970मध्ये शस्त्र हाती घेऊन पुकारलेल्या युद्धाचा मे 2009 मध्ये शेवट झाला.
  • या काळात तामिळी वंशाच्या व्यक्तीला कधी सैन्य दलाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली नव्हती.
  • सिनिया यांच्या सर्वोच्च पदावरील नियुक्तीने, आजवर देशासाठी प्रामाणिकपणे केलेल्या त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली.
  • तामिळी बंडखोरांविरोधातील लढाईत सिनिया यांची कामगिरी लक्षवेधी ठरली. या मोहिमेचे काही काळ त्यांनी नेतृत्व केले.
  • श्रीलंकन नौदलात सागरी युद्ध कार्यवाहीचा प्रदीर्घ अनुभव असणारे ज्येष्ठतम अधिकारी ही सिनिया यांची ओळख.
  • नौदल प्रकल्प, योजना व संशोधन विभागाचे संचालक, नौदल (प्रशासन) विभागात उपसंचालक, संशोधन व विकास विभागात वरिष्ठ अधिकारी आदी पदांवरील कामाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.

भ्रष्टाचारी देशांच्या यादीत भारत प्रथम स्थानी :

  • फोर्ब्सकडून आशिया खंडातील भ्रष्टाचारी देशांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलकडून याबाबत 18 महिने सर्वेक्षण करण्यात आले होते.
  • या यादीत फोर्ब्सने आशिया खंडातील देशांमध्ये भारतात सर्वाधिक भ्रष्टाचार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
  • त्यामुळे आशिया खंडातील भ्रष्टाचारी देशांच्या यादीत भारताला पहिले स्थान देण्यात आले आहे. तर व्हिएतनामचा दुसरा क्रमांक लागतो.
  • भ्रष्टाचाराच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर थायलंड आहे तर पाकिस्तानचा चौथा क्रमांक लागतो.
  • भारतात भ्रष्टाचाराचे प्रमाण सुमारे 69 टक्के असल्याचे सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे.
  • भारतात शाळा, रूग्णालय, ओळखपत्र, पोलीस क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे प्रमाण सर्वाधिक आहे.

दिनविशेष :

    • जिब्राल्टर. : राष्ट्र दिन
    • चीन : शिक्षक दिन
    • 1974 : गिनी-बिसाउला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.
    • 1975 : व्हायकिंग-2 हे अमेरिकन मानवविरहित अंतराळयान मंगळ ग्रहाकडे झेपावले.
    • 2002 : स्वित्झर्लंडला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago