अतिवृष्टीच्या काळात पर्यटनासाठी प्रसिद्ध धबधब्यांवर जाण्यास ‘नो एंट्री’चा निर्णय घेतला असून त्या कालावधीत पोलिस तैनात केला जाणार आहे.
सवतकडा (ता. राजापूर) येथील घटनेनंतर झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. हवामान विभागाने संभाव्य अतिवृष्टी विषयक इशारा दिल्यामुळे सध्या धूतपापेश्वर, सवतकडा, उक्षी, निवळी, मार्लेश्वर, पानवल, सवतसडा या जिल्ह्यातील अन्य धबधबे व धरणांवर जाण्यास पर्यटकांना मनाई केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात उपाययोजनांसाठी बैठक झाली. सवतकडा येथील घटनेत अनुचित प्रकार घडला नाही. भविष्यात हे टाळण्यासाठी जिल्हा परिषद, तहसील प्रशासन, ग्रामपंचायतीला जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत.
नदी उगमाजवळ पाऊस पडला की धबधब्याचे पाणी वाढते. तोच प्रकार सवतकडा येथे घडला. अचानक वाढलेले पाणी पर्यटकांच्या लक्षात आले नाही. हे लक्षात घेऊन हवामान विभागाकडून अंदाज वर्तविल्यानंतर धबधब्यांवर जाण्यास पर्यटकांना मनाई केली आहे.
काठावर पर्यटक जाऊन मौजमजा करु शकतील; परंतु त्यांना पाण्यात उतरता येणार नाही. त्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी अतिवृष्टींचा संदेश असलेल्या काळात धबधब्यांवर पोलिसांची नियुक्ती केली जाईल.
दोन मंत्र्यांनी तडकाफडकी राजीनामा सादर केल्यामुळे अडचणीत आलेल्या ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी परराष्ट्रमंत्र्यांची नियुक्ती करून आपल्या नेतृत्वाभोवती निर्माण झालेल्या शंका कमी करण्याचा प्रयत्न केला. मे यांनी विद्यमान आरोग्यमंत्री जेरेमी हंट यांची नवे परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे.
ब्रिटनचे मावळते परराष्ट्रमंत्री बोरिस जॉन्सन यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ब्रिटनचे ब्रेक्झिट विभागाचे मंत्री डेव्हिड डेव्हिस यांनी पद सोडल्यानंतर जॉन्सन यांनीही राजीनामा सादर करत खळबळ उडवून दिली होती. दोन मंत्र्यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे मे यांच्या नेतृत्वावार प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे मानले जात आहे.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना हंट म्हणाले, की युरोपियन युनियनमधून (ईयू) बाहेर पडल्यानंतर ब्रिटन नेमके कसे असेल याची सध्या संपूर्ण जगाला उत्सुकता आहे. ब्रेक्झिटच्या मुद्द्यावर पंतप्रधान मे यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे.
दरम्यान, नवे परराष्ट्रमंत्री म्हणून जेरेमी हंट यांच्या नियुक्तीची घोषणा
केल्यानंतर पंतप्रधान मे यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. मे यांच्या विरोधात विश्वासदर्शक ठराव आणण्याच्या हालचाली सुरू असल्याचीही चर्चा आहे.
‘इज ऑफ डुइंग बिझनेस’मध्ये महाराष्ट्र 13व्या स्थानी :
इज ऑफ डुइंग बिझनेसमध्ये (उद्योगस्नेही वातावरण)आंध्र प्रदेश दुसऱ्यांदा प्रथम स्थानी आले आहे. आंध्र प्रदेश शेजारील तेलंगणा दुसऱ्या स्थानी आहे. तर हरयाणा, झारखंड, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि राजस्थान यांचा क्रम लागतो.
विशेष म्हणजे औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असल्याचा दावा करणारा महाराष्ट्र 13व्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राच्या आधी उत्तर प्रदेश तर नंतर ओडिशाचा क्रमांक लागतो.
पहिल्या वर्षी क्रमवारीत केवळ सात राज्यांनीच सरकारने सुचवलेल्या 50 टक्के सूचना लागू केल्या होत्या. दुसऱ्यांदा 18 राज्यांनी असे केले तर यंदाच्यावेळी 21 राज्य या सूचीत आले होते.
राज्यातील सरकाररे हे इज ऑफ डुइंग बिझनेस अंतर्गत अनेक प्रक्रियांऐवजी एक खिडकी पद्धतीवर काम करत आहेत. सरकारने निर्धारित केलेल्या मानकांनुसार बांधकाम परवाना, कामगार नियमावली, पर्यावरण नोंदणी, जागेची उपलब्धता आणि एक खिडकीचा समावेश आहे.
पाकिस्तानकडून संयुक्त राष्ट्रांत काश्मीर प्रश्न उपस्थित :
पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात भारतावर ताशेरे ओढणाऱ्या काश्मीरबाबतच्या संयुक्त राष्ट्र अहवालाचा संदर्भ दिल्यानंतर भारताने त्याच्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली असून, तो अहवाल मानवी हक्क मंडळाच्या प्रतिनिधींनी विचारात घेण्याच्याही दर्जाचा नाही असे म्हटले आहे.
पाकिस्तानने पुन्हा काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही आठवडय़ांत पाकिस्तानने तिसऱ्यांदा हा प्रयत्न केला असून त्याला वेळोवेळी भारताने चपराक दिली आहे.
पाकिस्तानने काल केलेल्या प्रयत्नाचा समाचार घेताना भारताने म्हटले आहे, की पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांच्या मंचाचा गैरवापर करीत आहे. काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांत चर्चा करण्याचा प्रयत्न हा गैर आहे.
पाकिस्तानच्या स्थायी प्रतिनिधी मलिहा लोधी यांनी 14 जूनच्या काश्मीर व पाकव्याप्त काश्मीरबाबतच्या संयुक्त राष्ट्र मानवी हक्क उच्चायुक्तांनी दिलेल्या अहवालाचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला.
मानवी हक्क आयुक्त झैद राद अल हुसेन यांनी सादर केलेला अहवाल केंद्रस्थानी घेऊन पाकिस्तानने सुरक्षा मंडळात बालके व सशस्त्र संघर्ष यात त्यातील संदर्भ घुसडण्याचा प्रयत्न केला.
‘मायव्होट टुडे’शी संबंधित ट्विटर हँडल बंद :
समाजमाध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या बनावट बातम्या व अफवांमुळे होणाऱ्या हिंसाचारामुळे आता ट्विटरनेही बोट, ट्रोल्स व बनावट खात्यावर कारवाई केली आहे. त्याशिवाय मायव्होट टुडे हे जनमत चाचणीच्या उपयोजनाचा वापर करणारी एकूण 28 ट्विटर हँडल बंद करण्यात आली आहेत.
या अॅपच्या मदतीने कुठल्याही प्रश्नावर लोकांची मते घेतली जात होती. तुमच्या मते खालीलपैकी कुणाला गप्प करणे आवश्यक आहे, असा एक प्रश्न यात देण्यात आला होता त्यात मुख्यमंत्री, विरोधी राजकारणी, पत्रकार असे काही पर्यायही दिले होते.
ट्विटरच्या प्रवक्तयाने सांगितले की, धमकावणे व कुणाचा छळ करणे, कुणाला गप्प करणे, कुणाला भीती दाखवून गप्प बसवणे असे प्रकार यापुढे चालणार नाहीत. त्यामुळे एक विशिष्ट खाते आम्ही बंद केले आहे. मायव्होट टुडे हँडलवर आम्ही शोध घेतला असता त्यात बरेच आक्षेपार्ह आढळून आले.
मायव्होट टुडेच्या इतर 27 हँडलवरही आक्षेपार्ह बाबी दिसून आल्या त्यामुळे ती सर्व हँडल्स बंद करण्यात आली आहेत. मायव्होट टुडेवर आधारित एका खात्याने अनेक नियमांचे उल्लंघन केले होते.
मायव्होट टुडे हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे जनमत चाचणी उपयोजन आहे त्यात ऑनलाईन मतदान घेतले जाते. ते अॅपशन डिजिटल टेक्नॉलॉजीज प्रा.लि. बंगळुरू व अॅपशन डिजिटल इनकार्पोरेशन-पालो अस्टो, कॅलिफोर्निया संस्थांनी तयार केले आहे.
दिनविशेष :
11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो.
प्राच्यविद्या संशोधकपरशुराम कृष्णा गोडे यांचा जन्म 11 जुलै 1891 मध्ये झाला.
सन 1893 मध्ये कोकिची मिकीमोटो यांनी पहिला कल्चर्ड मोती मिळवला.
11 जुलै सन 1950 मध्ये पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा (IMF) सदस्य बनला.
केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा जन्म 11 जुलै 1953 मध्ये झाला.
चिलितील तांब्याच्या खाणींचे सन 1971 मध्ये राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.