Current Affairs of 11 April 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (11 एप्रिल 2017)
सर्व्हे ऑफ इंडियाकडून एव्हरेस्टची उंची नव्याने मोजणार :
- भारतीय सर्वेक्षण विभागाचे (सर्व्हे ऑफ इंडिया) यंदाचे 250वे वर्ष असून या द्विशतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून या विभागाने जगातील सर्वात उंच पर्वतशिखर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘एव्हरेस्ट’च्या उंचीचे नव्याने मोजमाप करण्याचे ठरविले आहे.
- दोन वर्षांपूर्वी नेपाळमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर वैज्ञानिकांनी नानाविध शंका उपस्थित केल्यानंतर नेपाळच्या सर्वेक्षण खात्याच्या सहकार्याने ‘एव्हरेस्ट’ची उंची पुन्हा एकदा मोजण्याचा प्रस्ताव सर्व्हे ऑफ इंडियाने केला.
- आता तसा औपचारिक प्रस्ताव राजनैतिक माध्यमांतून नेपाळकडे पाठविण्यात आला असून त्यांच्याकडून होकार येताच हे काम याच वर्षी सुरू केले जाईल.
- तसेच सन 1865 मध्ये भारताचे तेव्हाचे सर्व्हेअर जनरल अॅन्ड्र्यु वॉ यांनी या शिखरास अधिकृत नाव देण्याचा प्रस्ताव रॉयल जिओग्राफिकल सोसायटीकडे पाठविला. व त्यानुसार ज्यांच्या नेतृत्वाखाली सर्वेक्षण करून सर्वप्रथम उंची मोजली गेली त्या सर एव्हरेस्ट यांचे नाव या शिखरास दिले गेले.
Must Read (नक्की वाचा):
आशिया ओशियाना ग्रुप एक डेव्हिस चषक लढतीत भारताचा विजय :
- भारतीय संघाने उज्बेकिस्तानवर वर्चस्व राखताना आशिया ओशियाना ग्रुप एक डेव्हिस चषक लढतीत 4-1 विजयासह विश्व ग्रुप प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित केले.
- भारताने दुहेरी लढत जिंकून 3-0 आघाडीसह सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या विश्व ग्रुप प्लेऑफसाठी स्थान निश्चित केले होते.
- रामकुमार रामनाथन याने पहिल्या परतीच्या एकेरी लढतीत अवघ्या 67 मिनिटांत संजार फाजियेव्ह याचा 6-1, 6-2 असा पराभव करून केएसएलटीए स्टेडियममध्ये भारताचा दबदबा कायम ठेवला; परंतु डावखुरा खेळाडू प्रजनेश गुणेश्वरनविरुद्ध जागतिक क्रमवारीतील 406 व्या स्थानावरील खेळाडू तैमूर इस्माइलोव्हने परिस्थितीचा अचूक फायदा घेताना दुसरा परतीचा एकेरीचा सामना 7-5, 6-3 असा जिंकताना भारताविरुद्ध आपल्या संघाला सफाया होण्यापासून वाचवले.
मलाला युसुफझाई संयुक्त राष्ट्राची शांतीदूत होणार :
- नोबेल पुरस्कारप्राप्त मलाला युसूफझाई लवकरच संयुक्त राष्ट्राची शांतीदूत होणार आहे.
- संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी मलाला युसूफझाईची संयुक्त राष्ट्राची शांतिदूत म्हणून निवड केली आहे.
- संयुक्त राष्ट्राच्या प्रमुखाकडून देण्यात येणारा हा सन्मान म्हणजे जगातल्या कोणत्याही व्यक्तीसाठी पुरस्काराइतकाच महत्त्वाचा समजला जातो.
- मलालाने मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देण्यासाठी अतोनात मेहनत आणि काम केलं आहे, असंही संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते स्टिफन दुजारिक म्हणाले आहेत.
‘म्हाडा’चे नवे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे :
- पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) अध्यक्षपदी ‘शाहू-कागल’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांची नियुक्ती झाली. या पदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा असल्याचे बोलले जाते. त्यामुळे या नियुक्तीने कागल तालुक्याला काही महिन्यांपासून लागून राहिलेली लाल दिव्याची प्रतीक्षा संपली.
- नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्या वेळी त्यांना या पदावर नियुक्तीचे आश्वासन दिले होते.
- नगरपालिका निवडणुका झाल्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही झाल्या; पण घाटगे यांची निवड झाली नव्हती, त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती.
- नगरपालिका निवडणुकीत कागल नगरपालिकेत इतिहासात पहिल्यांदा घाटगे यांच्या नेतृत्वाखाली ‘कमळ’ चिन्हावर 20 पैकी नऊ नगरसेवक विजयी झाले होते. त्यानंतरच्या जिल्हा परिषद निवडणुकीतही पाचपैकी दोन गटांत भाजपचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते.
- जिल्हा परिषदेत एकही जागा त्यांना जिंकता आली नसली, तरी तालुक्यात दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवण्यात त्यांच्या गटाला यश आले होते.
इजिप्तमध्ये 3 महिने आणीबाणी लागू :
- इजिप्तमधील दोन चर्चमध्ये झालेल्या दहशतवादी बाँब हल्ल्यांमध्ये किमान 45 लोक मृत्युमुखी पडले आहेत, तर 120 जण जखमी झाले आहेत. इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी तीन महिन्यांची आणीबाणी जाहीर केली आहे.
- तांता आणि अॅलेक्झांड्रिया या शहरांमध्ये हे बाँबस्फोट झाले. त्यानंतर अध्यक्ष सिसी यांनी अध्यक्षीय निवासस्थानी राष्ट्रीय संरक्षण परिषदेची बैठक घेतली. त्यावेळी बोलताना त्यांनी तीन महिन्यांसाठी आणीबाणीची परिस्थिती जाहीर केली.
- येथे अल्पसंख्यांक असणारे ख्रिश्चन ‘पाम संडे’चा सण साजरा करण्यासाठी चर्चमध्ये जमले असताना हा हल्ला करण्यात आला. ‘पाम संडे’चा दिवस ख्रिश्चन धर्मातील सर्वांत पवित्र दिवसांपैकी एक मानला जातो.
दिनविशेष :
- 11 एप्रिल 1827 हा महाराष्ट्राचे समाजसेवक ‘महात्मा जोतिबा फुले’ यांचा जन्मदिन आहे.
- ऋषिकेश येथील प्रसिध्द राम झुला प्रवाशासाठी 11 एप्रिल 1930 मध्ये खुला करण्यात आला.
- 11 एप्रिल 1930 रोजी पंडित मोतीलाल नेहरु यांनी आनंदभवन हे साडेचारशे दालने असलेले प्रासादतुल्य घर राष्ट्राला अर्पण केले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा