Current Affairs of 11 January 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (11 जानेवारी 2016)

जळगावच्या विजय चौधरीने दुसऱ्यांदा पटकावला “महाराष्ट्र केसरी” किताब :

  • गतविजेत्या जळगावच्या विजय चौधरी याने मुंबईच्या विक्रांत जाधवला चितपट करत दुसऱ्यांदा प्रतिष्ठेचा “महाराष्ट्र केसरी” किताब पटकावला.
  • किताबाच्या आजपर्यंतच्या 42व्या लढतीत डबल महाराष्ट्र केसरी ठरलेला विजय पाचवा मल्ल ठरला.

चंद्रावरील गावांची कल्पना सत्यात :

  • चंद्रावर गाव वसविण्याच्या तयारीत शास्त्रज्ञ असून, चांद्रभूमीवरील गावाचे स्वप्न 2030 मध्ये सत्यात उतरणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
  • चंद्रावरील गावांची कल्पना सत्यात उतरण्यासाठी 2030 उजाडणार असले, तरी त्यानंतर या गावांचा अभ्यास मंगळमोहीम व इतर अवकाश मोहिमांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
  • या प्रकल्पासाठी अमेरिकेतील नॉट्रे डॅम विद्यापीठातील युवा शास्त्रज्ञ व रोबोटिक यंत्रणांच्या साह्याने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

न्यूझीलंडच्या कॉलिन मुन्रोने अवघ्या 14 चेंडूत अर्धशतक :

  • श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडच्या कॉलिन मुन्रोने अवघ्या 14 चेंडूत अर्धशतक झळकाविले. ट्वेंटी-20 क्रिकेटच्या इतिहासातील हे दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान अर्धशतक आहे.
  • जगातील सर्वांत लहान मैदानांपैकी एक असलेल्या ऑकलंडमधील मैदानावर श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 142 धावा केल्या होत्या.

इंटरनेटवर 50 कोटी नवे ग्राहक जोडणार :

  • केंद्र सरकारने घोषणा केलेल्या डिजिटल इंडिया मिशनला गती देण्यासाठी सरकारने आता मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू केले असून आगामी सहा महिन्यांत नवे 50 कोटी इंटरनेट ग्राहक जोडण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी दिली.
  • डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत देशातील तळागाळापर्यंत इंटरनेटचे तंत्रज्ञान पोहोचविण्याचा सरकारचा मानस असून, देशातील तब्बल अडीच लाख ग्रामपंचायतींची जोडणी करण्यात येईल. ई-शिक्षण, टेलिमेडिसिन, प्राथमिक आरोग्य केंद्रांची जिल्हा रुग्णालयांशी जोडणी अशा काही महत्वपूर्ण सेवा यामुळे तळागाळापर्यंत पोहोचविणे शक्य होणार आहे.

भारत यंदा चीनला मागे टाकणार :

  • विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये सलग दुसऱ्या वर्षीही भारत चांगली प्रगती करील व 2016 मध्ये 7.7 टक्के आर्थिक प्रगतीचा वेग असेल जो चीनपेक्षा अधिक असेल, असे जागतिक पातळीवरील सल्लागार कंपनी ‘पीडब्ल्यूसी’ने म्हटले आहे.
  • कंपनीच्या अर्थशास्त्रज्ञांनी नवीन वर्षासाठीचे अंदाज जाहीर केले असून, त्यात म्हटले आहे की, जितक्या विकसनशील अर्थव्यवस्था आहेत, त्यामध्ये फक्त भारतच 2016 वर्षात दीर्घकालीन सरासरी प्रगतीपेक्षा जास्तीचा वेग राखू शकेल.
  • भारत, चीन, ब्राझील, रशिया, मेक्सिको, इंडोनेशिया व तुर्कस्थान या सात विकसनशील अर्थव्यवस्था असून, त्यांच्यापैकी फक्त भारताची कामगिरी चांगली राहील.
  • ब्राझील व रशियाची अर्थव्यवस्था आकुंचित होईल, तर चीनमध्ये मंदीची शक्यता आहे, असे ‘पीडब्ल्यूसी’ने म्हटले आहे.
  • तसेच अमेरिका, जपान, जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, इटली व कॅनडा हे जी-7 देश 2010 नंतर यंदा प्रथमच चांगली कामगिरी करतील. याउलट सात विकसनशील देशांची प्रगती कमी असेल; पण हा वेग जी-7 देशांपेक्षा मात्र जास्तच असेल.
  • भारताच्या रिझर्व्ह बँकेने गेल्यावर्षी धोरणात्मक दर आठ टक्क्यांवरून 6.75 टक्के केल्यामुळे यंदा विक्री व गुंतवणूक दोन्हीही वाढण्याची शक्यता आहे.

रस्ते सुरक्षा अभियानातूनही आमीरला हटवले :

  • अतुल्य भारत पाठोपाठ आमीर खानला रस्ता सुरक्षेच्या जाहीरात मोहिमेतूनही हटवण्यात आल्याचे वृत्त इंग्रजी दैनिक ‘द टेलीग्राफ’ने दिले आहे.
  • डिसेंबर 2014 मध्ये रस्ते सुरक्षा अभियानाचा ब्रँण्ड अॅम्बेसिडर म्हणून आमीर खानबरोबर करार करण्यात आला होता.
  • याच आठवडयात आमीरबरोबर अतुल्य भारतच्या जाहीरात मोहिमेचा करार वाढवण्यास पर्यटन मंत्रालयाने नकार दिला होता.

पर्यावरण पर्यटन योजना राबवण्याची योजना एनटीसीए फेटाळली :

  • मध्य प्रदेशातील कान्हा व्याघ्र संवर्धन प्रकल्पात पर्यावरण पर्यटन योजना राबवण्याची योजना राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने(एनटीसीए) फेटाळली आहे.
  • पर्यटन वाढवण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नांना त्यामुळे धक्का बसला आहे.
  • सरकारने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाला पर्यावरण पर्यटनाची सुधारित योजना दिली होती. त्यात पर्यटन वाढवण्याचा हेतू होता.
  • तसेच कान्हा व्याघ्र प्रकल्पात पर्यावरण पर्यटनाची योजना आघीच मंजूर झालेली आहे त्यामुळे सुधारित योजना मंजूर करण्याची गरजच नव्हती कारण तेथील पर्यटनात आधीच वाढ झालेली आहे, एनटीसीएच्या नियमानुसारच योजना आहे.
  • कान्हा व्याघ्र प्रकल्प भोपाळपासून 300 कि.मी. अंतरावर असून तेथे लोकांची व वन्यजीव प्रेमींची वर्दळ जास्त असते. देशातील व्याघ्र प्रकल्पात 2226 वाघ असून 2010 मध्ये त्यांची संख्या 1706, तर 2006 मध्ये 1411 होती. मध्य प्रदेशात 308, कर्नाटकात 406, तर उत्तराखंडमध्ये 340 वाघ आहेत.

एक टक्का बुद्धिमान व्यक्तींच्या पंक्तीत समावेश :

  • ब्रिटनमध्ये अमेरिकी वंशाच्या भारतीय मुलीने मेन्सा बुद्धय़ांक चाचणीत 162 गुण मिळवले असून ती देशातील सर्वात तरुण व बुद्धिमान मुलगी ठरली आहे.
  • कश्मिआ वाही असे या मुलीचे नाव असून ती अकरा वर्षांची आहे, तिचा जन्म मुंबईतला असून तिने बुद्धय़ंक चाचणीत अल्बर्ट आइनस्टाइन व स्टीफन हॉकिंग यांना मागे टाकले आहे, कारण या दोघांचा बुद्धय़ंक 160 च्या आसपास असल्याचे सांगितले जाते.
  • कश्मिआ ही ब्रिटनमधील 1 टक्का बुद्धिमान व्यक्तींच्या पंक्तीत बसली आहे.
  • कश्मिआने बुद्धिमत्ता सिद्ध करण्यासाठी ही चाचणी दिली. कॅटेल 3 बी मेन्सा चाचणी आंतरराष्ट्रीय पातळीवरची बौद्धिक मूल्यमापनाची मान्यताप्राप्त चाचणी आहे. त्यात दीडशे प्रश्न असतात व गद्य उताऱ्यांच्या आधारे तुमचे भाषेचे आकलनही तपासले जाते. यात आतापर्यंत प्रौढांच्या गटात 161 तर 18 वर्षांखालील गटात 162 हे सर्वोच्च गुण प्राप्त झालेले आहेत.

नमामि गंगे योजनेअंतर्गत जलशुद्धीकरण प्रकल्प सुरु :

  • केंद्राच्या नमामि गंगे योजनेअंतर्गत खासगी आणि सरकारी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
  • याद्वारे शुद्ध करण्यात आलेल्या पाण्याची खरेदी रेल्वे विभाग करणार आहे.
  • कंपनी कायद्यानुसार सुरु होणारा हा विशेष प्रकल्प आहे. त्यासाठी सरकारने यंत्रणेचे स्वरूप, नियामक मंडळ, बाजारपेठ इत्यादी सर्व मुद्द्यांचा विचार करून त्याची उभारणी करण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू केले जाणार आहेत.
  • गंगा नदीच्या पाण्यावर ही प्रक्रिया केली जाणार आहे. जलस्रोत मंत्रालयाने अगोदरच रेल्वेशी करार केला आहे. त्यानुसार रेल्वे अशा प्रकल्पातील शुद्धीकरण केलेले पाणी खरेदी करेल. रेल्वेप्रमाणेच ऊर्जा, पेट्रोलियम आणि उद्योग मंत्रालयाशीदेखील काही करार होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबईत हेली-टुरिझमला प्रारंभ :

  • महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने ‘पवन हंस लिमिटेड’ या कंपनीबरोबर सहकार्य करार करून मुंबईत हेली-टुरिझमला प्रारंभ केला आहे. भारतात अशाप्रकारे राबवण्यात आलेला हा पहिलाच उपक्रम आहे.
  • हेली-टुरिझममुळे पर्यटकांना अधिकाधिक चांगला अनुभव मिळावा, अशी मूळ संकल्पना असणाऱ्या या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातल्या पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे.
  • हेलिकॉप्टर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांना करांसहित प्रतिव्यक्ती 32,000 रुपये शुल्क भरावे लागेल.
  • सुरुवातीच्या टप्प्यात केवळ मुंबई दर्शन यात्रा पर्यटकांना घडवली जाईल. पुढे त्यात एलिफंटा बेट, अजिंठा आणि वेरूळची लेणी, शिर्डी या ठिकाणांचाही समावेश केला जाणार आहे.

दिनविशेष :

  • आल्बेनिया प्रजासत्ताक दिन
  • नेपाळ एकता दिन
  • मोरोक्को स्वतंत्रता संघर्ष दिन
  • 1916 : नेल्सन मंडेला यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला.
  • 1922 : मधुमेहाच्या रुग्णावर प्रथमतः इन्सुलिनचा प्रयोग केला गेला.
  • 1898 : ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेते, मराठीतील विख्यात साहित्यिक वि.स. खांडेकर (विष्णु सखाराम खांडेकर) यांचा जन्म.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago