Current Affairs of 11 August 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (11 ऑगस्ट 2016)
बॉक्सर मनोजकुमारची रिओमध्ये विजयी सलामी :
- भारताचा बॉक्सर मनोजकुमारने रिओ ऑलिम्पिकमध्ये विजयी सलामी दिली आहे.
- पुरुषांच्या 64 किलो वजनी गटाच्या सामन्यात मनोजकुमारने लिथुएनियाच्या एव्हाल्डास पेट्राउस्कासचा 3-0 असा पराभव केला.
- तसेच या विजयासह मनोजकुमारने प्री कॉर्टर फायनलमध्ये (उप उपांत्यपुर्व) प्रवेश मिळविला. त्याची पुढील लढत उझबेकिस्तानच्या फजलद्दीनशी होणार आहे.
- 29 वर्षांच्या मनोजकुमारने या सामन्यात अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवल.
- रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला आत्तार्यंत एकही पदक मिळवता आलेले नाही.
- या अगोदर झालेल्या सामन्यात भारताच्या विकास यादवने (75 किलो) बॉक्सिंगमध्ये अमेरिकेच्या चार्ल्स् कोनवेलचा पराभव करुन भारताला विजय मिळवून दिला आहे.
Must Read (नक्की वाचा):
कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प देशास अर्पण :
- तमिळनाडूतील कुडनकुलम येथे उभारण्यात आलेला महत्त्वाकांक्षी अणुऊर्जा प्रकल्प देशाला अर्पण करण्यात आला.
- एक हजार मेगावॉट क्षमतेच्या पहिल्या युनिटचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन व तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले.
- भारत-रशिया दरम्यान असलेल्या द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टिकोनातून हा एक ऐतिहासिक क्षण आहे.
- तसेच या ठिकाणी प्रत्येकी एक हजार मेगावॉट क्षमतेच्या उर्वरित युनिटची उभारणी प्रगतिपथावर आहे.
- रशियाच्या सहकार्याने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची उभारणी सुरू असून चार टप्प्यांमध्ये तो उभा राहणार आहे.
- प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या अणुभट्टीची उभारणी न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआयएल) आणि ऍटोमस्ट्रॉय एक्स्पोर्ट या रशियन कंपनीच्या सहकार्याने होत आहे.
मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. साळुंके यांचा राजीनामा :
- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
- गेल्या काही दिवसांपूर्वी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यास शासनाने विरोध केल्यामुळे डॉ. माणिकराव साळुंके यांचे शासनाशी मदभेद झाले होते.
- तसेच यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचाच राजीनामा दिला आहे.
- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे 14 वे कुलगुरू म्हणून प्रा.डॉ. माणिकराव साळुंखे यांची निवड करण्यात आली होती.
मायकेल फेल्प्सची ऑलिंपिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी :
- अमेरिकेचा जलतरणपटू मायकेल फेल्प्स याने ऑलिंपिक स्पर्धांतील सुवर्णपदकांची विजयी कायम ठेवताना 200 मीटर बटरफ्लाय आणि 4 बाय 200 मीटर फ्रीस्टाईल रिले प्रकारात आणखी सुवर्णपदक मिळविले.
- रिओ ऑलिंपिकमधील त्याचे हे तिसरे सुवर्णपदक असून, ऑलिंपिक स्पर्धांतील 21 वे सुवर्ण मिळविण्याची ऐतिहासिक कामगिरी त्याने केली आहे.
- आपली शेवटची ऑलिंपिक स्पर्धा खेळत असलेल्या फेल्प्सचे ऑलिंपिक स्पर्धांमधील 25 वे पदक आहे.
- रिओ ऑलिंपिकमध्ये अमेरिकेन जलतरणात आतापर्यंत वर्चस्व मिळविलेले आहे.
- आता फेल्प्सने 200 मीटर बटरफ्लायमध्ये 1 मिनिट 53.36 सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले.
जपानच्या सकाई मसातो याने रौप्य आणि हंगेरीच्या केंडरसी तमास याने ब्राँझपदक मिळविले.
‘आयर्न लेडी’ कॅटनिकाची सुवर्ण हॅट्ट्रीक :
- जलतरणातील ‘आयर्न लेडी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हंगेरीच्या कॅटनिका होजूने जलतरणात तिसरे सुवर्णपदक मिळवीत हॅट्ट्रीक केली आहे.
- 27 वर्षीय होजूने हंगेरीला रिओ ऑलिंपिकध्ये गेल्या चार दिवसांत तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले आहे.
- अमेरिकेने रिओ ऑलिंपिक स्पर्धेच्या जलतरण क्रीडा प्रकारातील वर्चस्व तिसऱ्याही दिवशी कायम ठेवत दोन सुवर्णपदके जिंकले.
- महिलांमध्ये कॅटनिका होजूनेही आपल्या कामगिरीने जगाचे लक्ष वेधले आहे.
- ‘आयर्न लेडी’ होजूने महिलांच्या 200 मीटर वैयक्तिक मेडले प्रकारात ऑलिंपिक विक्रमाची नोंद करत सुवर्णपद मिळविले, तिने दोन मिनिट 6.58 सेकंदांची वेळ नोंदविली.
- कॅटनिकाने पहिल्या दिवशी 400 मीटर वैयक्तिक मेडले प्रकारात विश्वविक्रमासह सुवर्णपदकाची कमाई केली होती.
गोवामध्ये मद्यपान करणाऱ्यास बंदी :
- गोवा सरकारने सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांना दहा हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
- तसेच यासाठी गोवा विधानसभेत नवीन दुरुस्ती करण्यात आलेला राज्य उत्पादन शुल्क कायदा मांडण्यात आला.
- या कायद्यानुसार गोव्यात ठिकठिकाणी मद्यपान निषेध असलेले फलक लावण्यात येणार आहेत.
- फलक लावलेल्या परिसरात मद्यपान करणाऱ्या व्यक्तीला दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
- गोव्यात येणाऱ्या पर्यटकांकडून सार्वजनिक ठिकाणी, समुद्र किनारे आणि रस्त्यांवर मद्यपान करण्याच्या अनेक तक्रारी पाहता गोवा सरकारने हा निर्णय घेतला आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा