Current Affairs of 11 January 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (11 जानेवारी 2017)

माहिती अधिकार ऑनलाइन सुरु होणार :

  • राज्यातील माहिती अधिकारांतर्गत अर्ज करणा-यांना 26 जानेवारीपासुन व्यक्तीगत अर्ज करण्यासह माहिती मिळविण्यासाठी थेट ऑनलाइन कार्यप्रणालीचा वापर करावा लागणार आहे.
  • राज्य सरकारने तसे निर्देश सर्व स्थानिक प्रशासन, जिल्हापरिषदा व पोलिस यंत्रणांना दिले असुन त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्थादेखील केली आहे.
  • तसेच यामुळे अर्जदारांना घरबसल्या माहिती अर्ज करुन माहिती मिळविता येणार आहे. संबंधित कार्यालयांना देखील निश्चित मुदतीतच अर्जदारांना माहिती द्यावी लागणार आहे.
  • देशात डिजिटल युगाची सुरुवात झाल्याने राज्य सरकारने नागरीसेवा ऑनलाइन कार्यप्रणालीद्वारे देण्याला सुरुवात केली आहे. त्यातील काही सुरु झाल्या असुन काही सुरु केल्या जात आहेत.
  • महत्वाच्या आरटीआयला (माहिती अधिकार) ऑनलाइनच्या कक्षेत आणले जात आहे. त्याची सुरुवात 26 जानेवारीपासुन राज्यभर केली जाणार आहे.

‘ला ला लॅंड’ या चित्रपटाला “गोल्डन ग्लोब” पुरस्कार :

  • ‘ला ला लॅंड’ या बहुचर्चित चित्रपटाने तब्बल सात “गोल्डन ग्लोब” पुरस्कार मिळवित नवा विक्रम रचला आहे.
  • किंबहुना ‘दिग्दर्शन, पटकथा, संगीत’ अशा ज्या ज्या क्षेत्रांत या चित्रपटास नामांकन मिळाले, त्या सर्व क्षेत्रांमध्ये या चित्रपटाने बाजी मारली.
  • तसेच या चित्रपटामध्ये मध्यवर्ती भूमिका केलेल्या एमा स्टोनरायन गोसलिंग या अभिनेत्यांनीही गोल्डन ग्लोबवर नाव कोरण्यात यश मिळविले.
  • ला ला लॅंडशिवाय ‘मूनलाईट’ या चित्रपटानेही ‘बेस्ट ड्रामा पुरस्कार’ मिळविण्यात यश मिळविले.
  • दी नाईट मॅनेजर आणि दी क्राऊन या मालिकांत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांनाही गोल्डन ग्लोबने गौरविण्यात आले.
  • ‘हॉलिवूड फॉरिन प्रेस असोसिएशन’तर्फे गोल्डन ग्लोब पुरस्कार घोषित केले जातात.

भारतीय वंशाचे राज शहा यांची अमेरिकेत उपसहायकपदी निवड :

  • अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक असलेले राज शहा यांना व्हाईट हाऊसमध्ये महत्वाच्या पदावर नियुक्त केले आहे.
  • तसेच डोनाल्ड ट्रम्प यांचे उपसहायकसंशोधक संचालक म्हणून राज शहा यांची निवड करण्यात आली.
  • सध्या राज शहा हे रिपब्लिकन राष्ट्रीय समतीच्या ‘अपोझिशन रिसर्च’चे प्रमुख आहेत.

विदेशात कॅन्सरवरील औषध लोकांसाठी उपलब्ध :

  • कॅन्सरच्या पेशींना विरघळून टाकणारे औषध आजपासून ऑस्ट्रेलियातील लोकांना उपलब्ध करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
  • ऑगस्ट 2016 मध्ये अमेरिकेत या औषधाला परवानगी मिळाल्यानंतर या औषधाचा वापर लोकांसाठी सुरू झाला होता.
  • मेलबर्नमध्ये व्हेनेटोक्‍लॅक्‍सतर्फे या औषधाची निर्मिती करण्यात आली असून, “व्हेनक्‍लेक्‍स्टा” या नावाने त्याची विक्री केली जात आहे.
  • ज्या रुग्णांना कॅन्सरच्या अन्य औषधोपचारांचा उपयोग होत नाही, अशांसाठी हे औषध वापरले जाते.
  • थेराप्युटिक गुड्‌स ऍडमिनिस्ट्रेशनने (टीजीए) हे औषध लोकांना वापरण्यास परवानगी दिली आहे. गेल्या 30 वर्षांपासून या औषधाचा शोध सुरू होता.

दिनविशेष :

  • मराठीतील विख्यात साहित्यिक व ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेते विष्णु सखाराम खांडेकर (वि.स. खांडेकर) यांचा जन्म 11 जानेवारी 1898 रोजी झाला.
  • 11 जानेवारी 1916 रोजी नेल्सन मंडेला यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला.
  • सन 1922 मध्ये मधुमेहाच्या रुग्णावर प्रथमतः इन्सुलिनचा प्रयोग केला गेला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago