Current Affairs of 11 March 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (11 मार्च 2016)

म्यानमार अध्यक्षपदासाठी वाहनचालकाचे नाव :
  • लोकशाहीवादी नेत्या आँग सान स्यू की यांनी आज म्यानमारच्या अध्यक्षपदासाठी आपले सहकारी तिन क्‍याव यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर केले.
  • क्‍याव हे स्यू की यांचे पूर्वीचे वाहनचालक होते.
  • नुकत्याच झालेल्या ऐतिहसिक निवडणुकीत स्यू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी या पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले होते.
  • लष्करी राजवटीने केलेल्या राज्यघटनेतील तरतुदीमुळे स्यू की यांना अध्यक्षपद ग्रहण करता येणार नाही.
  • क्‍याव यांच्यासारखा विश्‍वासार्ह सहकाऱ्याचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे करून देशावर स्वत:चे नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
  • या निर्णयाबद्दल स्यू की यांच्या पक्षातील अनेक नेते अंधारात होते. आमच्या पक्षाला मते देऊन देशाचे भविष्य घडविण्याची आशा असलेल्या नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच हे पाऊल उचलल्याचे स्यू की यांनी स्पष्ट केले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (10 मार्च 2016)

जर्मनीच्या हातात ‘इसिस’ची गोपनीय कागदपत्रे :

  • जर्मनीच्या गुप्तहेरांच्या हाती ‘इसिस‘संबंधी महत्त्वाची गोपनीय कागदपत्रे लागली असून यामुळे या दहशतवादी संघटनेबाबत अधिक माहिती उजेडात आली आहे. या गोपनीय कागदपत्रांमध्ये ‘इसिस‘च्या जगभरातील 22 हजार सदस्यांची सविस्तर माहिती आहे.
  • या कागदपत्रांमध्ये जगभरातील ‘इसिस’ समर्थकांची माहिती असल्याने अनेक देशांमधील सुरक्षा संस्था त्याची छाननी करण्याची शक्‍यता आहे.
  • या माहितीची एकूण 1,736 पाने असून त्यावर ‘इसिस‘च्या काळ्या झेंड्याचा शिक्का आहे.
  • ‘इसिस‘मध्ये सहभागी होण्यासाठी युवकांना 23 प्रश्‍नांना उत्तरे देणे आवश्‍यक असल्याचे दिसून आले आहे.

भारताकडून विंडीज 45 धावांनी पराभूत :

  • फॉर्मात असलेल्या रोहित शर्माने नाबाद 98 धावांची आक्रमक खेळी आणि नंतर मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा व हार्दिक पंड्याने घेतलेल्या प्रत्येकी दोन विकेटच्या जोरावर भारताने सराव सामन्यात वेस्ट इंडीजचा 45 धावांनी पराभव केला.
  • ईडन गार्डनच्या मैदानावर झालेल्या या लढतीत भारताने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 185 धावांपर्यंत मजल मारली.
  • विंडीजला दिलेल्या 186 धावांच्या आव्हानाला उत्तर देताना त्यांचा डाव 19.2 षटकांत 140 धावांत संपुष्टात आला.

शेतकरी महिलांसाठी ‘सफल’ची योजना :

  • कृषी क्षेत्रात वित्तपुरवठा करण्यात अग्रेसर असलेल्या सस्टेनेबल अ‍ॅग्रो (सफल) कंपनीने शेतकरी महिलांसाठी एका अनोख्या योजनेची घोषणा केली आहे.
  • याअंतर्गत महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील शेतकरी महिलांना 5 हजार रुपयांपपर्यंत व्याजमुक्त विशेष वित्तपुरवठा केला जाणार आहे.
  • कोणत्याही तारणाशिवाय हा वित्तपुरवठा होणार असून, पाच हजार ते 50 हजार, असे तीन टप्पे निश्चित केले असून, यामध्ये सरळव्याज पद्धतीने व्याजाची आकारणी होईल.
  • पाच ते पंधरा हजारांसाठी 5 टक्के व्याज, 15 ते 25 हजारांसाठी 6 टक्के व्याज, तर 25 ते 50 हजारांसाठी 7 टक्के व्याज आकारणी होईल.
  • शेतकरी महिलांचा शाश्वत विकास करणे आणि त्यांच्या स्वप्नांना वित्तीय बळ देणे या उद्दिष्टाने आम्ही ही योजना राबवीत असल्याची प्रतिक्रिया सफलचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद सोनमाळे यांनी दिली.

सहावा दिशादर्शक उपग्रह अंतराळात :

  • पीएसएलव्ही सी 32 या प्रक्षेपकाद्वारे गुरुवारी आयआरएनएसएस-1 एफ या सहाव्या दिशादर्शक उपग्रहाचे येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वीरीत्या प्रक्षेपण झाले.
  • संध्याकाळी 4.01 वाजता प्रक्षेपक अवकाशात झेपावल्यानंतर हा उपग्रह भूस्थिर कक्षेत सोडला गेला.
  • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) सात दिशादर्शक उपग्रहांच्याप्रक्षेपणाची योजना आखली असून आयआरएनएसएस-1 एफ हा या मालिकेतील सहावा उपग्रह आहे. त्यामुळे भारताला अमेरिकेच्या जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम) या स्थितीदर्शक यंत्रणेच्या तोडीची सेवा देणे शक्य होणार आहे.
  • गुरुवारी झालेले सदर उपग्रहाचे प्रक्षेपण नियोजितरीत्या तंतोतंत (कॉपीबुक स्टाईल) पार पडले. यापूर्वी जुलै 2013 मध्ये या मालिकेतील पहिल्या उपग्रहाचे प्रक्षेपण झाले होते.
  • क्षेत्रीय दिशादर्शक यंत्रणा पूर्ण करण्यासाठी केवळ एका उपग्रहाचे प्रक्षेपण व्हायचे आहे, हे काम पुढील महिन्यात होण्याची आशा आहे, असे इस्रोचे अध्यक्ष ए.एस. किरण कुमार यांनी मिशन कंट्रोल सेंटरमध्ये जल्लोष साजरा करताना म्हटले.

रिअल इस्टेट विधेयक राज्यसभेत मंजूर :

  • देशातील खासगी गृहबांधणी क्षेत्रात पारदर्शकता आणणारे आणि ग्राहकांचे हित जोपासणारे ‘रिअल इस्टेट (नियमन आणि विकास) विधेयक 2015’ गुरुवारी राज्यसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.
  • केंद्रीय नगरविकास मंत्री एम. वैंकय्या नायडू यांनी राज्यसभेत मांडलेल्या या विधेयकाला काँग्रेसने पाठिंबा दिल्यामुळे ते सहजपणे मंजूर झाले.
  • नायडू म्हणाले, घर घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी आणि या क्षेत्रांतील व्यवहारांत पारदर्शकता आणण्यासाठी या विधेयकात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. हे विधेयक मंजूर होणे ही काळाची गरज आहे.
  • या विधेयकाला प्रामुख्याने अण्णा द्रमुकने विरोध केला होता. मात्र, त्यांनीही या विधेयकाला पाठिंबा द्यावा, अशी मागणी नायडू यांनी केली.
  • देशात वेगाने विस्तारत असलेल्या गृहबांधणी क्षेत्राचे नियमन करण्याच्या दृष्टिने या विधेयकाला विशेष महत्त्व आहे.
  • आवश्यक परवानग्यांसाठी एक खिडकी योजना राबविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दिनविशेष :

  • 1886 – पहिली भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना डॉक्टर ही पदवी मिळाली.
  • 1689औरंगजेबाच्या कैदेमध्ये असलेल्या संभाजीराजांची अतिशय हालहाल करुन हत्या करण्यात आली.
  • पेनिसिलीनचे शोधक सर फ्लेमिंग पुण्यतिथी

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (14 मार्च 2016)

Shital Burkule

Shital is very passionate content writer and likes to write about more stuff related to news about education.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago