Current Affairs of 11 February 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (11 फेब्रुवारी 2016)
12 व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत आघाडीवर :
- भारताने 12 व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या दिवशीही सुवर्णांची लयलूट सुरूच आहे.
- तसेच त्यात नेमबाज, वुशू, तसेच ट्रॅक अॅन्ड फिल्ड प्रकाराचे मोलाचे योगदान राहिले.
- भारताने 117 सुवर्ण, 61 रौप्य आणि 16 कांस्यांसह आतापर्यंत 194 पदकांची कमाई केली आहे.
- पदक तालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेल्या लंकेने 24 सुवर्ण, 46 रौप्य आणि 63 कांस्यपदकांसह 133 पदके जिंकली.
- अॅथलेटिक्सनी (दि.10) भारताच्या यादीत आणखी सात सुवर्णांची भर घातली.
- पुरुष भालाफेकीत नीरज चोपडा, 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत आरोक्या राजीव, हातोडा फेकीत अर्जुन, 110 मीटर अडथळा शर्यतीत जे. सुरेंदर, महिलांच्या 100 मीटर अडथळा शर्यतीत गायत्री, पुरुषांच्या लांब उडीत अंकित शर्मा यांनी सुवर्णमय कामगिरी केली.
- तसेच त्याआधी जलतरणात भारताने अखेरच्या दिवशी पाच सुवर्णपदके जिंकली.
- वुशू स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारताने 8 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्यपदके पटकविली.
Must Read (नक्की वाचा):
चीनच्या वैज्ञानिकांनी निर्माण केला तेजस्वी कृत्रिम तारा :
- सूर्याच्या गर्भात असलेल्या उष्णतेहून तिप्पट उष्णतेचा एक अस्थायी कृत्रिम तारा निर्माण करण्याची विस्मयकारक वैज्ञानिक किमयागारी चीनच्या वैज्ञानिकांनी (दि.8) साध्य केली.
- ‘इस्टिट्यूट ऑफ फिजिकल सायन्स’च्या वैज्ञानिकांनी आण्विक सम्मीलन तंत्राने (न्युक्लियर फ्जुजन) प्रायोगिक अणुभट्टीत 49.999 दशलक्ष सेल्सियस एवढ्या प्रचंड उष्णतेचे वस्तुमान तयार करण्यात यश मिळवले.
- सूर्यासारख्या ताऱ्यांच्या गर्भात अशीच आण्विक प्रक्रिया निरंतर होऊन उष्णतारूपी ऊर्जा उत्सर्जित होत असते.
- थोडक्यात, चिनी वैज्ञानिकांनी आपल्या सूर्याहून तिप्पट तेजस्वी असा कृत्रिम तारा प्रयोगशाळेत तयार केला.
- ऊर्जेचा हा स्रोत भूगर्भातील उष्णतेहून 8,600 पट अधिक तप्त होता.
- हा कृत्रिम तारा अस्थायी होता व अवघ्या 102 सेकंदांनंतर तो ‘विझून’ गेला.
- दुष्परिणाम न होणारा शाश्वत ऊर्जास्रोत म्हणून ‘न्युक्लिअर फ्जुजन’चे तंत्रज्ञान विकसित करण्याचे प्रयत्न जागतिक पातळीवर सुरु आहेत.
प्राथमिक फेरीत बर्नी सॅंडर्स यांचा विजय :
- अब्जाधीश डोनाल्ड ट्रंप यांनी न्यू हॅम्पशायरमध्ये अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळविण्याच्या शर्यतीसाठी झालेली प्राथमिक फेरी जिंकली.
- डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने या प्राथमिक फेरीत बर्नी सॅंडर्स यांनी विजय मिळविला, तर हिलरी क्लिंटन यांना पराभवाचा सामना करावा लागला.
- अयोवाच्या कॉकसमधील पराभवामुळे ट्रंप आणि सॅंडर्स या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
- अयोवामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने टेड क्रूज आणि डेमोक्रॅटिकच्या वतीने हिलरी यांनी विजय मिळविला होता.
- न्यू हॅम्पशायरमध्ये ट्रंप यांना 34 टक्के मते मिळाली आणि त्यांचे प्रतिस्पर्धी; तसेच ओहियोचे गव्हर्नर जॉन केसिक हे 16 टक्के मतांसह दुसऱ्या स्थानी राहिले.
स्मार्ट सिटी प्रकल्पात होणार अमेरिकेचा समावेश :
- भारतातील सर्व प्रस्तावित शंभर स्मार्ट सिटी प्रकल्पात भागीदार होण्याची अमेरिकेची इच्छा आहे.
- भारत सरकारने अलीकडेच पहिल्या टप्प्यात स्मार्ट शहर म्हणून विकसित करण्यात येणाऱ्या दहा शहरांची यादी जारी केली आहे.
- स्मार्ट शहरांसाठी ठोस उपाय उपलब्ध करण्यात अमेरिका मौलिक भागीदार होऊ शकतो, असे अमेरिकेचे वाणिज्य उपमंत्री ब्रूस अॅण्ड्र्यू यांनी सांगितले.
- सध्या ते पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत, त्यांच्या सोबत अमेरिकेतील 18 कंपन्यांचे एक शिष्टमंडळही आहे, हे शिष्टमंडळ धोरणकर्ते आणि भारतीय कंपन्याच्या प्रतिनिधींना भेटणार आहेत.
- तसेच भारताच्या दृष्टीने उपयुक्त अशा महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाचे सादरीकरणही करणार आहे.
- टिकाऊ अर्थव्यवस्थेच्या विकासात भारताच्या मदतीच्या दृष्टीने अमेरिका उपयुक्त भागीदार होऊ शकते.
- भारतातील स्मार्ट शहर प्रकल्पात व्यवसायासाठी अमेरिकी कंपन्यांना खूप वाव आहे, असेही अॅण्ड्र्यू यांनी सांगितले.
केरळमधील के. जे. जोसेफ यांनी जागतिक विक्रम नोंदविला :
- केरळमधील मुन्नार येथे के. जे. जोसेफ यांनी एका मिनिटांत 82 पुश अप्स मारून जागतिक विक्रम नोंदविला आहे.
- जोसेफ यांनी 82 पुश अप्स मारुन यापूर्वी अमेरिकेच्या रॉन कपूर यांच्या नावावर असलेल्या 79 पुश अप्सचा विक्रम मोडीत काढला.
- तसेच या विक्रमाची नोंद गिनिझ बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे.
- जोसेफ यांनी प्रत्येक सेकंदाला सरासरी 1.35 पुश अप्स मारत हा विक्रम केला.
- जोसेफ यांनी यापूर्वी एका तासात 2092 पुश अप्स मारुन युनिव्हर्सल रेकॉर्डमध्ये नाव नोंदविलेले आहे.
अक्षरोत्सवात मराठी साहित्यिक-विचारवंतांचा लक्षणीय सहभाग :
- साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणाऱ्या साहित्य सन्मानांच्या निमित्ताने येत्या 15 ते 20 फेब्रुवारी या काळात होणाऱ्या अक्षरोत्सवात (फेस्टिव्हल ऑफ लेटर्स) यावर्षी मराठी साहित्यिक-विचारवंतांचा लक्षणीय सहभाग राहणार आहे.
- न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी हे 17 फेब्रुवारीच्या प्रतिष्ठित संवत्सर व्याख्यानाचे यंदाचे वक्ते आहेत.
- ‘लेटस लूक ऍट अवरसेल्फ विथ अवर स्पेक्टॅकल्स रिमूव्हड’ (चला, पुन्हा स्वतःकडे पाहूयात…चष्मे काढून) हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.
- अकादमीने यंदा ‘गांधी, आंबेडकर, नेहरू-सातत्य व धरसोडपणा’ या विषयावर विशेष राष्ट्रीय परिसंवाद आयोजित केला आहे.
- अकादमीचा साहित्य सन्मान वितरण कार्यक्रम 16 फेब्रुवारीला सायंकाळी साडेपाच वाजता मंडी हाउस भागातील पिक्की सभागृहात होणार आहे.
- यंदा सर्वश्री अरुण खोपकर (मराठी ) व उदय भेंब्रे (कोकणी) यांच्यासह 23 भाषांतील साहित्यिकांना अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या हस्ते व विख्यात साहित्यिक गोपीचंद नारंग तसेच अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव यांच्या मुख्य उपस्थितीत पुरस्कार वितरण होईल.
मराठवाडा, विदर्भातील 48 प्रकल्पांची चौकशी :
- राज्यभरातील प्रकल्पांसंदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेसंदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन करीत, अखेर राज्य
- शासनाच्या जलसंपदा विभागाने चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
- तसेच त्यासंबंधीचे आदेश देताना या चारसदस्यीय समितीला तीन महिन्यांत आपला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
- मराठवाड्यातील 10, तर विदर्भातील 38 अशा एकूण 48 सिंचन प्रकल्पांची चौकशी होणार आहे.
- उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी 2014 मध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयाने डिसेंबर 2015 मध्ये दिलेल्या निर्देशांनुसार शासनाने ही समिती स्थापन केली आहे.
- न्यायालयाच्या निर्देशास अनुसरून किकवी लघुप्रकल्प व कांचनपूर बृहत् लघुप्रकल्पाच्या निविदा निश्चितीमध्ये काही अनियमितता झाली आहे का, याबाबत प्राथमिक चौकशी करून अहवाल अहवाल सादर करण्यासाठी तसेच बांधकामाधीन प्रकल्पाच्या पुनर्विलोकनासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला.
दिनविशेष :
- 1830 : मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना.
- 1979 : पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
- 1847 : थॉमस अल्वा एडिसन, सुप्रसिद्ध अमेरिकन संशोधक, विद्युतप्रकाश व ध्वनी उपकरणांचे जनक यांचा जन्म.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा